आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दिवसात 75 किंवा अधिक निर्णय देण्याचा विक्रम तीन वेळा साधला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वतंत्रकुमार / जन्म 31 डिसेंबर 1947
चर्चेचे कारण : एका प्रशिक्षणार्थी वकील महिलेने त्यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.
@शिक्षण : बीए, एलएलबी
30 डिसेंबर 2012. या दिवशी सर्वोच्च न्यायालयात एक इतिहास रचला गेला होता. हा इतिहास रचणारे होते न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार. निवृत्त होण्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी 95 खटल्यांप्रकरणी निर्णय सुनावले होते. विशेष म्हणजे ही सर्व प्रकरणे एकसारखी नव्हती, तर वेगवेगळी होती. यात दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारच्या प्रकरणांचा समावेश होता. यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ‘धार्मिक पर्यटनासाठी जाणा-यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे’ हा होता. अमरनाथ यात्रेतील मार्गात असणा-या सुविधांच्या कमतरतेविषयीच्या याचिकेवरील सुनावणीत त्यांनी हा निर्णय दिला होता.
12 जुलै 1971. न्यायमूर्ती कुमार यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. या दिवशी त्यांनी वकिलीपासून कारकीर्दीची सुरुवात केली होती. दिल्ली बार कौन्सिलमध्ये अ‍ॅडव्होकेट म्हणून त्यांनी नोंदणी केली होती. नंतर ते विविध हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर हिमाचल प्रदेश हायकोर्टात फेब्रुवारी 1983 मध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बनले. पण त्यांना ही नोकरी आवडली नाही. ऑक्टोबर 1983 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. दिल्लीला येऊन पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली. 11 वर्षे त्यांची प्रॅक्टिस चालली. 10 नोव्हेंबर 1994 ला त्यांची दिल्ली हायकोर्टात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. पण 20 दिवसांतच त्यांची पंजाब अँड हरियाणा हायकोर्टात बदली झाली. बरोबर एका वर्षानंतर 30 नोव्हेंबर 1995 ला ते सेवेत कायम झाले. 4 ऑक्टोबर 2004 ला पुन्हा ते दिल्ली हायकोर्टात परतले.
31 मार्च 2007. जस्टिस स्वतंत्रकुमार यांचा पदोन्नतीनंतरचा पहिला दिवस. या दिवशी ते बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले. येथे त्यांनी मोठे यश मिळवले. मुख्य न्यायाधीश पदावरून त्यांनी एकाच दिवसांत 80 हून अधिक प्रकरणी निर्णय सुनावले. 18 डिसेंबर 2009 मध्ये जस्टिस कुमार यांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.
8 जुलै 2010. सुप्रीम कोर्टातील आणखी एक महत्त्वाचा दिवस. या दिवशी 77 प्रकरणे आली. त्यापैकी 75 प्रकरणांचा निकाल जस्टिस कुमार यांनी सुनावला. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात एकाच दिवशी इतक्या प्रकरणांवर निर्णय दिल्याचा रेकॉर्ड नाही. केवळ जस्टिस अरिजित पसायत यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदावरून निवृत्त होताना अखेरच्या दिवशी 25 प्रकरणांवर निर्णय सुनावले होते. अनेक महत्त्वाचे निर्णय जस्टिस कुमार किंवा त्यांचा सहभाग असलेल्या पीठाच्या नावावर आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे शिक्षणाचा अधिकार कायदा योग्य ठरवण्याचा निर्णय.