आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्यामुळे जिवंत आहे प्रजासत्ताक: तीन कुटुंबांचे गौरव, आज देशाचा अभिमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदा जरूर सजेल डॅरिलने आणलेला ख्रिसमस ट्री!
गेल्या वर्षी डॅरिल यांनी स्वत:च्या उंचीएवढे ख्रिसमसचे झाड आणले होते. यंदा त्याला खूप सजवण्याचा संकल्प त्यांनी केला होता. पत्नी ज्योती यांनी ख्रिसमसच्या दिवशी आपल्या वेदना लपवत मुलांना ख्रिसमस साजरा करण्यासाठी आई-वडिलांच्या मंगलोर येथील घरी पाठवले होते. ख्रिसमस ट्रीला त्यांनी सांभाळून ठेवले आहे. पुढल्या वेळी सजवण्यात येणार आहे. गेल्या ख्रिसमसला डॅरिल यांनी सांताक्लॉजचा पेहराव खरेदी केला होता. त्या वेशातच डॅरिल संपूर्ण इमारतीमध्ये भटकले आणि भेटवस्तू, चॉकलेटचे वाटप केले. दरवर्षी आपण असे करू, असे डॅरिलने म्हटले होते.
हवाई दलाच्या नवीन वर्षाच्या पार्टीत डॅरिल आणि ज्योती सर्वात जास्त वेळ नृत्य करत असत. 2013 चे स्वागत दोघांनी रात्री उशिरा 3 वाजेपर्यंत नृत्य करून केले होते. मित्र त्यांना कॅस्टो असे संबोधत. फेसबुकवर प्रोफाइल बनवताना डॅरिलला मी नाव सुचवले होते दयावान. ज्योती यांना ही गोष्ट आजही आठवते. नंतर प्रोफाइल दयावान कॅस्टो अशी बनली होती.
ज्योती सांगतात, उत्तराखंडला जाताना ते गंमतीने म्हणाले होते की, देशाच्या सेवेत जात आहे. शौर्य पुरस्कारासाठी त्यांचे नाव पाठवण्यात आल्याचे नंतर हवाई दलाकडून ज्योतीला कळवण्यात आले. हेलिकॉप्टरचा ढिगारा हटवण्यात आला, तेव्हा सर्वात अगोदर डॅरिलच्या मृतदेहाची ओळख पटली, त्याच्या गळ्यातील साखळीमुळे. तो तुकडा ज्योती नेहमी सोबत ठेवतात. डॅरिल आणि ज्योती यांच्या विवाहाला दहा वर्षे झाली होती. आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी दोन्ही मुलांना शेजारील घरात टीव्ही पाहताना समजली होती. अथर्व आणि उष्मा या मित्रांनीच ही माहिती दिली. अथर्व आणि उष्मा हे त्यांच्या वडिलांच्या कमांडिंग ऑफिसरची मुले आहेत. बातमी ऐकल्यानंतर रडायला आले होते, असे इथन सांगतो. दुस-या दिवशी सकाळी मम्मी पॅकिंग करू लागली. म्हणू लागली, आपल्याला मुंबईला जायचे आहे. मी विचारले, आपण बॅकरपूर वापस येणार ना? त्यावर मम्मी म्हणाली, हो. परंतु ती खोटे बोलत होती. आम्ही तर येथे मुंबईतच राहिलो. मुंबईमध्ये येऊन इथनने आजीला विचारले होते, सगळे का म्हणतात, माझे पापा अमर झाले म्हणून?
अँजेलिनाने भाजी खाणे बंद करून टाकले. अगोदर पापा काठी घेऊन बसत होते आणि भाजी खाऊ घालत होते. आता मम्मी आग्रह करते, तेव्हा ती इन्कार करते. घराची डोअरबेल वाजते, तेव्हा तिला वडिलांची खूप आठवण येते.