आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे, नद्या जलवाहिन्यांनी जाेडा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या काही क्षेत्रातील धरणात विपुल प्रमाणावर जलसाठा हाेताे, धरणाची साठवण क्षमता संपल्यानंतर पाण्याचा विसर्ग करणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे कितीतरी प्रमाणात पाणी वाया जाते. हा अपव्यय टाळण्यासाठी उंचावरची धरणे पाटाएेवजी भूमिगत जलवाहिनीद्वारे कमी उंचीवरच्या धरणासाेबत जाेडण्याची याेजना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करायला हवी. विशेषत: अापल्या देशातील भाैगाेलिक परिस्थिती या धरण जाेड प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी अाहे.
 
शेतकरी सुखी तर जग सुखी, असे म्हटले जाते. मात्र अाज घडीला बळीराजा म्हणून गाैरविला जाणारा शेतकरी सुखाच्या क्षणांनाही पारखा हाेत चालला अाहे. त्याचे नेमके कारण दळणवळणाच्या पुरेशा पायाभूत सुविधांचा, शेतीसाठी पुरेशा पाण्याच्या स्राेतांचा अाणि विजेचाही अभाव हेच अाहे. अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा मानल्या जातात. यापैकी पहिल्या दाेन गरजा शेतीसाठी अत्यावश्यक ठरतात. महाराष्ट्रातील शेती पावसाच्या भरवशावर अवलंबून अाहे. ऋतुचक्र व्यवस्थित असले तर काेरडवाहू शेती भाग्याेदय करते. परंतुु गेल्या ५० वर्षांचा अाढावा घेतला तर ऋतुचक्रातील सततच्या बदलामुळे शेती अातबट्ट्याचा व्यवहार ठरत चालला अाहे. एकेकाळी शेतकरी धूळ पेरणी करायचा अाणि धान्याच्या, कपाशीच्या राशीवर लाेळायचा; अलीकडच्या काळात धूळ पेरणी तर इतिहासजमा झाल्याचे दिसते. पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणे फारसे अाशादायक राहिलेले नाही. म्हणूनच पावसाच्या पाण्याच्या थेंब अन् थेंब साठवणे, जमिनीत जिरवणे हाच नेमका उपाय फलदायक ठरू शकताे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मागचा संदर्भ देखील हाच अाहे. पाणी अडवण्यासाठी धरणांची अाणि बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात अाली अाणि अजूनही हाेत अाहे, मात्र याेग्य ठिकाण अाणि समायाेजनेचा मेळ बसत नसल्यामुळे एकूणच सगळा खटाटाेप जणू ‘अरण्यरुदन’ ठरत अाला हे खेदाने नमूद करावे लागते. राज्यातील जलसिंचन प्रकल्पांसाठी अक्षरश: पाण्यासारखा पैसा अाेतला गेला मात्र सिंचनाचे प्रमाण तुलनेने अगदीच नगण्य ठरते. एकमात्र खरे की, भविष्याचा वेध घेऊन जलस्राेतांचे संवर्धन करायला हवे तसेच त्या पाण्याचे वितरणदेखील याेग्य पद्धतीने हाेते तितकेच गरजेचे अाहे. 

नदीजाेड प्रकल्पावर अलीकडच्या काळात बराच काथ्याकूट केला जात अाहे, मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या पंचवार्षिक याेजनेतच या प्रकल्पाची सुरुवात झाली असती तर अातापर्यंत बरेच काही साध्य हाेऊ शकले असते. मात्र नदीजाेड प्रकल्पाचे भिजत घाेंगडे अजूनही जैसे थे पडून अाहेत. गरज नसताना, नकाे त्या ठिकाणी माेठमाेठी धरणे बांधण्याच्या अट्टाहास राजकारण्यांनी धरला. शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी पाण्याखाली घातल्या मात्र अद्यापपर्यंत त्यांचे याेग्य पुनर्वसन हाेऊ शकले नाही. म्हणूनच सध्या जी उपलब्ध धरणे अाहेत त्यांची अांतरजाेडणी करण्याचा प्रकल्प सरकारने हाती घ्यायला हवा. ज्याची खरच गरज अाहे. राज्यातील जनतेचे व्यापक हित लक्षात घेऊन स्थानिक नेत्यांनी यात राजकारण अाणायला नकाे. अन्यथा हमरीतुमरीचे राजकारण सुरू झाले तर महाराष्ट्राचे नंदनवन हाेण्याएेवजी वाळवंट व्हायला फार वेळ लागणार नाही. सध्या काही क्षेत्रातील धरणात विपुल प्रमाणावर जलसाठा हाेताे, धरणाची साठवण क्षमता संपल्यानंतर पाण्याचा विसर्ग करणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे कितीतरी प्रमाणात पाणी वाया जाते. हा अपव्यय टाळण्यासाठी उंचावरची धरणे पाटाएेवजी भूमिगत जलवाहिनीद्वारे कमी उंचीवरच्या धरणासाेबत जाेडण्याची याेजना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करायला हवी. अापल्याकडील परिस्थितीचा विचार करता लघु, मध्यम अाणि माेठी धरणे यामधील अंतर सरासरी ५० कि.मी. च्या अासपास दिसून येते. प्रगत देशात या जाेडणीसाठी हजार किलाेमिटर अंतराचा सुद्धा अंतर्भाव केलेला असून या याेजना जगजाहीर हाेणार नाहीत, यासाठी फार माेठी काळजी घेतलेली दिसते. विशेषत: अापल्या देशातील भाैगाेलिक परिस्थिती या धरण जाडी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी अाहे. चढाकडून उताराकडे गुरुत्वाकर्षणाचा उपयाेग करून पाणी वळवणे सहज शक्य अाहे. ज्या ठिकाणी हे शक्य नसेल तेथे साैरपंंपांचा वापर करून टप्प्याटप्प्याने पाणी चढवणे शक्य हाेऊ शकते. यामुळे धरणाने धाेक्याची पातळी अाेलांडली म्हणून पाण्याचा विसर्ग करण्याची येऊन ठेपणारी वेळ सहजपणे टाळता येईल. तसेच पाणी, जिवीत अाणि मालमत्तेची हानी देखील टाळता येईल. 

नद्या सुद्धा अशाप्रकारे जलवाहिनीचा वापर करून भूमिगत पद्धतीने जाेडता येऊ शकतात. अनुकूल भाैगाेलिक स्थितीचा फायदा घेऊन केवळ गुरुत्वाकर्षणाचा उपयाेग करून जास्त पाणी असणाऱ्या उंचावरील नद्यामधून सखल क्षेत्रात कमी उंचीवरील नद्या अाणि इतर अाेहाेळात पाणी वळवता येऊ शकते. जास्तीत जास्त क्षेत्राला सिंचनासाठी, उद्याेगांसाठी व पिण्यासाठी पाण्याचा मुबलक पुरवठा करता येणे शक्य हाेईल. माेठी धरणे बांधून शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी संपादित करून पाण्याखाली गमावण्यापेक्षा तसाच नदीवर काही विशिष्ट अंतरावर ठिकठिकाणी छाेटेछाेटे बंधारे बांधणे अत्यंत उपयुक्त अाणि किफायतशीर ठरू शकतात. पूर्वनियाेजन जर सुयाेग्यप्रकारे केले तर असे बंधारे सहजपणे एकमेकांशी जाेडता येऊ शकतात. सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला हवा. परिणामी सर्वांनाच पाण्याचे समान वाटप करणे शक्य हाेईल. शेतकरी शेतीला याेग्य प्रकारे पाणी देऊ शकतील. दुबार, तिबार पेरणीच्या दुष्टचक्रातून त्यांची सुटका हाेईल. उद्याेगांना उद्याेगांसाठी तर शहरांना पिण्यासाठी पाणी पुरवता येईल. शहरे स्मार्ट बनवण्यासाठी कितीही प्रयत्न हाेत असले तरीही मुळात पाण्याविना शहरांना स्मार्ट चेहरा मिळणार नाही हे तितकेच खरे.

 डाॅ. विनाेद पाटील, अकाेला.