आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मूड चांगला ठेवण्याचे सात फंडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रवास करताना संगीताचा आनंद घ्या
तुम्ही काम करताना प्रवास करीत असाल, तर हाय ब्लडप्रेशर आणि वजन वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रवास करताना ऑडिओ बुक किंवा संगीताचा आनंद घेऊन या आजारांच्या धोक्यापासून स्वत:ला वाचवता येईल.
ब्रेकफास्टप्रमाणे जेवणही पौष्टिक हवे
पौष्टिक आहार घेतल्यास मूड चांगला राहतो व त्यामुळे चांगले निर्णय घेण्याची क्षमता वाढते. तसेच कामात सुधारणा पाहण्यास मिळतात. याबाबत कॅनडात झालेल्या एका अभ्यासात या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. नाष्ट्यात दही, फळे यांचा समावेश केला पाहिजे. बदामासारखे अ‍ॅँटिऑक्सिडंट असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते. तसेच प्रोटीनमुळे जास्त भूक लागणार नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहील.
कामात छोटे-छोटे ब्रेक गरजेचे
बॉस किंवा कंपनीच्या व्यवस्थापनाने परवानगी दिल्यास कामादरम्यान छोटे-छोटे ब्रेक घ्या. त्यामुळे कामावर जास्त फोकस करता येतो आणि तुम्ही थोडे रिलॅक्स होतात. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधनकर्त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्याचप्रमाणे व्यायामाने कार्यक्षमता वाढवता येते.
खुर्चीवर बसून स्वत:ला असे करा रिलॅक्स
ऑफिसमध्ये रिलॅक्स होण्यासाठी अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत. ‘वेबसाइट डॉट कॉम’ या वेबसाइटवर दोन मिनिटे एक्सरसाइज करता येते. मानसिक आरोग्य आणि हृदयासाठी हे चांगले आहे. तसेच हे नियमितपणे किंवा गरजेनुसार करता येते.
आनंदी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न
दिवसातील महत्त्वाचा वेळ कार्यालयात जातो. त्यामुळे सहका-यांसोबत आपले संबंध मधुर ठेवा. तसेच त्यांच्याशी चांगली आणि सकारात्मक वर्तणूक करा. यामुळे आनंदी राहता येते व प्रकृतीही चांगली राहते.
झोपेशी कधीही तडजोड करू नका
नियमित व पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे दुस-या दिवशी नवीन जोमाने पुन्हा कामास प्रारंभ करता येतो. तसेच तुमच्या कामातही सुधारणा दिसून येते.
सीटिंग पोझिशनकडे लक्ष द्या
प्रत्येक तासाला आपल्या मानेला एकीकडून दुसरीकडे फिरवा. डोके खाली करा आणि नंतर गळा गोल फिरवा. त्यानंतर एक हात शरीराच्या वर न्या व नंतर दुसरा हातही न्या; अन्यथा प्रत्येक तासानंतर काम सोडून थोडे फिरायला जा. 15 मिनिटे चालल्याने मूड चांगला होतो. कामादरम्यान चालणे सुरू केल्यास चॉकलेट खाण्याचे प्रमाणही कमी करता येते, असे ब्रिटिश संशोधनकर्त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे सीटवर नेहमी सरळ बसा. तुमची पोझिशन की-बोर्डच्या लाइनवर असावी व दोन्ही हात खांद्यांपासून 90 डिग्रीच्या कोनात हवेत