आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिममध्ये गेल्यास डायबिटीस होणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या महिला जिममध्ये वेटलिफ्टिंगसारखी एक्सरसाइज करतात, त्यांना डायबिटीस होण्याचा धोका राहत नाही. संशोधकांनी हा निष्कर्ष एक लाख महिलांवर आठ वर्षे अध्ययन केल्यावर काढला आहे.
‘पीएलओएस’ या मेडिसिन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखात म्हटले आहे की, वेटलिफ्टिंग, प्रेस-अप्स आणि पूल-अप्स केल्यामुळे स्नायूंना ताकद मिळते. त्यामुळे डायबिटीसचा धोका कमी होण्यास मदत मिळते. वयस्कर व्यक्तींनी आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा या एक्सरसाइज करायला हव्यात. यूकेमधील डॉक्टर रिचर्ड इलियट यांनी म्हटले आहे की, डायबिटीस ‘टाइप-2’चा धोका कमी करण्यासाठी हेल्दी आहार घेणे हा सर्वात चांगला उपाय आहे. डाएटही संतुलित ठेवायला हवे आणि नियमित एक्सरसाइज करायला हवी.
एका संशोधनानुसार एरोबिक वर्कआउट केल्यामुळे हृदय आणि फुप्फुसे यांचा व्यायाम होतो. ज्या महिला आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे एरोबिक आणि एक तास स्नायूंचा व्यायाम करतात, त्यांना व्यायाम न करणा-या महिलांच्या तुलनेने डायबिटीसचा धोका कमी असतो. जवळपास एकतृतीयांश हा धोका कमी असल्याचे संशोधनातून दिसून आले. जॉगिंग, वेगाने चालणे व पोहणे यासारख्या एरोबिक अ‍ॅक्टिव्हिटीज्मुळे ‘टाइप-2’ डायबिटीसचा धोकाही कमी होतो.
‘टाइप-2’ डायबिटीस हा शरीरात इन्सुलिन बनवणारे सेल्स पुरेसे नसल्यामुळे होतो; परंतु या व्यायामामुळे शरीरात तयार झालेले इन्सुलिन कमी होत नाही, असेही डॉ.इलियट यांनी केलेल्या संशोधनातून दिसून आले.