आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगप्रसिद्ध हिरे व्यावसायिकावर आयकर विभागाची धाड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीरव मोदी, हिरे डिझायनर
वय - ४७ वर्षे  
शिक्षण - व्हार्टनमधून ड्रॉपआऊट.  
वडील : दीपक मोदी (हिरे व्यावसायिक), पत्नी : अमी, ३ मुले : रोहिन, अपाशा, अनन्या. 
चर्चेत का?-  त्यांच्या घरावर आणि प्रतिष्ठानांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे.  

२०१० मध्ये मंदीचा काळ होता आणि प्रत्येक क्षेत्र संघर्ष करत होते. त्या वेळी एका भारतीय ज्वेलरने १२.२९ कॅरेटचा गोवळकोंडा हिरा लावलेला नेकलेस तयार केला. त्यात ३६ हिरे होते. तो हाँगकाँगमध्ये होणाऱ्या प्रसिद्ध क्रिस्टी लिलावात ठेवण्यासाठी तयार केला होता. या लिलावात नव्या डिझायनरला प्रवेश दिला जात नाही आणि या डिझायरने एक वर्षापूर्वीच हिरे डिझायनिंग सुरू केले होते; पण त्यांचे डिझाइन पाहून त्यांना प्रवेश देण्यात आला आणि तो नेकलेस १६.५ कोटी रुपयांत विकला. भारताच्या एखाद्या व्यक्तीला या लिलावात सहभागाची परवानगी मिळाल्याचा हा पहिलाच प्रसंग होता. नीरव आपल्या आजूबाजूतूनच कलेसाठी प्रेरणा घेतात. आपल्या मुलीच्या मनगटावरील इलॅस्टिक बँड पाहून त्यांच्या मनात हिऱ्याचा पट्टा डिझाइन करण्याची कल्पना आली.
  
मोदी यांचे आजोबा केशवलाल हेही हिरे व्यावसायिक होते. ते मूळचे गुजरातच्या पालनपूरचे होते. त्यांनी १९३० ते १९४० च्या दशकात सिंगापूरमध्ये व्यवसाय स्थापित केला होता. त्यांचे वडील दीपक मोदींनी तो वाढवला आणि जगात हिऱ्यांची राजधानी मानल्या जाणाऱ्या अँटवर्पला जाऊन व्यवसाय सुरू केला. दीपक यांचे बालपण अँटवर्पमध्येच गेले. त्यांना संगीत शिकण्याची इच्छा होती, पण घरात नेहमी हिरे आणि त्याचे कटिंग, डिझायनिंग याचीच चर्चा होत असे. 

जेवणाच्या टेबलवरही हीच चर्चा असे. नीरवला व्हार्टनमध्ये शिकण्यास पाठवले, पण पैशांची अडचण असल्याने शिक्षण मध्येच सोडावे लागले. १९९० मध्ये नीरव भारतात आले आणि मुंबईत गीतांजली जेम्सशी जोडले गेले. ही फर्म त्यांचे मामा मेहुल चौकसी यांची आहे. तेथे ९ वर्षे कामातील बारकावे शिकल्यानंतर त्यांनी स्वत: काम केले आणि वाटचाल सुरू केली. आज देशात त्यांच्या ५० पेक्षा जास्त शोरूम आहेत. प्राप्तिकर विभागाने मोदींच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत.