आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING: मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने टाळा नकळत राहणारी गर्भधारणा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकिकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालय एका पाठोपाठ एक धक्के देत असताना गॅझेटच्या जगातून एकापेक्षा एक क्रांतीकारक वृत्त हाती येत आहे. एका महिला उद्योजिकेने दावा केला आहे, की त्यांनी एक असा मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे, की जो गर्भनिरोधक गोळ्यांची जागा घेऊ शकतो. महिलांना त्यांच्या मासिक चक्राची माहितीही या भन्नाट अ‍ॅपच्या मदतीने मिळविता येऊ शकते.

३४ वर्षिय ईडा टीन एका कंपनीच्या मालकिण आहेत. त्यांचा उद्देश कुटुंब नियोजन उद्योगात क्रांतीकारक बदल आणण्याचा आहे. ६० वर्षांपूर्वी गर्भनिरोधक गोळ्यांचा शोध लागल्यानंतर या उद्योगात कोणताही मोठा शोध लागलेला नाही. प्रती वर्षी सुमारे ४४ हजार अविवाहीत मुलींना गर्भधारणा होत असल्याची बाब समोर आल्यानंतर नकळत राहणारया गर्भावर अंकूश लावण्याचे निकड जाणवू लागली आहे.

Clue नावाचे हे अ‍ॅप एक निशुल्क आयफोन अ‍ॅप आहे. युजर महिलेच्या मासिक चक्रावर हे अ‍ॅप लक्ष ठेवते. संततीसाठी केव्हा प्रणयक्रीया करावी याचीही माहिती हे अ‍ॅप देऊ शकते. संतती नियमन करायचे असल्यास त्याचीही माहिती या अ‍ॅपवर मिळू शकते. त्यामुळे नकळत राहणारया गर्भावर मर्यादा लावता येऊ शकतात.

ज्या महिलांना गर्भधारणा करायची आहे, त्यांच्यासाठी हे अ‍ॅप अतिशय उपयुक्त आहे. गर्भधारणेसाठी कोणता काळ योग्य आहे, याची माहितीही देण्याची सुविधा यात आहे.

पुढे वाचा या अ‍ॅपची कार्यप्रणाली