आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटी फॅशन - खास पार्टीच्या पोशाखांचे करण जोहरचे नवे कलेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चित्रपट निर्माता करण जोहर हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नाव आहे. त्यांच्या आरमानी बेल्टच्या बॅनरखाली अनेक सुपरहिट चित्रपट तयार झाले व लोकप्रियही ठरले. करण यांच्या चाहत्यांची संख्याही अफाट आहे. निर्माता-दिग्दर्शक करण हे उत्तम फॅशन डिझायनरही आहेत. त्यांच्या नव्या कलेक्शनविषयी...
‘स्टुडंट - ऑफ द इयर’ या चित्रपटासाठी अभिनेत्री अलिया भट्ट हिचे सर्व पोशाख करण जोहरने स्वत:च्या पसंतीप्रमाणे तयार करवून घेतले होते. सगळ्या ड्रेसचा लूकही त्यानेच फायनल केला होता. करिना कपूरच्या ड्रेसेसलाही यापूर्वी करणनेच स्पेशल लूक दिले आहेत. करण जोहर त्यांच्या चित्रपटात काम करणा-या बहुतांश अभिनेत्रींच्या ड्रेसला स्वत: फायनल टच देतात.
करणने नुकतेच प्रसिद्ध युरोपियन कलेक्शन स्ट्रीट लेबल-वेरो मोडासाठी डिझायनिंग सुरू केले आहे. अभिनेत्री कंगना राणावतसोबत मार्की नामक मर्यादित कलेक्शन करणने रँपवर उतरवले होते. यात कंगना शोज स्टॉपर होती. फॅशनचे पडद्यामागचे बारीकसारीक पैलू करणला जास्त आकर्षित करतात. त्याच्या लेटेस्ट कलेक्शनमध्ये स्पार्कल, शिमर व गोल्डन फॅब्रिकचा अधिक वापर झाला आहे. आत्मविश्वासाने फॅशनला आपलेसे करणा-या महिलांसाठी करणचे नवे
कलेक्शन आहे. यात अनेक प्रकारचे स्कर्ट, ड्रेसेस, निट्स व प्रिंट्स सादर करण्यात आले आहेत. काळ्या रंगाच्या पोशाखांचे प्रमाण यात जास्त होते. काळ्यावर सिल्व्हर डिटेलिंग, मार्किंग व कशिदा पाहण्यास मिळाले.
कलेक्शनमध्ये करणने अनेकविध फॅशन टेक्निक्सचा वापर केला. यात फॉइल वर्क व लेसवरही प्रयोग करण्यात आले आहेत. यात इलेक्ट्रिक ब्लू व ब्लॅकची रंगसंगती होती. या रंगांमुळे पोशाख अधिक उठावदार दिसत होता. ‘झलक दिखला जा’सारख्या टीव्ही शोमध्ये सहभाग घेतल्याने करणला ड्रेसिंगची ताकद काय असते याची चांगली जाणीव आहे. मला रंग, कट्स, फॅब्रिकसोबत प्रयोग करायला आवडते, असे करण सांगतात. करणचा फॅशनसेन्स चांगला असून कोणत्या महिलेला काय सूट होऊ शकते याचा अंदाज अचूक बांधता येतो. त्यामुळे अनेक अभिनेत्रींचे पोशाख करणच्या डिटेलिंगमुळे लक्षात राहून जातात.