आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका ऐकून घ्या, बरेच शिकायला मिळेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण कंपनीचा भाग बनावे यासाठी लागणारा उत्साह तरुण व नव्या कर्मचा-यांमध्ये जागवणे आवश्यक आहे. टीका ऐकून घेणे जड जाते, मात्र यातून काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. यासंदर्भातील महत्त्वाच्या टिप्स हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून...
तरुण कर्मचा-यांना सीनियर लीडर्सशी यासाठी जोडा...
तरुण पिढीतील कर्मचारी जास्त वेतनाची आशा बाळगून असतात. त्यांच्यात कामाची सवय कमी असते. मात्र, त्यांच्यासोबत कसे काम केले जावे, हे आधी समजून घ्यावे. तसेच कंपनीचा भाग बनावे अशी वृत्ती जागवण्यासाठी, शिकवण्यासाठी एखादी कार्यशाळा घेतली जावी. तसे केल्यास नेतृत्व विकसित होण्यास मदत मिळू शकेल. त्यांच्यातील क्षमता क्रॉस-जनरेशन मेंटरिंग प्रोग्रॅममार्फत सीनियर लीडर्सशी जोडता येऊ शकेल. तरुण कर्मचारीही भरती प्रक्रिया, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, नवे ट्रेंड्स आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीला चालना देऊ शकतील. तरुण कर्मचा-यांना प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमामुळे फायदा मिळेल, त्याचबरोबर मॅनेजर्ससोबत काम करण्याची संधीही मिळू शकेल.
(स्रोत : यू आर प्रॉबेब्ली राँग अबाउट मिलेनियल्स : डेन शॉबेल)
मेंदूला थकवा येण्यापासून वाचवा, कामातून ब्रेक घ्या
अ‍ॅथलिटपासून पियानोवादकापर्यंत जागतिक दर्जाचे प्रतिस्पर्धी प्रत्येक चार तासांच्या सरावात खूप घाम गाळतात. शारीरिक व मानसिक ऊर्जा कायम राहण्यासाठी ते उर्वरित वेळ मोकळा घालवतात. विश्रांती नसेल तर आपला मेंदू शून्यावस्थेत जातो. यामुळे चिडचिड आणि थकवा जाणवू लागतो. दिवसा थोडी विश्रांती केल्यास मेंदू सक्रिय होतो आणि उर्वरित वेळी संपूर्ण ऊर्जेनिशी काम करतो. तुम्हाला डुलकी घेता येत नसेल तर माइंडफुलनेस मेडिटेशन करा. भारोत्तोलनातून जेवढा मानसिक फायदा मिळतो, तेवढाच तो यातून मिळतो.
व्हर्च्युअल टीम जेवढी लहान, तेवढे चांगले निष्कर्ष
व्हर्च्युअल टीम तयार करणे गरजेचे असते. याचे कारण म्हणजे टीम तुमच्यासमोर नसते आणि त्यांना जास्त स्वातंत्र्य असते. व्हर्च्युअल टीम करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा : पहिली, चांगली व्हर्च्युअल टीम आकाराने लहान असावी. 10 पेक्षा जास्त लोक नसावेत. 4 किंवा पाच असतील तर आणखी चांगले. टीम मोठी असल्यास संवादाच्या दृष्टीने आव्हान वाढू शकते. संवाद तुटल्यास विश्वास लवकर उडायला लागतो. दुसरी, टीमच्या प्रत्येक सदस्याचे उत्तरदायित्व स्पष्ट असावे आणि त्यांची कामगिरीची मोजमाप करण्याची पद्धत एकसारखी असावी.
वर्षभर वेगवेगळ्या लोकांकडून फीडबॅक घ्या
टीका ऐकून घेणे कठीण असते, मात्र वैयक्तिक विकास आणि यशासाठी त्याच्यातील महत्त्वपूर्ण गोष्टी शिकून घेणे आवश्यक ठरते. टीका ऐकून घेतल्याने फीडबॅक प्राप्त करण्याची क्षमता बळकट करणे शक्य आहे. टीकेतून जास्तीत जास्त शिकण्यासाठी काही जण फीडबॅक मूल्यांकन (उदा :10 पैकी 4 रेटिंग) सांगतात, तर काही कोचिंगला ( उदा. तुम्ही तुमचे काम कसे सुधारू शकता?) महत्त्व देतात. फिडबॅकमद्ये कोचिंग ऐका. मूल्यमापनावर लक्ष केंद्रीत करा. थेट प्रश्न विचारायचे टाळा, त्याऐवजी असे विचारा - चांगले करता येईल असे कोणते काम करताना तुम्हाला पहायला आवडेल? असे केल्यामुळे तुम्हाला अधिक अचूक आणि ठोस माहिती मिळू शकेल.
(स्रोत : फाइंड द कोचिंग इन क्रिटिसिझम : शेला आणि डगलस स्टोन)
टॉकिंग पॉइंट्स
सार्वजनिक वाहतुकीतील बदलाचा उलटा परिणाम
चिलीच्या सेंटियागोमध्ये कारचा वाढता वापर कमी करण्यासाठी बस आणि सबवे मार्गावर मोठे बदल करण्यात आले. मात्र, त्याचा उलट परिणाम झाला. 2007 मध्ये लागू हब अ‍ॅँड स्पोक सिस्टिमच्या कारणामुळे लोकांना येण्या-जाण्यासाठी सरासरी 13 मिनिटे जास्त लागू लागली. यामुळे कराची मागणी दुप्पट वाढली. खासगी वाहनेही 5 टक्क्यांहून 8 टक्के झाली. कार्बन मोनोऑक्साइडचा स्तर वाढून 27 टक्के झाला.
(स्रोत : जर्नल ऑफ पब्लिक इकॉनॉमिक्स)
चिनी लोकांना खाऊ घातली जात आहेत अनावश्यक अँटिबायोटिक्स
चीनमध्ये किरकोळ सर्दी-पडसे झाल्यासही अनावश्यक अँटिबायोटिक्स सर्रासपणे दिली जात आहेत. रुग्णालयांकडून रुग्णांना त्याची थेट विक्री करण्यात येत आहे. येथील डॉक्टरांचा बोनसही औषधांच्या महसुलावर अवलंबून असतो. किरकोळ सर्दी किंवा पडशाची तक्रार घेऊन रुग्णालयात जाणा-या दोन तृतीयांश रुग्णांना अँटिबायोटिक्स लिहून दिली जातात. काही वेळा तर गंभीर आजारासाठी दिली जाणारी अँटिबायोटिक्स लिहून दिली जातात. यामुळे रुग्णांचे आर्थिक नुकसान होते, शिवाय साइड इफेक्ट्सची जोखीम वाढू शकते. प्रिन्सटनच्या जेनेट क्युरी आणि त्यांच्या पथकाने यासंबंधीचा अभ्यास केला आहे. (स्रोत : जर्नल ऑफ पब्लिक इकॉनॉमिक्स)