आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Analysis By Sanjay Parab About BJPs Performance In MNC Election

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मुसंडी; पण सत्तेपासून भाजप दूरच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यात विधानसभा-लाेकसभेत भरीव यश मिळवणाऱ्या भाजपने कल्याण-डाेंबिवली महापालिकेतही घवघवीत यश मिळवले अाहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची करत शिवसेनेला सत्तेबाहेर करण्याचा विडा उचलला हाेता. यासाठी नरेंद्र पवार, रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड हे आपले तीन आमदार आणि शेजारच्या भिवंडी ग्रामीणमधील खासदार कपिल पाटील यांना संपूर्ण ताकद देत तसेच सरकारी यंत्रणा, पोलिस यंत्रणा कामाला लावत भाजपच्या प्रचाराची एकच राळ उडवून दिली. मंत्रिमंडळातील प्रमुख नेत्यांनाही प्रचारात उतरवले. शिवसेनेची ताकद ही महापालिकांमध्ये असल्याने त्यांच्या याच ताकदीला सुरुंग लावून आपल्या मित्रपक्षाचा पाया खणून काढायचा, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केला होता. एवढ्या तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपने मागच्या नऊ जागांच्या तुलनेत यंदा ४२ जागा जिंकत मुसंडी मारली खरी; पण शिवसेनेला मागे सारत बहुमत मिळवण्याचे त्यांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. शिवसेनेनेही गेल्या वेळपेक्षा जास्तच म्हणजे ५२ जागा मिळवत ‘माेठ्या भावा’चा मान कायम राखला.

महापालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या २७ गावांचा या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने अक्षरश: खेळ केला. या गावांचा आधी पालिका हद्दीत समावेश, नंतर वगळण्याचा निर्णय घेऊन मतांची बेरीज करण्याचा प्रयत्न केला खरा; पण त्यांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. तुम्ही आम्हाला एकहाती सत्ता िदल्यास वगळण्यात आलेल्या गावांची नगरपालिका करू व कल्याण-डोंबिवलीसाठी ६५०० कोटी पॅकेज देण्याची घोषणा करत फडणवीसांनी महापालिका जिंकण्याचा जणू चंग बांधला. विशेष म्हणजे २७ गावांच्या २१ जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांिवरोधात भाजपसह सर्वपक्षीय लढत झाली. मात्र या गावांमध्ये मोठे यश मिळवून बहुमत मिळवण्याचे भाजपचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. उलट शिवसेनेने २१ पैकी ११ जागा कमावल्या हे िवशेष. भाजपला मोठे यश मिळाले ते शहरी भाग असलेल्या डोंबिवलीत. या ठिकाणी त्यांनी मनसेचे वर्चस्व मोडून काढले. मागच्या खेपेस २७ जागा मिळवणाऱ्या मनसेला यंदा ९ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या वेळेस तसेच या वेळीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपचे स्थानिक कार्यकर्ते ितकीटवाटपावरून नाराज होते. त्यातच आमदार रवींद्र चव्हाणांिवरोधात वातावरण होते. पण मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून ही नाराजी दूर केली. त्याचा फायदा भाजपला झालेल्या मतदानात िदसून आला.

संख्याबळ मात्र वाढले
फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षभरात झालेल्या स्थानिक स्वराज संंस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. भंडारा, गोंिदया जिल्हा परिषदांसह नवी मुंबई तसेच वसई-विरार महापालिकेत भाजपला मोठा फटका बसला. यामुळेच कल्याण-डाेंबिवली तसेच कोल्हापूर महापालिका मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या. यासाठी कोल्हापूरची सर्व जबाबदारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, तर कल्याण-डोंबिवलीची सूत्रे स्वत:च्या हाती घेतली. पण दाेन्ही िठकाणी पक्षाचे संख्याबळ वाढले तरी सत्ता काही मिळवता आली नाही. या निकालांनी भविष्यात फडणवीस यांच्यापुढील आव्हाने वाढलेली असतील. शेवटी सरकार चालवण्यापेक्षा तुम्ही पक्षाला निवडणुकांमध्ये किती यश मिळवून देता, यावरच पक्षात तुमचे वजन असते, हे आता फडणवीसांना लक्षात येईल.