आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीमला समजून घेतो तोच चांगला लीडर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीटिंगच्या वेळी जर कुणी त्रासदायक प्रश्न विचारला तर त्याला थांबवू नका. हे व्यवस्थापकांसाठी आवश्यक आहे. टीमच्या सदस्यांना जो चांगल्या प्रकारे समजून घेतो तोच चांगला लीडर आहे. यासंदर्भातील काही टिप्स वाचा हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून.....
टिप्स
रचनात्मक भेदातूनच समोर येतात नव्या कल्पना
व्यवस्थापकाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. मतभेदातून निर्माण होणारे संघर्ष निपटण्याची गरज आणि संघर्ष टाळण्याचे स्वाभाविक कौशल्य यांच्यादरम्यान योग्य संतुलन ठेवणेही एक आव्हान आहे. अनियंत्रित संघर्षामुळे वातावरण खराब होते. अर्धवट संघर्षामुळे नुकसान होते. रचनात्मक संघर्षातून कल्पनाही तशाच येतात आणि त्यातून संस्थेला फायदा होतो. त्यामुळे रचनात्मक संघर्षाला प्रोत्साहन द्या. टीममधील सहकारी ही कल्पना, धोरण, सराव आणि प्रक्रियेशी सहमत असतीलच असे नाही, पण याची चिंता करू नका. टीमच्या सदस्यांना प्रश्न विचारा आणि बदल आणा. जर कोणी बैठकीमध्ये त्रासदायक प्रश्न विचारत असेल तर त्याला थांबवण्यापेक्षा बोलू द्या. अशा प्रसंगांमधून काही शिका आणि दुस-यालाही तसेच करण्यास उद्युक्त करा.
( स्रोत- नाइस मॅनेजर्स एम्ब्रेस कॉफि लकट, टू : रॉन व लिसा बोडेल)
एखाद्या कामाला नाही म्हणायला शिका
एखाद्याला नाही म्हणणं एवढं सोपं नाही. तुम्हाला जर रेफरन्स लेटर लिहायला सांगितले आणि जर असे लेटर तुम्हाला लिहायला तुमच्या अंतर्मनाची पे्ररणा नसेल तर नकार देण्यासाठी हे उपाय अवलंबवा.
पहिला-विनंती करणा-या व्यक्तीला जर तुम्ही नीट ओळखत नसाल तर अन्य व्यक्तीच्या हितासाठी तुम्ही नकार देऊ शकता. तुम्हाला कामाची विनंती करणा-या व्यक्तीला तुम्ही असे सांगा की, जो माणूस या कामाच्या प्रक्रियेला आणि उत्पादन आणि व्यवहार जाणतो त्याच्याकडेच ही कामाची जबाबदारी द्या. दुसरा उपाय असा - तुम्ही जर चांगला रेफरन्स देऊ शकत नसाल तर सरळ बाजूला सरका. हे काम ज्या पातळीपर्यंत पोहोचायला पाहिजे त्या पातळीपर्यंत हे रेफरन्स लेटर होणार नाही, असे तुम्ही संबंधित व्यक्तीला सांगा. हे थोडंसं कठीण असलं तरी विनंती करणा-या व्यक्तीच्या दृष्टीने हिताचे आहे.
(स्रोत - थ्री वेज टू से नो टू ए रेफरन्स रिक्वेस्ट-जोडी ग्लिकमॅन )
टॉकिंग पॉइंट्स
पॅटर्निटी लीव्हमुळे वाढते पुरुषांचे आयुष्य
मुलांची देखभाल करण्यासाठी जे पालक रजा घेतात ते अन्य लोकांच्या तुलनेत अधिक जगतात. अटलांटिक पत्रिकेत छापून आलेल्या सोशालिस्ट स्कॉट कोल्ट्रेन यांच्या अभ्यासानुसार ज्या पालकांनी आपल्या मुलांची देखभाल करण्यासाठी 1978-1979 दरम्यान रजा घेतली होती अशा लोकांच्या मृत्यूची जोखीम 2001 मध्ये 16 टक्क्यांनी कमी झाली. ज्यांनी मोठ्या सुट्या घेतल्या त्यांना फायदा झाला. मुलांसमवेत जास्त वेळ घालवल्याने पुरुषांच्या प्रकृतीवर सकारात्मक परिणाम होतो.
( स्रोत: अटलांटिक मॅगझीन)
मंदीचा परिणाम अजूनही
2007 मध्ये जी जागतिक मंदी सुरू झाली त्याचा परिणाम काही देशांमध्ये अजूनही आहे. हार्वर्डचे अर्थतज्ज्ञ कारमेन एम. रेनहार्ट म्हणतात की, विकसित देश मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर आले, पण काही विकसनशील देश अद्यापही या संकटातून बाहेर आलेले नाहीत. गुंतवणूकदार आणि अन्य देशांनी संकटाच्या काळातही अमेरिकेला पैसा पुरवल्याने अमेरिकेने चांगली सुधारणा केली. अमेरिकन राजनीतिज्ञांनी खर्च कमी करण्याचे उपाय केले नाहीत. याचा परिणाम अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांवर पडला.
(स्रोत-द न्यूयॉर्क टाइम्स)
अतिआत्मविश्वास टाळा
अतिआत्मविश्वास जोखमीचा असतो. वॉर्टन स्कूलच्या जेसिका एन. केनडी आणि त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, फार वरची पदे गाठण्यासाठी अतिआत्मविश्वास उपयोगी ठरतो, पण असे लोक वास्तवात ते पद मिळवण्यासाठी कमी सक्षम असतात. जेव्हा त्यांच्या गटाच्या लोकांना त्याच्या कामाच्या वास्तविक पद्धतीबाबत स्पष्ट माहिती मिळालेली असते तेव्हा अतिआत्मविश्वासी व्यक्तीचे त्या स्थितीत स्टेटसचे नुकसान होत नाही, असेही निरीक्षणाअंती आढळून आले.
( स्रोत: इकॉन पेपर्स )
अमेरिकेत सौर ऊर्जा लोकप्रिय होत आहे
अमेरिकेत सोलार पॅनल किं वा सौर ऊर्जा लोकप्रिय होत आहे. त्यामुळे वीज कंपन्यांची वीज विकली जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण वीज तयार करण्यासाठी जेवढे पैसे ओतावे लागतात म्हणजे विजेच्या उत्पादन खर्चात काही कमी झालेली नाही. त्यामुळे विजेचे दर वाढतच आहेत. याचा परिणाम असा झाला की, स्वस्त पडत असल्याने लोक अधिकाधिक सोलार पॅनल लावत आहेत. वीज कंपन्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. (स्रोत : द वॉल स्ट्रीट जर्नल)