आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांची दृिष्टहीनता टाळण्याचे अभियान डाॅ. सुभद्रांनी सुरू केले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाव : डॉ. सुभद्रा जलाली, चिकित्सक
वय- अंदाजे ५८ वर्षे
शिक्षण- एमबीबीएस
चर्चेत का- नवजात अर्भकांना होणाऱ्या दृष्टिहीनतेला रोखण्यासाठी काम
डॉ. सुभद्रा १९८८ पासून नेत्र विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मात्र रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्योरिटीची पहिली केस त्यांनी १९९७ मध्ये हाताळली. तेव्हा त्या चिकित्सा विज्ञान शिकवत असत. प्रॅक्टिसही करत. त्या काळात त्यांनी १२ प्रकरणे सतत तपासली. ही सर्व प्रीमॅच्योर अर्भके होती. ६ ते ७ वर्षे वयापर्यंत त्यांची दृष्टी गेली होती. याच्या अध्ययनासाठी त्या १९९८ मध्ये अमेरिकेला रवाना झाल्या. तेथे अध्ययन करत असताना त्यांना चकित करणारी माहिती मिळाली. मुदतपूर्व प्रसूती झालेल्या अर्भकाची रेटिनोपॅथी तपासणी जन्मानंतर एका महिन्याच्या आत केली तर त्याची दृष्टी वाचवता येते हे त्यांना कळाले.

याविषयी अध्ययन करून त्या स्वदेशी परतल्या. हैदराबाद येथील सर्व सरकारी केंद्रांमध्ये त्यांनी याची माहिती दिली. नवजात अर्भकाची देखभाल करण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये रेटिनोपॅथी तपासणी अनिवार्य केली जावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या काळात याविषयी माहिती कोठेच उपलब्ध नव्हती. देशात त्यासाठी मोजकी रुग्णालये होती. मुदतपूर्व प्रसूती झालेल्या अर्भकाला तपासण्याची इच्छा त्यांनी अनेक रुग्णालयांकडे व्यक्त केली. मात्र इतक्या लहान बालकाची तपासणी करण्यास रुग्णालयांनी नकार दिला. डॉ.सुभद्रा संशोधनासाठी हे करत असाव्यात असा त्यांना संशय होता. हळूहळू त्यांनी याविषयी जागरण केले. लोकांना याविषयी समजावून सांगितले. दरमहिन्यांत त्या ५० रुग्णालयांना भेटी देत व आपली बाजू समजावून सांगत. त्या वेळी वैद्यकीय अभ्यासक्रमात रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्योरिटी हा विषय नव्हता. देशभरात त्यांनी याचा प्रचार केला. आत्तापर्यंत ३५० डॉक्टरांना त्यांनी यासाठी प्रशिक्षित केले. दिलेल्या तारखेच्या एक महिना आधी प्रीमॅच्योर अर्भके जन्मतात. त्यांचे वजन २ किलोपेक्षा कमी असते. त्यांच्या पालकांनी याचे निदान वेळेत करण्याचा सल्ला त्या देतात. १२ हजारपेक्षा अधिक मुलांचे उपचार त्यांनी केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...