आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सुरक्षाकवच बनलेली पहिली महिला अधिकारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाव : सुभाषिणी शंकरन, आयपीएस
वय- जवळपास ३२
वडिल- जगदीशन शंकर, आई- गृहिणी संपूर्णा, बहीण - मीनाक्षी
शिक्षण- ठाण्याच्या शाळेतून, सेंट झेवियर्समधून समाजशास्त्रात पदवी, जेएनयूतून समाजशास्त्रात एमफिल.
कुटुंब- पती - वरुण सिहाग (मुंबईत लेखक)
चर्चेत का- आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी यांना सोपविली गेली आहे.

मूळच्या दक्षिण भारतीय असलेल्या सुभाषिणी यांची मुळे तंजावूरच्या कुंभकोणम येथे आहेत. त्यांचे आजोबा नाना एम राजगोपालन यांनी १९५० मध्ये दोन पत्रिका सुरू केल्या होत्या. एक मोटर इंडिया आणि दुसरी टेक्स्टाइल मॅगझिन. दोन्ही अद्यापपर्यंत सुरू आहेत. नोकरीच्या निमित्ताने १९८० मध्ये त्यांच्या वडिलांना मुंबईत यावे लागले. सुभाषिणीचे लहानपण मुंबईतच गेले. २०११ मध्ये त्या आयपीएस अधिकारी झाल्या. त्यांची एक बहीण अमेरिकेत आंत्रप्रेन्योर आहे.

देशात ही पहिलीच संधी आहे की, कोण्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी कोण्या महिला अधिकाऱ्यावर सोपविली गेली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा करणे काही सोपे नाहीच. १८ ते २० तासांचे हे काम असते. दहशतवाद आणि जातीयवादाने हे राज्य प्रभावित असल्याने इथे नेहमी व फारच चौकस राहावे लागते. मुख्यमंत्री कोणत्या मार्गाने जाणार आहेत आणि कुठे त्यांना जायचे नाही हे त्याच ठरवत असतात. यास केवळ योगायोगच म्हणता येईल की, त्यांनी एमफिलमध्ये आपला लघु शोधप्रबंध दहशतवाद आणि महिला यांच्यावरच केंद्रित केले होते. यात लिट्टेच्या आत्मघाती तुकड्यांवर संशोधन केले गेले होते. यादरम्यान त्यांना ही गोष्टदेखील सखोलपणे जाणून घेता आली की, कोणकोणत्या परिस्थितीतून महिला या दहशतवादाकडे वळतात. त्यांच्या घरात त्याच पोलिस अधिकारी आहेत. त्यांचे वडील एका खासगी कंपनीत औद्योगिक सुरक्षा विभागात होते आणि आई गृहिणी. दिल्लीत एका मित्राच्या ओळखीतून वरुणची भेट झाली, ज्यांच्याशी सुभाषिणीने विवाह केला. वरुण ‘मोहेंजोदडो’ चित्रपटाचे लेखक राहिलेले आहेत.
(जसे त्यांनी दैनिक भास्करला सांगितले)
बातम्या आणखी आहेत...