आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राण्यांच्या भावनांवर नव्या संशोधनाने त्यांच्या पिंजऱ्यातील वास्तव्यावर प्रश्नचिन्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा  शास्त्रज्ञ प्राण्यांच्या अंतर्गत जीवनाबाबत पहिल्यापासूनच अधिक जाणून असतात आणि जेव्हा प्राण्यांच्या अधिकाराबाबत चिंता व्यक्त केली जात असते तेव्हा काही विशेषतज्ज्ञ असा विचार करतात की, प्राणिसंग्रहालयांचे अस्तित्त्व कायम ठेवण्यासाठी मोठ्या बदलाची गरज आहे.
 
काही तज्ज्ञ अमेरिकेच्या सर्वात जुन्या असलेल्या फिलाडेल्फिया प्राणिसंग्रहालयाला आदर्श प्रमाण मानतात. तेथे झू ३६० योजनेअंतर्गत माणसांकडून प्राण्यांकडे पाहण्यासंदर्भात एक नवा अनुभव दृष्टीस पडला. तेथे सिंह, गोरीला असे प्राणी पिंजऱ्यामध्ये हिंडत असतात. याच्या भिंती जमिनीपासून फक्त काही फूट उंच अंतरावर आहेत. 
 
सिएटलमध्ये वूडलँड पार्क येथे प्राणिसंग्रहालयात हत्तींना पाहण्यासाठी मुलांची रांग लागत होती. पण आता ते रिकामे आहेत. जगातील कल्पनारम्य अशा डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेल्या प्राणिसंग्रहालयात १९८० मध्ये हत्तींना ठेवण्यासाठीची जागा २० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आली होती.
 
परंतु गेल्या काही वर्षात प्राणी अधिकार कार्यकर्ते लोकांनी आवाज उठवून अशा प्रकारच्या जागा कमी आणि अमानवी असल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे होते की, अशा जागा म्हणजे हत्तींचे नैसर्गिक रहिवासाचे स्थान नव्हे.
 
 २०१४ मध्ये एका हत्तीच्या मृत्यूनंतर ते बंद करण्यात आले. हे हत्ती दुसऱ्या जागी हलवण्यात आले. लंडनच्या रिजेंट पार्कमध्ये पहिले आधुनिक प्राणिसंग्रहालय उघडल्यानंतर अंदाजे २०० वर्षानंतर प्राणिसंग्रहालयाला अशा प्रकारचे आव्हान कधीच देण्यात आले नव्हते. अमेरिकसह जगभरात प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांना मनोरंजन, शिक्षण आणि संरक्षण या दरम्यान संतुलन ठेवणे फार जड जात आहे.
 
माणूस आणि प्राण्यांच्या सुरक्षेबरोबरच नैतिकतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. गेल्या वर्षी मे मध्ये अमेरिकेतील  सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयात एका लहान मुलाला वाचवण्यासाठी १७ वर्षाच्या गोरिलाला गोळी घातली गेली. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या पर्यावरणविषयक बाबींसंदर्भात संवेदनशीलतेचे महत्त्व सर्वांच्याच ध्यानात आले आहे. 
 
अनेक पाहण्यांमध्ये असे आढळून आले आहे की, प्राण्यांच्या प्रजाती पहिल्यापेक्षा अधिक स्मार्ट आणि भावूक आहेत. त्यांना जेव्हा निसर्गापासून वेगळे ठेवले जाते तेव्हा ते बेचैन होतात. त्यांच्या अस्तित्त्वाबाबत काही नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. म्हणजे त्यांना पिंजऱ्यात ठेवल्याने त्रास होत असेल तर तसे कैद करून का ठेवायचे? फिलाडेल्फियासाठी झू ३०० सिद्धांतांचे डिझायनर जोन को म्हणतात की, आज सर्वात चांगले प्राणिसंग्रहालयेही कैद आणि जबरदस्तीवर आधारित आहेत. 
 
प्राण्यांसाठी पुरेशी जागा सोडणे आणि त्यांच्यासाठी विशेषज्ज्ञ स्टाफ ठेवण्यासाठी सर्वच प्राणिसंग्रहालयांकडे जागा अथवा पुरेसे बजेट नाही. ओमाहा सॅनडियागो आणि ह्यूस्टनमधील प्राणिसंग्रहालयातील हत्तींसाठी चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. सॅनफ्रान्सिस्को, सिएटल आणि शिकागो येथील प्राणिसंग्रहालयांमधील सुविधा कमी असल्यामुळे तेथे हत्तींना ठेवणे बंद करण्यात आले आहे.
 
 अन्य काही प्राणिसंग्रहालयेही सिएटल तसेच अन्य शहरांकडे स्थलांतरित होऊ शकतात. मानवाधिकार कार्यकर्त्यांना प्राणिसंग्रहालयाची कल्पनाच पसंत नाही. ध्रुवीय प्रदेशातील अस्वले प्राणिसंग्रहालयात ठेवणे याच अर्थ जास्त उष्णता सहन करणे असे होय आणि हे त्यांच्या नैसर्गिक विकासाच्या विरोधात आहे. सिंहासारखे शिकार करणारे प्राणी कधीच शिकार करणार नाहीत, पण हे त्यांच्या मूळ वृत्तीच्या विरोधात आहे. दुसऱ्या बाजूला प्रिन्सटन विद्यापीठाचे प्रोफेसर पीटर सिंगर यांचे म्हणणे आहे की, काही प्रजाती बंधनात ठेवणे योग्य आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की लोकांनी त्यांना पाहण्यास यावे.
 
अपुऱ्या जागेत राहिल्यामुळे हत्तींचे मोठे नुकसान
गेल्या दहा वर्षात झालेल्या संशोधनातून असे दिसते की, बहुतेक प्राणिसंग्रहालयांमध्ये हत्तींची राहण्याची जागा फार कमी आहे. प्लॉस या वनपत्रिकेत एका पाहणीवर आधारित लेखात असे म्हटले आहे की, हत्ती जेव्हा एकमेकांत मिसळत असतात तेव्हा त्यांच्यासमोर आपले भोजन मिळवण्याचे आव्हान असते.
 
त्याचवेळी ते शोभून दिसतात. अशी अनुकूल परिस्थितीत नसेल तर हत्ती मानसिक क्षमतेवर परिणाम होतो आणि ते प्रजननासारखे पायाभूत कामही करू शकत नाहीत. अमेरिकेतील प्राणिसंग्रहालय आणि मत्स्यालय या संदर्भात जे काही नियम आहेत त्यानुसार हत्तींसाठी विशेषतज्ज्ञ माणूस ठेवला पहिजे.
 
लंडनमध्ये उघडले पहिले प्राणिसंग्रहालय
प्राण्यांना वैज्ञानिक पातळीवर समजून घेण्यासाठी पहिले प्राणिसंग्रहायल १८२८ मध्ये लंडनमधील रिजेंट पार्क येथे उघडले गेले. तज्ज्ञांनी बंद दरवाज्याआड असलेल्या प्राण्यांचे व्यवहार तपासून पाहिले. परंतु त्यानंतर विशिष्ट फी घेऊन लोकांसाठी ते खुले करण्यात आले. त्यानंतर अनेक प्रमुख शहरात प्राणिसंग्रहालये सुरू झाली होती. २०१५ मध्ये अमेरिकेत १७ कोटींपेक्षा अधिक लोकांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. १० वर्षांपूर्वी ही संख्या १ कोटी होती.
 
मानवांप्रमाणे मानसिक आजार
गेल्या काही दशकांमध्ये प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांवर झालेल्या सर्व संशोधनांनी प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवणे अनुचित असल्याचे सांगितले आहे. न्यूरॉलॉजी रिसर्चने दाखवून दिले की, माणसात आत्मचेतना ज्या रसायनांमुळे येते तिच रसायने सस्तन प्राण्यांत असतात. प्राण्यांच्या अनेक प्रजाती सामाजिक संबंधाच अनुभव घेतात. ही माहिती प्रथम नव्हती. पशू मनोवैज्ञानिकांचा निष्कर्ष आहे की, प्राण्यांनाही मनुष्याप्रमाणे मानसिक आजार होतात.
 
 
बातम्या आणखी आहेत...