आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षित झाला विमान प्रवास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर एशियाना एअरलाइन्सच्या फ्लाइट 214च्या अपघाताचे दृश्य ज्या लोकांनी व्हीडिओवर पाहिले असेल ते शेकडो प्रवाशांच्या सुरक्षित असण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत असतील. विमानातील 307 प्रवाशांपैकी केवळ दोन जणांच्या मृत्यूने लक्षात येते की, एअर फ्रेम डिझाइन आणि वैमानिक दलाच्या सदस्यांच्या प्रशिक्षणात करण्यात आलेल्या बदलांचा किती मोठा प्रभाव पडला आहे. गेल्या दहा वर्षांत विमान अपघातांमध्ये वार्षिक सरासरी 773 जणांचा मृत्यू विमान प्रवास सुरक्षित होत जाणा-या पैलूंना अधोरेखित करते. विमान वाहतूक तज्ज्ञ अपघातांची कारणे आणि बोइंग 777च्या ब्लॅक बॉक्स तपासून पाहतील की, कोणत्या भागात सुधारणांची गरज आहे.


मजबूत कॅबिन
अमेरिका विमान वाहतूक प्रशासन (एफएए)ने कॅबिनला सुरक्षित बनवण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा केल्या. बोइंग 777 सारख्या विमानांमध्ये 400पेक्षा जास्त प्रवाशांना 90 सेकंदांत आतून बाहेर काढण्याची व्यवस्था केली जात आहे. एशियानाच्या फ्लाइट 214च्या प्रवाशांना काही मिनिटांत बाहेर काढण्यात आले. विमान जमिनीला धडकल्याने झालेल्या अपघातांमुळे कित्येक एस्केप स्लाइड कॅबिनच्या आत उघडी होती.
आगीपासून बचाव - 2003 नंतर विमानांमध्ये असे इन्सुलेशन वापरले जात आहे जाऊ लागले की, जे अधिक हळुवार जळते. यामुळे ज्वाळा कमी उठतात. सीलिंग आणि भिंतींना लावलेले पॅनल कमी ज्वलनशील पदार्थापासून बनल्यामुळे आग लागण्याचा धोका कमी झाला.
पुरेसा उजेड - कॅबिनच्या बाहेर जाण्याच्या मार्गावर पुरेसा उजेड असल्यास प्रवाशांचा निघण्याचा वेग वीस टक्के वाढू शकतो.
चांगली आसने - कमी ज्वलनशील पदार्थापासून बनवलेल्या आसनांमुुळे प्रवाशांना जळत्या विमानातून निघण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. 2009 नंतरची आसने गुरुत्वाकर्षणाच्या 16 पट आघात झेलण्याच्या क्षमतेची आहेत. हे 1952 मध्ये लागू झालेल्या 9-जी स्टँडर्डपेक्षा जास्त आहे.
ऐसपैस रस्ते - 60 पेक्षा जास्त प्रवासी क्षमतेच्या विमानात पंख्यांच्या वर तयार केलेले बाहेर पडण्याचे मार्ग रूंद ठेवण्यात आले आहेत.


चांगले सीट बेल्ट?
विमानांमध्ये छातीला बांधून ठेवणारे बेल्ट का नसतात? कार अपघातांत जास्तीत जास्त बल समांतर दिशेला असते. त्यामुळे शरीर पुढे किंवा मागे जाण्यापासून रोखणे गरजेचे आहे. विमान अपघातांत उभे पडल्यास छातीला बांधलेल्या सीटबेल्टमुळे अतिरिक्त सुरक्षा मिळेलच याची शाश्वती नाही. खरे तर ब-याच तज्ज्ञांच्या मते छातीला बांधलेले असल्यास कमी लागेल. कित्येक एअरलाइन्सच्या फर्स्टक्लास आणि बिझनेस कॅबिनमध्ये खांद्याचे बेल्ट असतात.


वैमानिकांचे प्रशिक्षण
अमेरिकेत ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक प्रवासी जेटच्या वैमानिकांना प्रतिकूल हवामान, इंजिन बिघाड व खोलउथळ जमीन यासारख्या संकटांना तोंड देण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. नव्या पिढीच्या वैमानिकांनी स्वयंचलित फ्लाइंगचा काळ येण्यापूर्वी वैमानिकांच्या कठीण अनुभवांमधून धडा घ्यावा, अशी उद्योगात जाणीव होत आहे. आता सहवैमानिकालाही कॅप्टनसारखे लायसन्स घ्यावे लागेल. पूर्वी सहवैमानिक 250 तास उड्डाणाच्या प्रशिक्षणानंतर विमान चालवू शकत होता. कॅप्टनसाठी 1500 तास प्रशिक्षणाची गरज आहे.


थकव्यावर नजर
भले तुम्ही सायकल चालवा नाही तर विमान, शरीरावर दमल्याचा परिणाम होतोच, हे संशोधनांती सिद्ध झाले आहे. 2009मध्ये बफेलोजवळ एक विमान कोसळून 50 जणांचा मृत्यू झाला. तपासाअंती कळले की, वैमानिकाच्या थकव्यामुळे अपघात झाला होता. रात्रीचे उड्डाण आणि लांब पल्ल्याच्या उड्डाणाच्या तुलनेत पुन:पुन्हा लँडिंग व टेक-ऑफ करणारे उड्डाण वैमानिकाला थकवते. विमान वाहतूक प्रशासनाने वैमानिकांचे कामाचे काही तास कमी केले. उदाहरणार्थ, सात दिवसांच्या काळात वैमानिकांना लागोपाठ 30 तासांची सुटी मिळेल. वेगवेगळ्या टाईम-झोनमध्ये उड्डाण करणा-या वैमानिकांना अतिरिक्त सुटी मिळेल.


जगभर लागू
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने 191 सदस्य देशांसाठी उड्डाण सुरक्षा नियम लागू केले. संघटनेने 1999 पासून देशांच्या ऑडिटचे काम सुरू केले. त्यात दक्षिण कोरियाने चांगले गुण मिळवले. अमेरिकेत एफएएने आंतरराष्ट्रीय संघटनेचे स्टँडर्ड पाळणा-या देशांना प्रथम श्रेणी दिली आहे. जी एअरलाइन निर्धारित स्तर गाठू शकत नाही, त्यांना द्वितीय श्रेणीत ठेवण्यात आले आहे. युक्रेन, पॅराग्वे या देशांची एअरलाइन्स या श्रेणीत आहेत.

सुरक्षा तंत्रज्ञान एशियाना विमान अपघातात मोठी जीवितहानी टाळणारी चार कारणे
तीनशे प्रवाशांचे प्राण वाचणे, हा फक्त चमत्कार नव्हे
बळकट आसने: गुरुत्वाकर्षणाच्या 16 पट दाब सोसण्यास सक्षम. तळाशी घट्ट जोडलेली आसने.
कोसळल्यावरही एशियाना 777 ची आसने हलली नाहीत. प्रवासी सुरक्षित राहिले. अशा अपघातात बहुतांश प्रवासी जागेवरच गतप्राण होतात.
अग्निरोधक : विमानासाठीचे प्लास्टिक व फायबर अग्निरोधक. त्यामुळे विमानात धूरही झाला नाही.
प्रवाशांना बाहेर पडण्यास पुरेसा वेळ मिळाला. अन्यथा अशा वेळी आगीपेक्षा धूर अधिक धोकादायक असतो.
बचाव
: अपघात झाल्यास प्रवाशांना दीड मिनिटात कसे बाहेर काढायचे, याचे फ्लाइट अटेंडंटला प्रशिक्षण.
या अपघातानंतर आग भडकण्यापूर्वीच 90 सेकंदांत सगळ्या प्रवाशांना विमानाबाहेर काढण्यात आले.
संशोधन : राष्‍ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळाच्या संशोधनामुळेच 100% सुरक्षित तंत्रज्ञान तयार झाले आहे.
46 वर्षांपूर्वी स्थापन संस्थेने विमान अपघाताचे विश्लेषण करून सुरक्षेसाठी उपकरणयुक्त डिझाइन तयार केले.