आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा अॅमी पुरस्कारांत जाणवणार गेम ऑफ थ्रोन्सचा दबदबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१७ सप्टेंबर रोजी या वर्षीच्या अॅमी पुरस्कारांचे प्रसारण होईल. गेल्या दोन वर्षांपासून सर्वाधिक हिट आणि चर्चित ठरलेला गेम ऑफ थ्रोन्स या पुरस्कार सोहळ्यातून बाहेर राहील हे निश्चित. याच्या सातव्या सीझनची सुरुवात पुरस्कारांसाठी निश्चित केलेल्या वेळेनंतर झाली होती. यंदाचा विजेता प्रथमच हा पुरस्कार मिळवणारा असेल हेदेखील निश्चित आहे.  

इंडस्ट्रीमध्ये नवीन कलाकार येण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. यासोबत अॅमी टेलिव्हिजनच्या विस्तारीकरणाचेही प्रतीक आहे. सर्वश्रेष्ठ नाट्य श्रेणीत सात नामांकनांपैकी ५ शोंना त्यांच्या पहिल्या सीझनमध्ये पुरस्कारांसाठी अंतिम यादीत स्थान मिळाले होते. यंदाचा अॅमी पुरस्कार दूरचित्रवाणीच्या लोकप्रियतेची कसोटी तपासणाराही असू शकतो. नेटफ्लिक्सचे तीन शो- अमंग द क्राऊन, हाऊस ऑफ कार्ड््स आणि स्ट्रेंजर थिंग्जला सर्वश्रेष्ठ नाट्य श्रेणीच्या यादीत स्थान मिळाले आहे. २००१ मध्ये एनबीसीनंतर प्रथमच हे यश मिळाले आहे. एनबीसीची प्रतिष्ठा पूर्वीसारखी राहिली नाही. मात्र, यंदा चमत्कार घडू शकतो. त्यांचा शो दिस इज अस हा सर्वश्रेष्ठ नाट्य श्रेणीत निवडला गेला आहे. २०११ नंतर निवड झालेला पहिला ब्रॉडकास्ट शो आहे. त्याची स्पर्धा नेटफ्लिक्सच्या तीन शो आणि द हँडमेड्स टेलशी आहे. हे चारही स्ट्रिंमिंग  शो आहेत. गेल्या दहा वर्षांत केबल सिरीजच या श्रेणीत विजेती ठरली आहे. यंदा यातही बदल होऊ शकतो. दिस इज अस किंवा चारही स्ट्रीमिंग  शोमध्ये कोणी विजेता ठरले तर नवा विक्रम स्थापित होईल. विजेत्याच्या घोषणेनंतर  नेटवर्क की स्ट्रीमिंग  शो लोकप्रिय याचा निर्णय होईल. 
 
पुरस्कार कोणालाही मिळो, मात्र त्यावर गेम ऑफ थ्रोन्सची छाया कायम राहील. लॉस्टसारख्या विज्ञान कथा पूर्वी यशस्वी ठरल्या. यंदाही असे अनेक शो स्पर्धेत आहेत. वेस्टवर्ल्ड अँड्रॉइडची कथा आहे, ते आपल्या मानव मालकांशी विद्रोह करण्याचे मार्ग शोधत आहेत. स्ट्रेंजर थिंग्जमध्ये मुलांना दुसऱ्या जगात पाठवले जाते, अशी कथा आहे. द हँड्समेड टेलदेखील भविष्याची कथा आहे. काल्पनिक विज्ञानकथेवर आधारित चित्रपट ‘ब्लॅक मिरर’ला सर्वश्रेष्ठ दूरचित्रवाणी चित्रपटाचा पुरस्कार मिळू शकतो. गेम ऑफ थ्रोन्सची अनुपस्थिती पाहता हे सर्व पुरस्कार जिंकतील, अशी आशा आहे. दूरचित्रवाणीच्या परिघात सर्व छोट्या बाबी येत अाहेत याचेच हे द्योतक आहे. आतापर्यंत इतके व्यापक हे क्षेत्र नव्हते. 

महिलांची भूमिका प्रभावशाली  
यावर्षी महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. एकूण प्रेक्षक संख्येच्या ५०% महिला आहेत. द हँड्समेड टेल, बिग लिटिल नॉइजसारखे शो व त्यातील कलाकारांना नामांकन मिळाले आहे. नामांकन मिळालेल्या भूमिका महिलांच्या असून पुरुषांविरुद्ध त्या विद्रोह करतात. सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून निकोल किडमन, रीस विदरस्पूनसारख्या महिलांना नामांकन मिळाले. पुरुषांपेक्षा या अधिक लोकप्रिय आहेत. हॉलीवूडपेक्षाही दूरचित्रवाणीवर त्यांची भूमिका सतत व्यापक होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...