आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

के. ए. पाॅलने बाहेर काढले क्लिंटन फाउंडेशनचे प्रकरण; स्वत:ही आरोपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाव : के. ए. पॉल, ख्रिस्ती धर्मप्रचारक
जन्म- २५ सप्टेंबर १९६३
पिता- बरनबास,
आई- संतोसम्मा
चर्चेत का - अमेरिकन निवडणूक प्रचार अभियानातील अंतिम टप्प्यात यांनी क्लिंटन फाउंडेशन मधील भ्रष्टाचार खटला पुन्हा सुरू करवला.

अमेरिकन निवडणूक प्रचारादरम्यान जुलैमध्ये हिलरी क्लिंटन यांच्या विरुद्धची क्लिंटन फाउंडेशन भ्रष्टाचार प्रकरणाची सुनावणी बंद करण्यात आली होती. मात्र २८ ऑक्टोबर रोजी पॉल यांनी न्यूयॉर्कचे माजी महापौर रुडोल्फ यांची भेट घेतली. हा खटला सुरू ठेवण्याची मागणी केली. निवडणुकीच्या ११ दिवस आधी पुन्हा यावरून वादंग सुरू करवले. यापूर्वी पॉल यांनी ट्रम्प कुटुंबीयांची भेट घेतली होती.

पॉल भारतवंशीय आहेत. आंध्र प्रदेशातील हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव आनंद किलारी आहे. त्यांच्या पालकांनी १९६६ मध्ये ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. आठ वर्षांचे असतानापासून ते आपल्या धर्मप्रसारक वडिलांसोबत विविध गावांना भेटी देत. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी पूर्णत: याच कामाला वाहून घेतले. ग्लोबल पीस मिशन नावाची संस्था आंध्र प्रदेशात स्थापन केली. आर्थिक अपहाराचे अनेक आरोप या संस्थेवर लावले गेले. बोइंग ७४७ विमान असलेले ते एकमात्र प्रचारक आहेत. परदेशी निधीच्या बळावर त्यांची संस्था सुरू आहे. २००७ मध्ये त्यांच्या संस्थेत अडचणी निर्माण झाल्या. आंध्रचे मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांनी परदेशी निधी राज्यात येण्यास बंदी घातली होती. २००४ च्या निवडणुकीत वाएसआर यांना देणगी दिली नसल्याने मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतल्याचा आरोप पॉल यांनी केला. पुराव्यांअभावी न्यायालयाने याचिका फेटाळली. पॉलने प्रजा शांती पार्टी याच काळात स्थापली.
बातम्या आणखी आहेत...