आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेणू व आशा; इंग्रजी येत नसूनही परदेशात शिक्षण क्षेत्रात झेंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर पतीबरोबर परदेशी जाऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात यश मिळवले. केवळ दुर्मिळ लोकांना मिळणारा सन्मान त्यांना नुकताच मिळाला. अशाच दोन भारतीय महिलांची कथा या ठिकाणी दिली जात आहे. विशेष म्हणजे या दोघीही भारताच्या मागास समजल्या जाणा-या बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यांतील आहेत. दोघींचे विवाह किशोरवयातच झाले. जेव्हा त्या परदेशी गेल्या तेव्हा वाटायचे की, जीवन सामान्य महिलांप्रमाणेच संपून जाईल. कारण त्यांना इंग्रजीही येत नव्हती. पण इंग्रजी टीव्ही शोद्वारे या दोघींनी ही भाषा अवगत केली व पुढे सर्वकाही सुरळीत होत गेले.
13 व्या वर्षी शाळा सोडली, पुढे ब्रिटनमध्ये
शिक्षण घेत सर्वोच्च सन्मानही मिळवला
@आशा खेमका : प्रिन्सिपॉल, वेस्ट नॉटिंघमशायर
@जन्म : बिहारच्या सीतामढीमध्ये
@ वय : 60 वर्षे
@ शिक्षण : प्राथमिक शिक्षण बिहारमध्ये
@ कुटुंब : पती शंकर (डॉक्टर), दोन मुले, एक मुलगी
चर्चेचे कारण : नुकतेच त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी ब्रिटनच्या सर्वोच्च् सन्मानाने गौरवण्यात आले.
ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने सन्मानित होणा-या त्या दुस-या भारतीय आहेत. पण ज्या शिक्षण क्षेत्रासाठी त्यांचा हा गौरव देण्यात आला त्याबाबत त्यांनी विचारही केला नव्हता. कारण वयाच्या 13 व्या वर्षीच शिक्षण सोडावे लागले होते. गरीब राज्यात, पण चांगल्या घरात जन्मलेल्या आशा यांचे आजोबा 33 व्या वर्षीच न्यायाधीश बनले होते. त्यांचे वडील व्यावसायिक होते.
आशा 13 वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेचच त्यांच्या लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले. एक दिवस त्यांची आत्या म्हणाली की, मी तुला साडी नेसवणार आहे. का? असे विचारले तर त्या म्हणाल्या, काही लोक तुला पाहायला येणार आहेत. अचानक काही लोक आले आणि त्याच दिवशी माझा साखरपुडा झाला.
1977 ला माझ्या पतीला ब्रिटनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची फेलोशिप मिळाली. 31 जानेवारी 1978 ला तीन मुलांबरोबर ब्रिटनला आले. ब्रिटनमध्ये पहिल्या रात्री झोपले तेव्हा बाहेर बर्फ पडत होता. माझ्यासाठी ते आश्चर्यकारक होते. पण सर्वाधिक आश्चर्यकारक होती ती भाषा. मला अनेक चिंता होत्या. मला इंग्रजी बोलता येईल का ? मला मुलांचे योग्य संगोपन करता येईल का? या प्रश्नांनी मी सैरभैर व्हायचे.
टीव्हीवर कार्यक्रम पाहून इंग्रजी शिकणे सुरू केले. प्ले स्कूलमधील मुलांच्या आईबरोबर इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करू लागले. घरातही मुलांबरोबर इंग्रजीमध्येच बोलणे सुरू केले. काहीसा आत्मविश्वास आला. तोपर्यंत पतीची फेलोशिप संपली होती. पण ब्रिटनमध्ये जे स्वातंत्र्य आणि विचारांना दिशा मिळाली होती ती सोडून जाण्याची इच्छा नव्हती. घरी बसून काय करावे, म्हणून खासगी सचिवाचा कोर्स केला. पतीचीच सेक्रेटरी बनले. टीचिंगचा कोर्सही केला. त्या वेळी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये टीचर क्वालिफिकेशनचा कोर्सला फक्त सात विद्यार्थी होते. पण मी एकटीच पास झाले. त्या वेळी स्वत:वर पूर्ण विश्वास निर्माण झाल्याने ऑस्वेस्ट्री येथील कॉलेजमध्ये नोकरी मिळवण्यासाठी पोहोचले. त्यानंतर जणू भाग्याचे द्वारच उघडले होते. ऑफ्स्टेडमध्ये शाळेच्या उपप्रमुख बनल्या. मग दोन वर्षे उपमुख्याध्यापक बनल्या. नॉटिंघमशायरमध्ये मुलाखतीसाठी गेल्यावर हेच आपले कार्यक्षेत्र आहे, हे लक्षात आले. 2006 पासून येथे प्रिन्सिपल आणि चीफ एक्झिक्युटिव्ह आहेत. आशा यांच्या नेतृत्वातच कॉलेजला वेगळी ओळख मिळाली. 2008 मध्ये आशा यांनी शिक्षणापासून वंचित राहणा-यांना मदत करण्यासाठी फाउंडेशनची स्थापना केली. पाच वर्षांत शेकडो युवकांनी त्याचा लाभ घेतला आहे.