आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिइमॅजिनिंग इंडिया: यशासाठी नव्या संधी शोधणे आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा भारतापासून वेगळे होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली, त्या वेळी सरकारसमोर देशातील राज्यांमध्ये एकजूट ठेवण्याचे आव्हान होते. त्या वेळी भारताची पुन्हा फाळणी होण्याची भीती होती; परंतु आता तसा धोका नाही, हे मोठे यश आहे. आता देश अधिक मजबूत झाला आहे. देशातील विविध भागांतील लोकांना अनुकूल विकास करण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते.
संपूर्ण देशात गुंतवणुकीसाठी एकसारखे वातावरण आहे, असे वक्तव्य करणे योग्य होणार नाही. देशातील 28 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश एक-दुस-याहून खूप वेगळे आहेत. भाषा, आहार, संस्कृती आणि विकासाचा स्तरही त्यांचा वेगळा आहे. युरोपातही असाच प्रकार आहे. काही प्रकारात गुजरात जर्मनीसारखे आहे; परंतु बिहारमध्ये तसे काहीच नाही.
जेव्हा कोणतीही कंपनी एखाद्या राज्यात गुंतवणूक करण्याचा विचार करते, तेव्हा तेथील परिस्थितीचा पूर्ण अभ्यास केला जातो. तेथील कर प्रणाली, कामगारांची मानसिकता, कायदे, पायाभूत सुविधा या गोष्टी लक्षात घेतल्या जातात.
देशात काही राज्य इतरांच्या तुलनेत नवीन संधी शोधण्यात अग्रेसर आहेत. पुढे जाण्यासाठी त्यांनी नवीन संधी शोधणे आवश्यक आहे. यश स्पर्धेसाठी प्रेरित करीत असते आणि जे मागे पडले आहे, त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते. बिहार सरकारने कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
बिहारने पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा दाखवली. सर्व राज्यांनी एकसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करायला हव्या. तेव्हाच त्या राज्यांमध्ये नवीन मोठे प्रकल्प येतील. गुंतवणुकीमुळे इनोवेशन वाढेल आणि सिस्टीममध्ये चांगले बदल होतील. हे केवळ दिल्लीहून आदेश आल्यावर होणार नाही. यासाठी त्या राज्यांनी पुढे यायला हवे. राज्यांप्रमाणे शहरांमध्येही अशी स्पर्धा निर्माण व्हायला हवी. संपूर्ण देशात नवीन शहरे केंद्र झाली म्हणजे विकासाला एकसमान संधी मिळेल. आम्हाला शेकडो, हजारो अशा शहरांची निर्मिती करावी लागेल. जेथे पाणी, वीज आणि गव्हर्नेसची समस्या स्थानिक पातळीवरच सोडवली जाईल. तंत्रज्ञानाच्या जोरावर देशात हजारो सिंगापूरची निर्मिती केली जाऊ शकते.फायबर-ऑप्टिक केबलमुळे जग खूप जवळ आले आहे. भारतालाही या तंत्रज्ञानाचा वापर
करावा लागेल. 4-जी कनेक्टिव्हिटीमुळे कोणताही व्यवसाय कुठेही बसून केला जाऊ शकतो. श्रमिकांना घरात बसूनच काम करता येईल. त्यामुळे भारतीय रस्त्यांवरील वाहतूक कमी होईल. 3-डी प्रिंटिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनाचा विस्तार केला जाऊ शकतो.
प्रत्येक घर मॅन्युफॅक्चरिंग हब होऊ शकते. तंत्रज्ञानामुळे सरकारी कारभारात सुधारणा होईल. त्यात अधिक पारदर्शकता येईल. सरकारचे ‘आधार’ हे चांगले उदाहरण आहे. त्यामुळे आयकर प्रत्येकाला भरावा लागेल. तसेच योजनेमुळे सरकारी योजनांचा फायदा लोकांना घेता येईल.