आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंती विशेष : अठरापगड जातीचे मुक्तिदाते, कुळवाडी भूषण, रयतेचा राजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवरायांच्या नावाचा वापर हिंदुत्ववादी पक्ष, संघटनाही करतात. शिवराय हिंदू होते हे खरे. परंतु त्यांनी स्वराज्य फक्त हिंदूंसाठीच निर्माण केले होते का? या प्रश्नाचाही शोध घ्यावा लागेल. शिवराय हिंदू होते येथपर्यंत ठीक आहे. परंतु शिवराय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुस्लिमांना कापत होते हा अपप्रचार कहर करणारा शिवरायांची बदनामी करणारा आहे. शिवराय जर मुस्लिमविरोधक असते तर त्यांच्या तोफखान्याचे प्रमुख इब्राहिमखान, वकिलांचे नाव काझीहैदर, घोडदळप्रमुख सिद्धी हिलाल, आरमारप्रमुख दौलत खान, पहिले सरनौबत नूरखाँन कसे? अंगरक्षक मुस्लिम हाेते सिंहासनाचे प्रमुख रक्षक मदारी मेहतर होते. शिवरायांनी एक मस्जिद पाडली नाही तरी आपण शिवरायांना मुस्लिमविरोधक म्हणणार का?

छत्रपतीशिवरायांनामराठ्यांचा राजा असे आपण म्हणतो. शिवराय मराठा होते. त्यांच्या जातीत मी जन्मलो याचाही मला अभिमान आहे. इतर मराठ्यांना असावा हेही साहाजिक आहे. परंतु शिवराय मराठ्यांचा राजा म्हटल्यावर काही लोकांना असे वाटते की, त्यांनी फक्त मराठ्यांसाठीच काम केले आहे. असा एकदा समज झाला की मग इतर लोक शिवचरित्र वाचत नाहीत आणि अठरापगड जाती ज्यांच्यासाठी शिवरायांनी धर्मप्रमुख, राजप्रमुख, वतनदार यांच्याशी संघर्ष करून अठरापगड जातींना मानसिक, सामाजिक, आर्थिक गुलामगिरीतून मुक्त करून स्वातंत्र्याची फळे चाखण्याची संधी दिली, याच जाती शिवरायांचा कळत-नकळत द्वेष करतात. मी त्यांना दोष देणार नाही. शिवरायांचे भक्त म्हणवून घेणारेच अशा प्रकारचे वातावरण निर्माण करतात. आता माझा प्रश्न असा आहे की, शिवराय फक्त मराठ्यांचे राजे आहेत का? त्याचा गांभीर्याने विचार करून निर्णय तुम्ही घ्या.

आता खरा इतिहास सांगतो. शिवपूर्व काळात वतनदारी होती. हे वतनदार आपापल्या परिसराचे, गावाचे राजेच होते. जहागिरदार, देशमुख, पाटील, जोशी, कुलकर्णी ही वतने असत. त्यात गंमत अशी म्हणजे जोशी आणि कुलकर्णी ही वतने ब्राह्मण मंडळींकडे असत उरलेले वतनदार कोणीही होऊ शकत. देशमुख, पाटील ही आडनावे नाहीत. ही वतने आहेत. पाटील म्हटले की इतरांना वाटते हा मराठाच असेल. पाटलांवर विनोद म्हणजे मराठ्यांवर विनोद असे जे लोक गृहीत धरतात त्यांना मी असे सांगू इच्छितो की, पाटील ही पदवी प्रत्येक जातीत होती. आजही लोक पाटील नाव लावतात. उदा. मराठा, ब्राह्मण, लिंगायत, जैन, माळी, धनगर एवढेच नव्हे तर मुसलमानसुद्धा पाटील आहेत. आपण फक्त त्यांना पटेल म्हणतो. देशमुखांचे असेच आहे. त्या काळात वतन मिळण्यासाठी संघर्ष, वाढले ते का? तर त्या काळी वतनदारांना सर्व गोष्टी मोफत असत. उदा. एखाद्या गावचा पाटील लिंगायत आहे तर त्याला सुताराची अवजारे, तेल्याचे तेल, कुंभाराचे गाडगे-मडके, चर्मकाराकडून खेटरे, तांबोळ्याकडून पाने, कासाराकडून पाटलीणीस बांगड्या, मातंगाकडून कासरे, चऱ्हाट, धनगराकडून बोकड फुकट मिळे. धोबी कपडे धुणे, नाभिक दाढी-कटिंग फुकट करत असे. ही पद्धत पिढ्यानपिढ्या सुरू होती.

एवढेच नाही तर कसलेही अधिकार नसलेल्या लोकांना शिवरायांनी शस्त्रे हातात देऊन क्षत्रियत्त्वाचा दर्जा देऊन मावळा बनविले. म्हणून तर अठरापगड जातीत अजूनही लोक आपल्या मुलाचे नाव आवर्जून शिवाजी ठेवतात. हा खरा इतिहास समाजासमोर येणे अत्यावश्यक आहे.
शेवटी एकच सांगतो, िशवरायांनी लढाया केल्या, किल्ले जिंकले, किल्ले बांधले म्हणून आपण शिवरायांचा आदर करतो का? लढाया तर सिकंदरनेही केल्या. जग जिंकले. त्याचे नाव माहीत आहे, पण सिकंदरचा तुमच्या घरात फोटो आहे का? त्याची गणती होते का? का नाही? कारण लढाया करणारे, जग जिंकणारे अनेक होऊन गेले. पण हे लढत होते स्वत:च्या साम्राज्यासाठी आणि शिवराय लढत होते रयतेच्या राज्यासाठी. हा दोन्हीतला फरक आहे. शिवरायांनी किल्ले जिंकले, बांधले, लढाया केल्या पण त्याहीपेक्षा शिवरायांनी या देशातील सर्वधार्मीय, जातीय, अठरापगड जाती, दीन-दलितांची मने जिंकली म्हणून शिवराय विश्वसनीय आहेत. आपणही शिवचरित्र वाचून इतिहास घडवा, हीच अपेक्षा.
पुढे वाचा, एक आज्ञापत्र असेही...
फोटो - जळगाव येथील िचत्रकार मिलिंद विचारे शिवकाळातील विविध सुवर्णक्षण साकारण्याचा प्रयत्न करीत असतात. पुणे जहागिरीत राजमाता जिजाऊ शिवबाला विविध धडे द्यायच्या. हा प्रसंग वेगळ्या पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न विचारे यांनी केला आहे.