Home | Divya Marathi Special | anant kumar in politics

अनंतकुमार खलनायक नव्हेत

दिव्य मराठी नेटवर्क (दिल्ली) | Update - Jun 04, 2011, 12:56 PM IST

जेटली आणि सुषमा यांच्या भांडणात अडकले आहेत भाजप नेते अनंत कुमार. सुषमा स्वराज अनंत कुमार यांना लवकर माफ करणार नाहीत, असे वाटत होते.

  • anant kumar in politics

    जेटली आणि सुषमा यांच्या भांडणात अडकले आहेत भाजप नेते अनंत कुमार. सुषमा स्वराज अनंत कुमार यांना लवकर माफ करणार नाहीत, असे वाटत होते. मात्र, एका कार्यक्रमात त्यांनी अनंत कुमार यांच्याजवळचे आसन निवडले. कार्यक्रम सुरू असताना दोघांच्या हसत खेळत गप्पा चालल्या होत्या. त्यांच्या बोलण्यावरून असे वाटतही नव्हते की, त्यांच्यात काही बिनसले होते. मागचे सर्व काही विसरून त्यांच्या अखंड गप्पा रंगल्या होत्या. मागच्या आठवड्यात घडलेले दोघेही पूर्णपणे विसरलेले दिसत होते. या प्रकरणात जेवढेही पक्ष होते त्यांनी असे दाखवून दिले होते की, आता पक्षात कोणताच मतभेद नाही. येदियुरप्पांपासून रेड्डी बंधूंपर्यंत आणि जेटलींपासून सुषमांपर्यंत सर्वजण एकाच सुरात म्हणत होते की, कर्नाटक मुद्द्यावर केलेले वक्तव्य ते विसरले आहेत.

Trending