आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशासाठी जिंकलेले रौप्यपदक काढून घेतल्यानंतर वीटभट्टीवर मजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघर्ष | शांती सौंदर्यराजन, धावपटू
जन्म : १७ एप्रिल १९८१
शिक्षण : पुुदुकोट्टईच्या कला महा. तून बी.ए.

चर्चेत का? : दहा वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना अॅथलिट प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.

चार वर्षांपूर्वीची गोष्ट. एक युवती दक्षिण भारतात विटांच्या भट्टीवर मजुरी करत होती. तप्त उन्हात ती आपल्या आई-वडिलांसह उदरनिर्वाहात मदत करत होती. आठ तास संपल्यानंतर तिला २०० रुपये मिळत. आई-वडील आणि ती मिळून ६०० रुपयांत घर चालवत असत. हा नित्याचा दिनक्रम. दोहा येथील आशियाई स्पर्धेत धावण्यात तिने रौप्यपदक मिळवले आहे, असे तिला पाहून कोणीही म्हणू शकत नव्हते. तिचे नाव शांती सौंदर्यराजन. हे कसे घडले, असा विचार येतो. पण पदक जिंकल्यानंतर काही दिवसांनी शांतीची लिंगचाचणी झाली. तिच्यात पुरुषांचे गुण जास्त आहेत, असे त्यात आढळले.

त्या आधारावर तिचे पदक काढून घेण्यात आले. दक्षिण आफ्रिकेची केस्टर सेमेन्याचीही अशीच चाचणी झाली होती. त्या वेळी तिचे बर्लिन जागतिक विजेतेपदात सुवर्णपदक हुकले होते; पण संपूर्ण दक्षिण आफ्रिका तिच्या पाठीशी उभी राहिली आणि केस्टर लंडनच्या ऑलिम्पिकमध्ये दक्षिण आफ्रिकेची ध्वजवाहक होती, पण शांतीला कोणीही साथ दिली नाही. शांतीच्या चाचणीचा अहवाल आला आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी सचिव ललित भानोत यांनी तिला फोनवर सांगितले की, आता तुला खेळू दिले जाणार नाही. गावातही ती चेष्टेचा विषय ठरली. शांतीने आत्महत्येचाही प्रयत्न केला, पण तिच्या एका मित्राने तिला उलट्या झाल्याचे पाहिले आणि तिला रुग्णालयात दाखल केले. अखेर शांतीचे प्राण वाचले. तिचे आई-वडील वीटभट्टीवर काम करत. तिच्या आजोबांनी तिला धावण्यास प्रोत्साहन दिले. १३ वर्षांची असताना आजोबांनी तिच्यासाठी बूट खरेदी केले होते. जेव्हा ती शाळेत जाऊ लागली तेव्हा घरची स्थिती चांगली नव्हती. आठवीत असताना तिने अनेक पदके जिंकली. तामिळनाडूसाठी तिने ५० पेक्षा जास्त पदके जिंकली. आशियाई स्पर्धेत गेली तेव्हा आई-वडिलांनी शेजाऱ्यांच्या घरी टीव्हीवर तिची कामगिरी पाहिली. त्यानंतर लिंग चाचणी आणि संघर्ष सुरू झाला. २०१४ मध्ये तिच्या मदतीला गोपीशंकर आणि वनाती श्रीनिवास हे वकील आले. त्यांनी शांतीचे प्रकरण केंद्रापर्यंत पोहोचवले.
रौप्यपदक विजेते केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनीही या प्रकरणात लक्ष घातले.
चाचणीमुळे तिला सरकारी नोकरी मिळत नव्हती. त्यासाठी प्रयत्न झाले; पण काही जमले नाही. गोपीशंकर आणि श्रीनिवास यांनी मद्रास उच्च न्यायालयातही त्यासाठी अर्ज दिला आहे. शांतीच्या विनंतीवर विचार करावा, असे न्यायालयाने गेल्या वर्षी तामिळनाडू सरकारला सांगितले होते. त्यामुळेच राज्य सरकारने शांतीला क्रीडा विकास प्राधिकरणात प्रशिक्षक बनवले आहे. तिचे दरमहा वेतन ३० हजार रुपये असेल.
बातम्या आणखी आहेत...