आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाती अनेक, पण वाद प्रत्येक ठिकाणी ठरलेला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> जन्म : 19 नोव्हेंबर 1960
> आई-वडील : सुदेश (आई), इक्बाल नारायण मेनन (वडील), करुणा (बहीण)
> शिक्षण : शालेय शिक्षण हर्बरडेशर्स एस्केस, लंडनमधून, वॉर्विक विद्यापीठातून पदवी.
> कुटुंब : जनक राडिया यांच्याशी विवाह व घटस्फोट. अक्षय, करण व आकाश ही तीन मुले.
०नीरा राडिया : 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी
वैवाहिक जीवनाबरोबर लंडनमध्ये अनेक कामांत अपयशी झाल्यानंतर भारतात सहारा एअरलाइनसाठी लायसनिंगचे काम करणा-या नीरा यांना सर्वप्रथम राव धीरज सिंह यांचे समर्थन मिळाले. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री राव वीरेंद्र सिंह यांचे नातू धीरज हे सुब्रतो रॉय यांचे विश्वासू समजले जात होते, पण नीरासाठी त्यांनी नोकरीबरोबरच जेट एअरवेजमध्ये काम करणा-या आपल्या नवविवाहित पत्नीलाही सोडले. मुंबईच्या मरीन ड्राइव्हमधील चंद्रू पंजाबी यांच्या सीरॉक हॉटेलचा कायापालट करण्याचे काम सहारा समूह सोडल्यानंतर नीराला मिळाले. याच चंद्रू पंजाबीने ठाकरेंच्या अग्निसाक्षी चित्रपटासाठी फायनान्स केले होते. त्यात नीरा यांची महत्त्वाची भूमिका होती. 1994 मध्ये भारतात आलेल्या नीरा इतक्या शक्तिशाली बनल्या होत्या की, 2000 मध्ये बहीण करुणा हिच्याबरोबर क्राऊन एअर नावाने त्यांनी विमान सेवा सुरू केली. अनंतकुमार हवाई वाहतूक मंत्री बनल्यानंतर सर्वाधिक लाभ झाला. दोघांचे दृढ संबंध होते. त्यानंतर काँटॅक्ट क्वीन हीच त्यांची ओळख बनली. एकेकाळी सफदरजंग परिसरात रुस्तुम ए हिंद आणि अभिनेते दारासिंह यांच्या किरायेदार असलेल्या नीरा या वर्षभरातच एसोलामध्ये स्वस्तात मिळवलेल्या जमिनीवर तयार केलेल्या सुदेश फार्मस्च्या बंगल्यात स्थलांतरित झाल्या. त्यांचे सर्व काम इथूनच चालायचे. पूजेपासून सुरू झालेले हे काम रात्री उशिरापर्यंत चालणा-या हाय प्रोफाइल पार्ट्यांत बदलून देवाण-घेवाणाच्या व्यवहारापर्यंत पोहोचायचे. या पार्ट्यांमध्ये नीरा आपण धीरज यांची पत्नी असल्याचे सांगायच्या. जनसंपर्काबाबत त्या इतक्या जागरूक होत्या की, गुजरातला भूकंप आल्यानंतर वीस दिवसांत म्हणजेच, 16 फेब्रुवारी 2001 ला त्यांनी आईच्या नावाने सुदेश फाउंडेशनची स्थापना केली. मोठ्या प्रमाणावर दान, निधीची उलाढाल झाली. आजही त्यांची बहीण करुणा त्यांचे काम पाहते. कॅनॉट प्लेसमध्ये बाराखंबा रोड येथील गोपालदास भवनमध्ये त्यांचे कार्यालय आहे. रिलायन्स आणि टाटा यांचे कार्यालयही याच इमारतीत आहेत.