आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चॉकलेट खा अन् दीर्घकाळ लक्षात ठेवा गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅफिन स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि सजग राहण्यासाठी उपयुक्त सिद्ध होऊ शकते. अमेरिकेतील एका विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे. हे संशोधन ‘नेचर न्यूरोसायन्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
संशोधनादरम्यान 24 तासांपर्यंत 160 लोकांची पाहणी करण्यात आली. यातून जे लोक कॅफिनची गोळी घेत होते त्यांची स्मरणशक्ती चांगली असल्याचे लक्षात आले. ज्या व्यक्ती नियमित कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करत नव्हत्या, त्यांचा समावेश जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या या संशोधनात केला गेला. कॅफिनची बेस लेव्हल समजण्यासाठी त्याचे सलिवा(लाळ)चे नमुने घेण्यात आले. त्यानंतर सहभागी झालेल्यांना फोटोंची एक सिरीज पाहण्यास सांगण्यात आले. पाच मिनिटांनंतर त्यांना 200 मिलीग्रॅम कॅफिनची गोळी दिली गेली. त्यानंतर लाळेचे नमुने एक, तीन आणि 24 तासांनंतर घेण्यात आले.
दुस-या दिवशी पहिल्या दिवशी दाखवलेले फोटो ओळखण्याचे परीक्षण देण्यात आले. ज्या व्यक्तींना 200 मिलीग्रॅम कॅफिनची गोळी दिली गेली, त्यांची स्मरणशक्ती चांगली असल्याचे या संशोधनातून लक्षात आले; परंतु कॅफिनमुळे तणाव आणि बैचेनीसारखे नकारात्मक परिणामही जाणवतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.