बर्मिंगहॅम, अलास्काची सोळा वर्षी शाळकरी विद्यार्थिनी मार्ली किंग मित्रांना सांगू इच्छित होती की, ती तिच्या भावाला महाविद्यालयाच्या वसतिगृहातून परत येताना पाहून किती आनंदी आहे. दोन वर्षांपूर्वी टेक्स्ट मेसेज पाठवून ती असे करू शकत होती. मात्र, आता तिला त्याची गरज वाटत नाही. त्याऐवजी त्यांनी आता फोटो मेसेजिंगचा वापर केला आहे. दरदिवशी पन्नास ते शंभर मेसेज पाठवणा-या किंगने स्नॅपचॅट अॅपच्या माध्यमातून मित्रांना भावाबद्दलची माहिती दिली.
फोटो मेसेजिंगला मोबाइल कम्युनिकेशनचे भविष्य मानले जाऊ शकते. लोकांकडून आता पूर्वीसारखे टेक्स्टिंग करत नाही. एका टेलिकम्युनिकेशन रिसर्च फर्मचे कन्सल्टंट चेतन शर्मा यांच्या मते अमेरिकन सेलफोन वापरणारे प्रत्येक तिमाहीत 628 टेक्स्ट मेसेज पाठवतात. हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा आठ टक्के कमी आहे. इकडे मोबाइल फोनचा फोटो घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम डायरेक्टशी फारसा परिचित नसलेला अॅप किक व विकरने पिक्टर मेसेजिंगला खूप सोपे केले आहे.
फोटो मेसेजिंगचा सर्वात जास्त उपयोग किशोर आणि वीस वर्षांपेक्षा जास्त वयाची मंडळी करते; पण हे सगळ्यांसाठीच लाभदायक आहे. फोटोसोबत मेसेजने केलेला संवाद चांगल्या पद्धतीने स्पष्ट होतो. मिशिगन विद्यापीठात टेलिकम्युनिकेशनचे प्राध्यापक स्कॉट कँपबेल सांगतात, पूर्वी कधी असे मानवामध्ये संवाद, संपर्क झाला नव्हता. स्नॅप-चॅटर दरदिवशी 35 कोटी फोटो आणि व्हीडिओ पाठवतात. हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 600 टक्के अधिक आहे. वायरलेस आणि आयमेसेजसारख्या मोबाइल मेसेजिंग सेवांद्वारे अब्जावधी फोटो वेगळे पाठवले जात आहेत. हॉर्वर्ड विद्यापीठातील युवा आणि माध्यम प्रकल्पाचे संचालक सांड्रा कोर्टेसी म्हणतात, मुलांना टायपिंगचा कंटाळा आहे असे नाही. कित्येकदा लोकांना वयक्तिक आणि खासगी इमेज शेअर करायला आवडते.
येणा-या काळात फोटो मेसेजिंग आणखी लोकप्रिय होईल.
टेक्स्टिंग आणि सोशल नेटवर्किंगची सुरुवात तरुणांच्या शौकाखातर झाली होती. आता सर्व वयाचे लोक आणि कंपन्या संपर्कासाठी याचा वापर करू लागले आहेत. इन्स्टाग्रामची मालकीण फेसबुकने गेल्या वर्षी फोटो-मेसेजिंग अॅप बनवायचा प्रयत्न केला होता. स्नॅप-चॅटचा त्याचा क्लोन पोक 2012 मध्ये काहीच हालचाल करू शकला नाही. यावर फेसबुकने नोव्हेंबरमध्ये स्नॅप-चॅटला 185 अब्ज रुपयांत खरेदी करण्याचा प्रयत्न केला; पण त्याला यश आले नाही. या खेळात दबदबा टिकवण्यासाठी फेसबुकची नवी खेळी इन्स्टाग्राम डायरेक्ट आहे. मॉर्निंग स्टारमध्ये विश्लेषक रिक समर लिहितात, फेसबुकला चिंता आहे की, लोक ज्या सोशल नेटवर्कमध्ये भाग घेत आहेत, त्याच्या बाहेर जाऊन नेटवर्क बनवत आहेत. ट्विटरनेही आपल्या इंटरफेसवर युजरला फोटो मेसेज पाठवण्याची सोय केली आहे.
फोटो मेसेजिंगशी अनेक मुद्दे संबंधित आहेत. अनेक लोक मान्य करतात, गंभीर विषयांसंबंधी फोटो मेसेज पाठवले जाऊ शकत नाही. पूर्ण प्रक्रिया हलके फुलके संवादापुरती मर्यादित आहे. मोठे आव्हान तर व्यवहाराशी संबंधित आहे. यातून पैसे कमावले जाऊ शकतात का? 309 कोटी खर्च करूनही स्नॅप-चॅट पैसे कमावत नाही. तसे काही सेकंद अस्तित्वात राहणा-या एक्सप्लोडिंग कूपनची आयडिया सादर केली आहे. जपानमध्ये लोकप्रिय चॅट अॅप लाइन काही पैसे कमावते. तो संदेशासाठी स्टिकर विकतो. ते प्राथमिक अवस्थेत आहे.
फोटो मेसेजिंग वाढण्याची काही कारणे
० फोटो समोर असल्यामुळे माहिती देण्याची गरज पडत नाही की तुम्ही कुठे आहात आणि काय करत आहात ?
० मेसेजिंग अॅपवर पिक्चरला स्टिकर, टेक्स्टने आकर्षक रूप देणे शक्य आहे.
० फोटो मेसेजिंगमध्ये अस्थिरतेचे तत्त्व आहे. स्नॅप-चॅटवर फोटो काही क्षणांत दिसेनासे होऊन जातात.
० स्नॅप-चॅटवर प्रत्येक दिवशी 35 कोटी फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यात येतात.
टेलिमार्केटिंगमध्ये रोबोटची वाढती भूमिका
डेनव्हर निक्स, फोनच्या दुस-या टोकाकडून येणा-या आवाजात आकर्षण आहे. आरोग्य विमा योजना घेण्याचा आग्रह करताना ती आपले नाव सामंता वेस्ट सांगते. ‘तू खरोखर माणूस आहे की रोबोट?’ असे विचारल्यावर ती हसते. टोमॅटो सूपची रेसिपी विचारल्यावर सांगते की, प्रश्न कळला नाही. खरे म्हणजे वेस्ट एक रोबोट आहे आणि रोबोट नसल्याची बतावणी करते. ती टेलिमार्केटिंगचे भविष्य होऊ शकते. तिचा वापर करणारी कंपनी प्रीमियर हेल्थ प्लान्सचे जॉन रासमेन सांगतात, ती रिमोट कंट्रोलने चालणा-या कारसारखी काम करते. अमेरिकेत कॉल सेंटरमध्ये बसलेली एक व्यक्ती तिला चालवते. एखाद्या महिलेच्या आवाजात वेगवेगळ्या स्वरूपातील विविध प्रश्नांची उत्तरे अगोदरच रेकॉर्ड करून ठेवण्यात येतात.