आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व ठीक नसेल तर लक्षात ठेवा या गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनात जे काही होत आहे, ते चांगले किंवा वाईट याच्याने काहीही फरक पडत नाही. आनंद हे समस्यांच्या अनुपस्थितीचे नाव नाही, तर ते समस्यांशी सामना करण्यासाठी दिलेले नाव आहे. आज तुमच्याकडे काय आहे, याकडे लक्ष द्या; आपण काय गमावले याकडे लक्ष देऊ नका. सर्व काही ठीक नसेल तर या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वाचा पुढील काही गोष्टी...
कठीण प्रसंग शिकवतात
पुढे जाण्याचा मार्ग
कधी-कधी जीवनातील दरवाजे यासाठी बंद होतात की, काही वेळ पुढे जाण्यासाठी योग्य आहे, हे समजते. अर्थात, हे अधिक चांगलेही आहे. कारण जोपर्यंत दबाव येत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. कोणत्याही कठीण काळाशिवाय उद्देशापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे अपयशाकडे दुर्लक्ष करा; त्यातून जे शिकायला मिळाले आहे ते कधीही विसरू नका. आम्हाला यशस्वी होण्यासाठी संघर्षाची गरज आहे. कारण अपयश दोन पद्धतीचे असते. एकामुळे हानी होते, तर दुस-यामुळे शिकायला मिळते.
जीवन सोपे नाही, हा विचार करून हसणे थांबवू नका
आता चांगली वेळ आहे, त्याचा आनंद घ्या. कारण ही वेळ नेहमी राहणार नाही. तसेच कठीण प्रसंगाची चिंताही करू नका. ही वेळही कायम राहणार नाही. त्यामुळे जीवन सोपे नाही, हे समजून हसणे बंद करू नका. कोणत्याही गोष्टींमुळे त्रास होत असेल तर हसणे सोडू नका. प्रत्येक वेळी नवीन सुरुवात व नवीन शेवट आहे. दुसरी संधी लवकरच मिळेल. तथापि, वेळेला अधिक चांगले करण्याची गरज आहे.
भूतकाळातील गोष्टींची पुनरावृत्ती नको
काहीच नाही करण्यापेक्षा प्रयत्न करणे आणि अयशस्वी होणे अधिक चांगले आहे. कारण अयशस्वी झालात, तर सर्व काही संपत नाही. तसेच भूतकाळातील गोष्टींचा प्रभाव भविष्यकाळावर पडू देऊ नका. भूतकाळासंदर्भात तक्रारी केल्यास येणारे भविष्य चांगले होणार नाही. बदल घडवून आणा आणि मागे वळून पाहू नका. समस्यांसंदर्भात तुम्ही जेव्हा तक्रार करणार नाहीत, तेव्हाच खरा आनंद मिळेल.
बदल तोच करा, ज्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल
जर कोणी तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला तरी हसत राहा. उत्साह आणि कामात मन लावून ठेवा. तुम्ही प्रत्येक गोष्टीला पर्सनली घेऊ नका. तुम्हाला कोणी म्हणाले की, तुम्ही चांगले नाही तर स्वत:त लगेच बदल करू नका. बदल तोच करा, ज्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल.
धैर्य म्हणजे कामाच्या ठिकाणी सकारात्मक असणे
धैर्याचा अर्थ वाट पाहणे नव्हे, तर आपले स्वप्न साकारण्यासाठी सकारात्मक वृत्ती ठेवणे हा आहे. त्यासाठी प्रयत्न करा, वेळही द्या. त्याचा अर्थ काही क्षणांसाठी आरामाकडे दुर्लक्ष करणे असाही आहे. धैर्य ठेवल्यामुळे तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मिळेल. ते मिळवण्यासाठी तुम्ही किती दृढनिश्चयी आहात हेही लक्षात येईल. यादरम्यान तुम्हाला अपयश आले तरी नंतर यश मिळणार आहे. धैर्य ठेवल्यामुळे प्रत्येक पावलावर तुम्हाला आनंद मिळेल आणि जीवनात संघर्ष राहणार नाही.