Home | Divya Marathi Special | anand sharma on foreign tour

आनंद शर्मांच्या सर्वात जास्त परदेशवार्‍या

दिव्य मराठी नेटवर्क (दिल्ली) | Update - Jun 06, 2011, 02:28 PM IST

आपले मुख्य काम परदेशवारी करण्याचेच आहे, असा मनमोहन सरकारमधील अनेक मंत्र्यांचा गैरसमज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गोष्टीवर चिंता व्यक्त होत आहे.

  • anand sharma on foreign tour

    आपले मुख्य काम परदेशवारी करण्याचेच आहे, असा मनमोहन सरकारमधील अनेक मंत्र्यांचा गैरसमज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गोष्टीवर चिंता व्यक्त होत आहे. याचा तपास केला असता आनंद शर्मा यांनी जास्तीत जास्त परदेशवार्‍या केल्या आहेत.

    वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मीटच्या केपटाऊनबरोबर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी ठिकाणी अदीस अबाबा यांच्याबरोबर आनंद शर्मा यांनी वार्‍या अनेक केल्या. यानंतर त्यांनी पॅरिसची वारीही केली आणि तेथे त्यांनी मनसोक्त सर्व पर्यटन स्थळे पाहून घेतली. तेथे झालेला खर्च त्यांच्या राहणीमानानुसारच होता. परदेश वार्‍या तर अनेक मंत्र्यांनी केल्या पण शर्मा यांच्यावरच सर्वांचा रोष आला. त्याचा परिणाम म्हणून आता परदेश वारी करताना शर्मा यांना आधी परवानगी घ्यावी लागणार आणि तेथील काम संपले की तेथे न राहता थेट परत यावे लागणार, असा निर्णय झालेला दिसतोय. त्यामुळे शर्मांना आता वार्‍यांआधी विचार करावा लागणार.

Trending