आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह मावळू लागल्यास या पाच बाबी ध्यानात घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामाप्रती एकाग्रता कमी होऊ लागली, उत्साह मावळू लागला व अनेक प्रयत्न करूनही उत्साही वाटत नसेल तर याचा गांभीर्याने विचार करा. महिलांनाही ही समस्या उद्भवते.

अनेक महिला माझ्याकडे येतात. त्यांच्या अशा प्रकारच्या समस्या असतात. मी त्यांना काही प्रश्न विचारते. तुम्हाला सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो? तुम्हाला सकाळपासूनच कामाचा उत्साह नसतो का? जीवनात काही आनंद वा प्रेरणाच नसल्यासारखे वाटते का? या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असेल तर तुम्हाला हमखास बर्नआऊटने ग्रासले आहे.

बर्नआऊट म्हणजे काय?
बऱ्याच काळापासून आपल्याला तणाव असेल तर त्याचा परिणाम शरीर व मनावर होतो. तणावामुळे वर्तनात होणाऱ्या बदलांना वर्तनशास्त्रात बर्नआऊट म्हणतात. बर्नआऊट हा तणावापेक्षा वेगळा असतो. तणाव सर्वांनाच असतो. मात्र अति तणावामुळे आपले नाते, मित्र व इतर घटकांशी संबंध बिघडू लागले तर त्याला बर्नआऊट म्हणतात. याला दूर करता येते. या चार यशस्वी पद्धतींनी बर्नआऊटवर नियंत्रण मिळवा.

पॉज बटण दाबा
बर्नआऊटशी निपटण्यासाठी पहिला उपाय म्हणजे तुम्ही या समस्येने ग्रस्त आहात, याची पडताळणी करणे. नव्याने प्राथमिकतांची निवड करणे. थांबून थोडा विचार करा. काय उपाय असू शकतो. खासगी व व्यावसायिक सीमांची निश्चिती करा. प्रत्येकाला आनंदी ठेवणे ही तुमची जबाबदारी नाही याची जाणीव तुम्हाला होईल.

सपोर्ट सिस्टिम
वैद्यकीय गरज म्हणून काही रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवले जाते. त्याचप्रमाणे बर्नआऊटच्या वेळी आपल्याला इतरांच्या सहकार्याची गरज असते. हे सहकार्य कुटुंबातील एखादा सदस्य किंवा व्यावसायिक उपचार तज्ज्ञाचेही असू शकते.

क्रिएट मी टाइम
स्वत:साठी वेळ काढण्याची आपल्याला गरज वाटत नाही. तसा विचार आपण करतो. मात्र प्रत्यक्षात स्वत:साठी वेळ काढत नाही. प्रत्येक सहा महिन्यांत एका आठवड्याची सुटी अवश्य घ्या. आठवड्यातून ३ वेळा स्वत:साठी वेळ नक्की काढा.

तीन ‘ई’ उपयुक्त
एक्सरसाइझ, ईटिंग, एनर्जी हे तीन ई अत्यंत उपयुक्त आहेत. हा उपाय सोपा आहे. व्यायाम केला तर भूक व्यवस्थित राहते. ऊर्जा निर्माण होते व बर्नआऊटचे प्रमाण कमी होते. आपल्यापैकी अनेकांना धावणे व पोहणे या दोन्हींची आवड नसते. काय केल्यास तुम्हाला बरे वाटेल, हे जाणून घ्या. छंद जोपासल्यानेही ऊर्जा मिळते. आर्ट शो, नाटक, नृत्य इत्यादींनी उत्साह वाढतो. बर्नआऊटवर मात केल्यावर आयुष्यातील संथपणा निघून जातो. जीवन ताशी १०० किमी वेगाने धावल्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.