आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात उंच व लांब स्लाइड निर्मितीचा जनक : कलाकार अनीश कपूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्यांचा जन्म मुंबईत झाला. वडील नौदलात हायड्रोग्राफर होते आणि आई ज्यू होती. अनीश यांनी डेहराडूनच्या डून स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. हा काळ त्यांच्या पसंतीस उतरला नाही. दोन भावांमध्ये मोठे अनीश एकदा आईसोबत इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घ्यावी, असे त्यांना वाटले. मात्र, गणित अवघड वाटल्याने त्यांनी सहा महिन्यांत या शिक्षणाचा नाद सोडला आणि नंतर १७ व्या वर्षी त्यांनी ब्रिटनच्या हॉर्नसे कॉलेज ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांची भेट पॉल नेगू यांच्याशी झाली.

पॉल यांनी केवळ एक गोष्ट सांगितली- कला म्हणजे आपल्या इच्छेची अभिव्यक्ती आहे. अनीश यांनी हीच गोष्ट मनात घेतली. पॉल त्यांचे कधी रोल मॉडेल झाले समजलेही नाही. सात वर्षे आपल्या कलेची साधना करणाऱ्याच अनीश यांना १९८० मध्ये पहिल्यांदा यश मिळाले. हे त्यांचे जॉमेट्रिक किंवा बायोमार्फिक शिल्प होते. यामध्ये त्यांनी ग्रेनाइट आणि संगमरवराचा वापर केला होता.

सात वर्षांनंतर त्यांनी पहिल्यांदा दगडावर आपले विचार कोरण्यास सुरुवात केली. यानंतर सात वर्षांनी त्यांनी स्टेनलेस स्टीलवर काम केले. २००९ मध्ये गेस्ट आर्टिस्टिक डायरेक्टर ऑफ ब्रिजटन फेस्टिव्हल झालेले ते पहिले व्यक्ती होते. आपल्या हयातीत रॉयल अकॅडमी ऑफ आर्टमध्ये प्रदर्शन भरणारे ते पहिले कलाकार आहेत. अार्सेलर मित्तल ऑर्बिट ही त्यांचीच निर्मिती आहे. लंडनच्या क्वीन एलिझाबेथ ऑलिम्पिक पार्क स्ट्रेटफोर्डमध्ये स्थापन झालेल्या या कलाकृतीची लांबी ३७६ फूट आहे. ही जगातील सर्वात लांब स्लाइड आहे. २०१२ च्या ऑलिम्पिकनंतर ते बंद करण्यात आले आणि त्यावर पुन्हा सुरू करण्यात आले. २०१६ मध्ये त्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यांची कृती क्लाऊड गेटची नक्कल चीनमध्ये करण्यात आली आहे. अनीश यांनी स्टेनलेस स्टीलपासून त्याची बनावट केली आहे. शिकागोमध्ये त्याची स्थापना केली आहे. २००४ ते २००६ मध्ये त्याची निर्मिती झाली आणि शिकागोतील ते सर्वात मोठे आकर्षण ठरले. ३० कलाकारांच्या कलाकृतींतून याची निवड करण्यात आली होती. १५ मे २००६ रोजी शिकागोमध्ये ती स्थापन करण्यात आली होती.
जन्म : १२ मार्च १९५४
शिक्षण : डून स्कूल, हॉर्नसे कॉलेज ऑफ आर्ट लंडन.
कुटुंब : सुसेन स्पिकेल (कलाकार), दोन मुले ईशान आणि अल्बा.
चर्चेत : त्यांनी तयार केलेल्या क्लाउड गेटची नक्कल चीनने केली आहे.