आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटी डॉक्टर दांपत्यात मालमत्तेवरून कौटुंबिक कलह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. विरल देसाई, कॉस्मेटिक सर्जन, डॉ. सेजल, स्त्रीरोगतज्ज्ञ
वय- ४५ वर्षे 
वडील- डॉ. रमेश, आई- डॉ. सरला  
शिक्षण - एलटीएमएम कॉलेज मेडिकल स्कूल, सायनहून पदवी. 
कुटुंब- पत्नी सेजल, एक मुलगा, एक मुलगी   
चर्चेत का - त्यांच्या डॉक्टर पत्नीने घरात प्रवेशासाठी पोलिस, वकिलाला बोलावले. 

डॉ. विरल देसाई हे सेलिब्रिटींचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, चित्रपट अभिनेता गोविंदा यांचे हेअर ट्रान्सप्लांट केले होते. याशिवाय अनेक सेलिब्रिटींचे लायपोसक्शन, अतिरिक्त चरबी काढणे, नाक-आेठांची सर्जरी, हनुवटीची सर्जरी केली आहे. डॉ. विरल देसाई सुशिक्षित कुटुंबातले आहेत. त्यांचे वडील रेडिअोलॉजिस्ट होते आणि आई डॉ. सरला या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या पालकांनी १९७० मध्ये सांताक्रुझला सरला रुग्णालय सुरू केले होते. हे लोकप्रिय  आहे. लहानपणीच सर्जन होण्याचे त्यांनी निश्चित केले होते. लहानपणापासून ते सेजल अजमेराला आेळखत होते. योगायोगाने त्यांचे शिक्षणही एकाच महाविद्यालयातून झाले. 
 
‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील प्रसूतीच्या दृश्यात व्हॅक्यूम क्लीनरने प्रसूती केल्याचे दाखवले आहे. ही संकल्पना डॉ. सेजल यांची होती. या कल्पनेसाठी चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी स्वत: जाऊन सेजल यांचे आभार मानले होते.  

दोन वर्षांपूर्वी डॉ. सरला, मुलगा विरल आणि त्याची पत्नी डॉ. सेजल सरला रुग्णालय सांभाळत होते. ऑगस्ट २०१५ मध्ये डॉ. सेजल यांनी पती विरल यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवली. त्यांनी घटस्फोटाचा अर्जही न्यायालयात दाखल केला. त्यानंतर दोघे विभक्त झाले. डॉ. सेजल आपल्या पालकांच्या अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहू लागल्या. डॉ. विरल आपल्या जुहू येथील घरात राहत. 
 
डॉ. सेजल आपल्यासोबत आपल्या १० वर्षीय मुलीला घेऊन गेल्या. मुलगा वडिलांजवळ राहत होता. मुलाची बारावी बोर्डाची परीक्षा असल्याने डॉ. सेजल यांना मुलासोबत राहायचे होते. डॉ. विरल यांनी त्यांना घरात प्रवेश दिला नाही तेव्हा त्यांनी पोलिस आणि वकिलाची मदत घेतली. 

डॉ. विरल यांचे म्हणणे आहे की ती स्वत: घर सोडून गेली होती. आधी तिने मला घरातून निघून जाण्यास सांगितले. मी हॉटेलमध्ये राहू लागलो. मात्र संपत्तीवरून ती सारखी वाद घालत असे. एक दिवस विरल घरी आले तर ती मुलीला घेऊन निघून गेली होती. देसाई कुटुंबाचा जुहूमध्ये बंगला असून त्याची किंमत कोट्यवधी आहे. त्यामुळेच वाद उद््भवल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
 
बातम्या आणखी आहेत...