आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात प्रेमाची उणीव का भासते?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात प्रेम हा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. प्रत्येक माणसाला प्रेमाची तहान व त्याबद्दल आकर्षण असते, असे प्रत्येक धर्मात सांगितले आहे. कथा, कविता, चित्रपट अशा सर्वच ठिकाणी प्रेम हाच मुख्य मुद्दा असतो; पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, एवढे असूनही जगात प्रेमाची कमतरता आहे. जमीन तहानलेली असल्यास कधी ना कधी पाऊस पडतोच, पण प्रेमाची भूक भागण्यासाठी कुणाच्याही मनात ही भावना निर्माण होत नाही.

एकदम उलट वास्तव म्हणजे, द्वेष आणि घृणा. यावर कुणीही बोलत नाही. द्वेष करा, असे कुणीही शिकवत नाही. विशेष म्हणजे या द्वेषात भेसळ नसते. तो एकदम शुद्ध असतो. कुणी जर ‘तुमच्यावर प्रेम आहे’ असे म्हटले, तर आपण विश्वास ठेवणार नाही. त्याच्याकडे संशयाने पाहू. यामागील स्वार्थ, हेतू काय आहे, याचा विचार करू; पण कुणी द्वेष करू लागल्यावर अजिबात संशय येणार नाही. हे शंभर टक्के खरे असल्याचे आपण मानतो. म्हणजेच प्रेम खोटे व द्वेष खरा ठरत आहे.