आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी बोलणारे असे करू शकतात पर्सनल ब्रँडिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या काळात नोकरी शोधण्याच्या नव्या पद्धती अवलंबल्या पाहिजेत. त्यासाठी सोशल मीडियाचाही उपयोग होऊ शकतो. नोकरी टिकण्यासाठी किंवा ती शोधण्यासाठी स्पॉन्सरवर अवलंबून न राहिलेले बरे. अशाच काही टिप्स हॉर्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून...
अशी शोधा नवी नोकरी
आर्थिक मंदीच्या काळात नोक-यांच्या ट्रेंडमध्ये बराच बदल झालेला दिसून येत आहे. बदलत्या परिस्थितीत नोकरी शोधताना सर्वप्रथम तुमचे तेथील स्थान काय असेल हे जाणून घ्या. तुम्हाला हवा असलेला पगार माहीत करून घ्या. दुर्दैवाने तो अपेक्षेपेक्षा कमीही असू शकतो. मंदीमुळे अशी स्थिती येऊ शकते. नोकरी मिळवण्यासाठी उपयोगी ठरेल असा स्रोत शोधा. आपल्या व्यवसायाशी निगडित लोकांशी बोला. नोकरी शोधण्याच्या जुन्या पद्धती विसरा. वृत्तपत्रांच्या जाहिरातींतून नोकरी मिळण्यास मदत होऊ शकते, मात्र आता सोशल मीडियाही नोकरीच्या संधीचा प्लॅटफॉर्म होऊ लागला आहे. त्यामुळे लिंक्डइन, ट्विटर, फेसबुक किंवा स्वत:च्या वेबसाइटवर स्वत:चे अस्तित्व दाखवा. यामुळे कंपन्यांचे तुमच्यावर लक्ष जाईल.
(स्रोत : ‘अपडेट युवर जॉब सर्च’ बाय प्रिसिला क्लेमन)
केवळ कामावर लक्ष असू द्या, त्यासाठीच्या तीन पद्धती
संयमी राहत केवळ कामावर लक्ष देण्यासाठी या तीन पद्धती स्वीकारा. पहिली, जबाबदारी सोपवा, त्यावर कमांड किंवा कंट्रोल असू नये. प्रामाणिकपणाचा खरा अर्थ समजावा या दृष्टीने लोकांना प्रोत्साहन दिले जावे हे प्रभावी लीडर्सना चांगले समजते. काम करण्याची इच्छा तसेच नेतृत्व करण्याची आवश्यकता संपुष्टात आणल्यास मायक्रो मॅनेजमेंट ख-या अर्थाने काम करू शकेल. दुसरी, दर्जावर लक्ष असावे. प्रत्येकाला काही तरी मत असते हे आपण जाणतो. मात्र, हे मत ऐकणे तेवढेच महत्त्वाचे आहे. यानंतर कामाच्या गोष्टी निवडल्या जाव्यात. तिसरी, आपण योग्य गोष्टींवर लक्ष देत आहोत हे कळण्यासाठी मीटिंगचा वेळ 20 ते 30 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. तुम्ही आणखी वेळ द्यावा, असे भेटणा-या व्यक्तीला वाटण्याइतपत उद्दिष्ट ठेवले पाहिजे.
(स्रोत : द पॉवर ऑफ रेस्ट्रेंट : ऑलवेज लीव्ह देम वाँटिंग मोर बाय अँथनी के. जान)
बोलण्याची त-हा वेगळी असली तरीही ऐकून घ्या
चांगले संवादक दुस-यांचे म्हणणे ऐकून घेण्यात नेहमीच अपयशी ठरतात हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. बोलण्याची पद्धत एकसारखी नसणे हे त्याचे मुख्य कारण. काही लोक आपले म्हणणे स्पष्टपणे मांडतात तर काही जणांना तसे मांडता येत नाही. अशा वेळी तुमचा जोडीदार तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलू इच्छित आहे, भलेही त्याला ते नीट सांगता येत नसेल. अशा वेळी शांतपणे ऐकून घ्या. बोलणे झाल्यानंतर त्याला म्हणा- तुला खूप त्रास होतोय हे मला दिसते. तुला आपले म्हणणे मांडायचे आहे, मात्र ते सांगू शकत नाही. अशा पद्धतीने त्याला सांभाळून घेतल्यास तुम्हाला धाडसी, शांत राहण्याबरोबरच एकमेकांत मिसळण्यास आणि समजून घेण्यास मदत मिळेल.
(स्रोत : हाऊ टू लिसन व्हेन युवर कम्युनिकेशन्स स्टाइल्स डोंट मॅच : मार्क)
असे वाढवा नेटवर्क
व्यक्तिमत्त्वाचे दोन प्रकार असतात. एक इंट्रोव्हर्ट आणि दुसरे एक्स्ट्रोव्हर्ट. एक्स्ट्रोव्हर्ट लोकांमध्ये आपले म्हणणे मांडण्यात पुढे असतात. ते वैयक्तिक संबंधात चांगले असतात, मात्र इंट्रोव्हर्ट आपले नैसर्गिक व्यक्तिमत्त्व कायम ठेवत पर्सनल ब्रँडिंग करू शकतात. त्यांना पुढील तीन पद्धती स्वीकाराव्या लागतील - पहिले, सोशल मीडियाचा उपयोग, ब्लॉग लिहू शकतात. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवल्यास त्यांच्याशी जोडले जाण्याची संधी मिळू शकते. दुसरे, मोठ्या गटाऐवजी एकाएका व्यक्तीला बोलून सामाजिक संपर्क वाढवता येतो. आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या विभागांच्या नव्या व्यक्तीसोबत लंच घ्या. अशा पद्धतीने नेटवर्क वाढवता येऊ शकतो. उदा. : पुरस्कार कार्यालयामध्ये भिंतीवर लावता येऊ शकतात.
(स्रोत : पर्सनल ब्रँडिंग फॉर इंट्रोव्हटर्स बाय डोरी क्लार्क)
नोकरीसाठी एकाच मध्यस्थावर विसंबू नका
शक्तिशाली मध्यस्थ (स्पॉन्सर) नोकरी टिकवण्यासाठी किंवा नवी नोकरी शोधण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. मात्र, या मध्यस्थाने अंग काढल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे गुंतवणुकीप्रमाणे स्पॉन्सरशिपही एकापेक्षा अधिक असावी. प्रत्येक स्पॉन्सर एकमेकांपासून भिन्न आणि स्वयंपूर्ण असावा. दहापेक्षा कमी लोक असलेल्या संस्थेच्या कंपनीमध्ये एक स्पॉन्सर आणि कंपनीशी संबंधित अन्य दोन असावेत. मोठ्या कंपन्यांमध्ये एक स्पॉन्सर बाहेर आणि दोन आतमध्ये असावेत. कंपनीच्या आतमध्ये एक आपल्या विभागातील, तर एक दुस-या विभागातील असावा. त्यामुळे तुम्हाला कुठलाही धोका होणार नाही.
(स्रोत : टू डायव्हर्सिफाय युवर नेटवर्क, फॉलो टू प्लस वन रूल : सिल्व्हिया)