जगात गेल्या १५ वर्षांत फक्त तीन वेळा आण्विक चाचण्या झाल्या. मात्र, हा धोका प्रचंड वाढला आहे. भारताकडे सध्या ९० ते ११०, तर पाकिस्तानकडे सुमारे ११० अण्वस्त्रे आहेत.
१९४५ मध्ये पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर झाला. तीन दिवसांत झालेले दोन हल्ले पहिले आणि शेवटचेच. यानंतर जग अण्वस्त्र प्रसारबंदीसाठी सरसावले. मात्र, शीतयुद्धाच्या काळात अण्वस्त्रनिर्मितीची प्रचंड स्पर्धा होती. १९६२ मध्ये तर सर्वाधक आण्विक चाचण्या घेण्यात आल्या. फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आणि सोव्हिएत संघाने एकूण १७८ चाचण्या घेतल्या. म्हणजे एक दिवसाआड चाचणी. नंतर स्थिती सुधारली.
६० च्या दशकात ७०६ आण्विक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. सन २००० ते २०१५ मध्ये मध्ये केवळ तीन चाचण्या झाल्या. गेल्या दोन वर्षांत तर एकही अणुस्फोट चाचणी झालेली नाही. आजवर २०५५ आण्विक चाचण्यांपैकी १०३२ चाचण्या एकट्या अमेरिकेने घेतल्या. तर, भारताने आतापर्यंत तीन वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अणु हल्ल्याबाबतची काही त्थ्ये...