आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांचा लक्ष्मणदा आज वायुसेनेच्या प्रमुखपदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
०अरुप राहा : वायुसेनाप्रमुख
०जन्म : 26 डिसेंबर 1954
० वडील : ननिगोपाल
० शिक्षण : सैनिक स्कूल पुरुलिया, एनडीए खडकवासला, डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्ली.
० कुटुंब : पत्नी लिली, दोन मुले
चर्चेत असण्याचे कारण - नुकताच त्यांनी वायुसेनाप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे.
डिसेंबर महिना नेहमीच त्यांच्यासाठी चांगला राहिला आहे. डिसेंबरमध्येच त्यांचा जन्म झाला. डिसेंबरमध्येच कमिशन मिळवले आणि डिसेंबर महिन्यातच त्यांनी वायुसेनाप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. कोलकाता येथे वैद्यबाती परिसरात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. दुस-या महायुद्धात त्यांनी बर्मा (म्यानमार)च्या सेनेतील जवानांचे उपचार केले होते.
वैद्यबातीमध्ये आजही लोक त्यांना अरुप लक्ष्मणदा नावानेच ओळखतात. त्यांचे वडील ननिगोपाल यांना लोक डॉक्टरबाबूच म्हणायचे. त्यांच्या मोठ्या भावानेच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत डॉक्टरी पेशा स्वीकारला. अरुपला मात्र सैन्यात दाखल व्हायचे होते.
लहानपणापासूनच ते सक्रिय होते. पुरुलिया सैनिक स्कूलमध्ये शिकायचे. जेव्हाही ते घरी यायचे काहीतरी वेगळा आविष्कार करायचे. मित्रांच्या मदतीने त्यांनी लोकांसाठी व्यसनमुक्ती अभियानही राबवले होते. तसेच इतक्या कमी वयात त्यांनी मोहन मलिक स्मृती संघ नावाने क्लबची स्थापना केली होती.
वैद्यबाती येथे त्यांचे मित्र अधीर रॉय आणि वनमाली मुखर्जी आजही त्यांची आठवण काढतात. आजही कट्ट्यावर अरुपची वाट पाहत असल्याचे ते सांगतात. एनडीएत 1973 मध्येच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर परमविशिष्ट पदक, अतिविशिष्ट पदक आणि वायुसेना पदकही मिळाले. चेन्नईच्या तांबाराम फ्लाइंग स्कूल आणि ग्वाल्हेरच्या टेक्टिस अँड कॉम्बेट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये त्यांनी जवानांना प्रशिक्षणही दिले. देशातील वायुसेनेचे 1.3 लाख जवान जगातील अत्याधुनिक वायुसेनांपैकी एक असणा-या भारतीय वायुसेनेचे प्रमुख अरुप राहा यांच्या एका इशा-याची वाट पाहत असतात.