आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्डिनल्सच्या नियुक्त्या करताना पोपनी मोडली प्रथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅरेबियन देश हैतीसाठी 12 जानेवारीचा दिवस भयानक आठवणींनी वेढलेला आहे. चार वर्षांपूर्वी या दिवशी देशात झालेल्या भूकंपामुळे दीड लाख लोकांनी जीव गमावला. तरीही पोप फ्रान्सिस यांनी या दिवशी आपल्या कार्यकाळात कार्डिनल्सच्या पहिल्या गटाची नियुक्ती करताना हैतीच्या लोकांच्या दु:खाची तीव्रता कमी केली. बंदराचे शहर लेस कायेसचे आर्चबिशप चिबली लँगलोइस या गरीब देशाचे पहिले कार्डिनल बनले आहेत.
नव्या कार्डिनल्सच्या नियुक्तीच्या पद्धतीने पटवून दिले की, पोप फ्रान्सिस कसे काम करतात. पूर्वी कार्डिनल्सच्या नियुक्तीची सूचना गुपचूप दिली जायची. व्हॅटिकनवर लक्ष ठेवणारे अँड्रिया टोर्निएल्ली यांच्या मते या वेळी पोप निवडणा-या बहुतांश कार्डिनल्सला टीव्हीवर आपल्या नियुक्तीची माहिती मिळाली आहे.
बहुतांश नवे कार्डिनल्स कॅथॉलिक विश्वाचे केंद्र लॅटिन अमेरिका, कॅरेबियन, आशिया आणि आफ्रिकेचे आहेत. एकच फक्त उत्तर अमेरिकेतील (कॅनडा) आहेत. 120 सदस्यीय कार्डिनल्स कॉलेजचे सर्वाधिक सदस्य इटालियन आहेत. पोपनी फक्त चार इटालियन कार्डिनल्स नियुक्त केले आहेत. यातील तिघांचा व्हॅटिकनचे प्रशासन क्युरियामध्ये समावेश करण्यात आले आहे. कार्डिनल्स होण्यासाठी एखाद्या प्रमुख शहाराचा आर्चबिशप असणे गरजेचे नाही, हेही स्पष्ट झाले आहे. फिलिपाइन्सचे ओरलँडो क्वेवेडो मिनदानाव बेटावरील अशांत वस्तीवरील रहिवासी आहेत.