आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लॅनर चांगले पण राबवता येत नसल्याने व्यवसायात अपयशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
@यश बिर्ला : बिर्ला समूहाचे प्रमुख
चर्चेचे कारण : त्यांच्या देशभरातील संस्थांवर नुकतेच आयकर विभागाने छापे मारले. तसेच कुलाब्याच्या रहिवाशांनी त्यांच्यावर 2 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.
@आई-वडील : सुनंदा व अशोक
@शिक्षण : पदव्युत्तर (वाणिज्य), विधी विषयात पदवी, नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीत शिक्षण
@कुटुंब : पत्नी अवंती, एक मुलगा व एक मुलगी
त्यांची जीवनशैली इतर बिर्लांप्रमाणे नसून हाय फॅशनची आहे. बॉडी बिल्डिंगमध्ये रस असणारे यश थाटामाटात जगतात. त्यांनी संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवून घेतले आहेत. त्यांच्याकडे पणजोबा रामेश्वर दास यांनी दिलेली अफाट संपत्ती आहे. 20 कंपन्यांचे मालक असणारे यश दरवर्षी 3 हजार कोटींचा व्यवसाय करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कंपन्यांची कामगिरी फारशी चांगली नाही. त्यामुळे काही चांगल्या लोकांनी त्यांची कंपनीही सोडली आहे.
मुंबईच्या मलबार हिल्ससारख्या परिसरात 2 एकरमध्ये पसरलेला त्यांचा बंगला सध्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे. आपली लहान बहीण प्रियंवदा हिच्या संपत्तीसाठी ते लोढा परिवाराशी भांडत आहेत.
एकाच वयोगटाचे असल्याने त्यांची कुमारमंगलम बिर्ला यांच्याबरोबर तुलना केली जाते. लाइफस्टाइलपेक्षाही विविध विषयांत त्यांना अधिक रस असल्याचे त्यांचे सहकारी सांगतात. काही जणांच्या मते तर यश हे बिर्लांमध्ये सर्वात चांगले प्लॅनर आहेत. मात्र, अंमलबजावणीत ते मागे पडतात. कुमारमंगलम यांच्याप्रमाणेच अत्यंत कमी वयात त्यांना बिर्ला समूहाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती. त्यांचे वडील अशोक आणि आई सुनंदा यांचा 1990 मध्ये एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या यश बिर्ला समूहाच्या विकासाची गती कमी असल्याचे त्यांचे मत आहे. पण त्याची कौटुंबिक कारणे आहेत. त्यांना टीम तयार करण्यासाठीच आठ-नऊ वर्षे लागली होती.
आपल्या इमेजच्या मेकओव्हरसाठी त्यांनी सॅची अँड सॅची कंपनीला काम दिले आहे. त्यामुळे त्यांची तुलना कधी रिचर्ड ब्रेनसन, तर कधी मल्ल्यांबरोबर केली जाते. स्वातंत्र्याची आवड असणा-या यश यांनी त्यांच्या तिन्ही मुलांनाही हे स्वातंत्र्य दिले आहे.