आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुराणा हॉर्वर्डमध्ये भारतीय वंशाचे तिसरे डीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
@राकेश खुराणा : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ
@जन्म : 22 नोव्हेंबर 1967
@ आई - वडील : अंजना, राम खुराणा, दोन भाऊ - प्रदीप व हरीश खुराणा
@ कुटुंब : स्टेफनी (पत्नी), मुले - सोनिया, नलिनी, जय.
@ शिक्षण : कॉर्नेल येथून पदवीधर, हॉर्वर्डमधूनच ऑर्गनायझेशनल बिहेव्हियर मध्ये पीएचडी.
भारतात जन्मलेले राकेश अमेरिकेतच लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांचे वडील अनेक वर्षांपूर्वी तिकडे जाऊन स्थायिक झाले होते. ते ग्रीनविच कॉनमध्ये सिरॅमिक टाइल्स कंपनीत नियंत्रक होते, तर आई पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका होती. राकेश जेव्हा कॉर्नेलमध्ये पदवीचे शिक्षण घेत होते, तेव्हा त्यांची भेट स्टेफनी यांच्यासोबत झाली होती. स्टेफनी या अमेरिकेत हॉरवूडमध्ये राहणा-या रिटा व ट्रेंट रॉल्सन यांच्या कन्या होत. त्या वेळी राकेश आपल्या आई-वडिलांसोबत रिजफिल्ड, कॉनमध्ये राहत होते. दोघांनीही आई-वडिलांच्या संमतीने 13 जुलै 1996 रोजी विवाह केला. लग्न ख्रिश्चन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीने झाले. स्टेफनीच्या वतीने रोमन कॅथॉलिक प्रिस्ट होते, तर राकेश यांच्या आई-वडिलांनी पंडित नारायणदत्त शर्मा यांना विवाहाचे सर्व विधी पूर्ण करण्यासाठी बोलावले होते. लग्नाच्या एक महिना आधीच स्टेफनी यांना एमबीए आणि जनधोरणे या विषयांत मास्टर डिग्री मिळवली होती.
राकेश भारतीय वंशाचे तिसरे विद्वान आहेत. ज्यांना या संस्थेत डीन म्हणून नियुक्ती मिळाली आहे. एका दशकापूर्वी वेंकी नारायणमूर्ती हॉर्वर्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डीन होते. त्यांच्याशिवाय नितीन नोहारिया हेही हॉर्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन होते.
शिक्षणतज्ज्ञ म्हणून नावारूपाला येण्याआधी राकेश केंब्रिज टेक्नॉलॉजी पार्टनर्सचे सदस्य होते. डॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिकवण्याची संधी मिळाली. तेथे सहा वर्षे शिकवल्यानंतर ते हॉर्वर्ड स्कूल ऑफ बिझनेसशी जोडले गेले. त्यांचे संशोधन मॅनेजेरियल लेबर मार्केटशी संबंधित होते. त्यामुळे नव्या बदलत्या अर्थव्यवस्थेत या संशोधनाचे महत्त्व खूपच जास्त होते. 2007 मध्ये त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे शीर्षक ‘फ्रॉम हायर एम्स टू हायर्ड हँड्स : द सोशल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अमेरिकन बिझनेस स्कूल’ असे होते. यात तेथील समाजशास्त्राची झलक पाहायला मिळते.
याशिवाय त्यांनी ‘सर्चिंग फॉर कॉर्पोरेट सेव्हियर : द इरेशनल क्वेस्ट फॉर करिज्मेटक सीईओ’ हे पुस्तकही लिहिले आहे. लीडरशिप एक्स्पर्ट म्हणूनही त्यांना ओळखले जाते. या पती-पत्नीने अनेकांना कंपन्या स्थापन करण्यास मदत केली आहे. नितीन नोहारिया यांच्यासोबत वर्ल्ड इकॉनॉमी फोरमसाठीही ते काम करतात. त्या दोघांनी मिळून हँडबुक ऑफ लीडरशिप थेअरी अँड प्रॅक्टिसचे संपादन केले आहे.