आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईप्रमाणेच पित्याचेही मन असते कोमल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग दिवसाच्या धामधुमीत या महिन्यात एका खास दिवसाकडे जरा दुर्लक्ष झाले. फादर्स डे नेमका आंतरराष्ट्रीय योग दिनीच आल्याने हे घडले. पित्याचे माहात्म्य सांगणार्‍या या दिवसाची सुरुवात केव्हा व कुठे झाली? ही पार्श्वभूमी मोठी हृदयस्पर्शी आहे. न्यूयॉर्कजवळील एका शहरात सोनोरा स्मार्ट डॉड नामक एक मुलगी राहत असे. सहाव्या अपत्याला जन्म देताना तिच्या आईचे देहावसान झाले. सोनोरो तेव्हा १६ वर्षांची होती. पत्नीच्या निधनानंतर सोनोराच्या वडिलांनी एकट्यानेच ६ अपत्यांचे संगोपन केले. १९१० मध्ये एकट्या पुरुषाने ६ अपत्ये सांभाळणे फार सोपे नव्हतेच. आपल्या मुलांसाठी अनेक गोष्टींकडे पित्याला पाठ फिरवावी लागली. आईचे प्रेम देणे वाटते तितके सोपे नव्हते.

मदर्स डे तर फार पूर्वीपासून साजरा करण्यात येतो. प्रत्येक संस्कृतीत आईचे स्थान आदर्श मानले जाते. जिथे आत्मीयतादर्शी शब्द असतात त्यात आईचा संदर्भ असतो. जसे मातृभूमी, मातृभाषा इत्यादी. मुलांच्या संगोपनात पित्याचे भावनिक योगदान दुर्लक्षित राहते. पित्याची ऊर्जा घराबाहेरच्या कामात अधिक गुंतलेली असते. पुरुषाची महत्त्वाकांक्षा व सार्वजनिक जीवन त्याला कुटुंबापासून दूर करते.

एक दिवस चर्चमध्ये मदर्स डे साजरा होत होता. त्या वेळी सोनोराला वाटले की माझ्या वडिलांनी आमच्यासाठी मोठा त्याग केलाय. आईची ममता दिली आहे. त्यांचाही सम्मान झाला पाहिजे. सोनोराने हा विचार इतरांना सांगितला. तिचा नवा विचार लोकांना पटला. त्याचे स्वागत झाले. सरकारनेही याचा स्वीकार केला व संयुक्त राष्ट्रांच्या यादीत आंतरराष्ट्रीय पिता दिनाची नोंद झाली. यात महत्त्वाची बाब म्हणजे मुलीने हा पित्याला दिलेला सम्मान आहे. मुलीचा विचार आहे. तिला तीन भाऊही होते. मात्र त्यांना हा विचार आला नाही. इंग्रजीत एक म्हण आहे. ‘मुलगा, मुलगा असतो लग्नापर्यंत आणि मुलगी, मुलगीच राहते मरणापर्यंत’. मुलीचे हृदय नेहमीच पालकांशी बद्ध राहते. आजन्म.

ज्या पित्याचे मन आईप्रमाणे कोमल व करुण आहे त्याचा यथोचित सम्मान होणे गरजेचे आहेच. पुरुषांनी अतिरेकी पुरुषत्व नाकारले व महिलेच्या मनाप्रमाणेच त्याच्याही हृदयात प्रेमाचा स्रोत निर्माण झाला. प्रेमाचा हक्क त्यालाही आईइतकाच आहे. पित्याच्या ममतेचाही योग्य मान राखला जावा. पित्याला कुटुंबापासून दूर राहावे लागत असल्याने त्याच्या स्वभावाच्या या पैलूकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र निसर्गाने त्यालाही अपत्य प्रेमासाठी तितकेच तरल मन दिले आहे. फादर्श डे निमित्त याचे अवधान समाजाला येणे गरजेचे आहे.

अमृत साधना,
आेशो ध्यानधारणा केंद्र, पुणे
बातम्या आणखी आहेत...