आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेची सवय होईल, तेव्हाच घडेल क्रांती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी देशात ‘स्वच्छ भारत’ मोहिमेस प्रारंभ केला. मात्र ही मोहीम खरोखरच यशस्वी झाली आहे का? ही कुणा एकाच्या पुढाकाराने यशस्वी होणार नाही, पण प्रत्येक नागरिकाने अस्वच्छता पसरवणार नाही आणि पसरवू देणार नाही, असा निश्चय केल्यास कुणालाच झाडू उचलण्याची गरज नाही.

सार्वजनिक समस्येवरील उपायाचे अनेक टप्पे असतात. कारण हा विषय विविध मानसिक स्तरांतील लोकांशी निगडित असतो. सर्वप्रथम सर्व स्तरांवर नेमकी समस्या काय आहे, हा संदेश पोहोचतो. कालांतराने हळूहळू सर्वच लोकांना ही समस्या असल्याचे पटते. तसेच यासाठी इतर अनेक समस्या कारणीभूत असल्याचे कळते. यालाच जनजागृती म्हणतात. या वर्षभरात प्रचंड जनजागृती झाली आहे.
जनजागृतीनंतर सरकारी उपाययोजनांची वाट पाहिली जाते. उपक्रमास सुरुवात झाल्यानंतर लोक त्यात सहभागी होतात. यानंतरच्या टप्प्यात ही समस्या दूर करण्याची तीव्र व्याकुळता निर्माण होते. सरकार काहीच करत नाही, असा संताप होतो. परिणामी लोक स्वत:च पावले उचलू लागतात. काही ठिकाणी हा टप्पाही गाठण्यात आला आहे. यानंतर समस्या निर्माणच होऊ नये, हा विचार मनात पक्का होऊ लागतो. जसे की, या उदाहरणात अस्वच्छताच दिसू नये, हा विचार अंतर्मनात पक्का होईल, तेव्हाच खरी क्रांती होईल. त्या टप्प्यात स्वच्छता ही आपली सवय असेल. उशीर झाला तरी ही वेळ नक्की येईल.

स्वच्छ भारत अभियानाचा आणखी एक पैलू म्हणजे प्रत्येक घरात शौचालय असावे. शाळेत विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्यामुळे हजारो मुलींना शाळा अर्धवटच सोडावी लागत आहे, याची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्याचा आपण प्रयत्न करूया.

अनुषा शर्मा, २१
युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजी, आरजीपीव्ही, भोपाळ
बातम्या आणखी आहेत...