आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयाचे ठोके, झोप, आहार-विहारासह पूर्ण शरीराची घ्या काळजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी मनगटावर जॉबोन अप २४ परिधान करतो. रबरचे हे ब्रेसलेट दिवसभर माझी पावले मोजते. कॅलरी खर्च पाहते. माझ्या आहारावर आयफोन अॅप मायफिटनेसपाल नजर ठेवते. जॉबोन ब्रेसलेट मोशन सेन्सरच्या माध्यामतून माझ्या झोपेची वेळ नोंदवते. रात्रीच्या वेळी गाढ आणि हलक्या झोपेच्या तासांचा हिशेब ठेवते. शारीरिक हालचालींच्या रचनेवर लक्ष ठेवणा-या अशा गॅजेटचे चलन अमेरिकेसह अनेक देशांमध्ये वाढत आहे. तपास संस्था एबीआयचा अंदाज आहे की, २०१४ मध्ये शरीरावर परिधान केले जाणारे चार कोटी वीस लाख फिटनेस आणि हेल्थ डिव्हाइस बाहेर पाठवले जातील. २०१३ मध्ये ही संख्या तीन कोटी वीस लाख होती.
परिधान केले जाणारे गॅजेट आपल्या शरीर आणि व्यवहारासंबंधी माहिती गोळा करतात. डॉक्टर आणि संशोधकांना या प्रक्रियेत क्रांती आढळून येते. ही क्रांती रुग्णांच्या उपचाराची दिशा ठरवेल. ट्रॅकिंग डिव्हाइस सांगतील की, आरोग्य विम्यावर आपण किती खर्च केला पाहिजे. याबाबतीत रुग्णालयांनी तयारी सुरू केली आहे. अमेरिकेत क्लीव्हलँड क्लिनिकने आपल्या सर्व कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाइकांना अॅक्टिव्हिटी ट्रॅकर पीबलचा वापर करायला सांगितले आहे. यातून त्यांच्या हालचाली वाढतील, अशी आशा आहे. पीबल वापरणारे कर्मचारी आणि नातेवाइकांचा विमा हप्ता कमी होईल.
आरोग्यविषयक तज्ज्ञांना आढळले की, अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंगमुळे लोकांना आणखी सक्रिय राहण्याची प्रेरणा मिळू शकली आहे. मिनेसोटामध्ये मेयो क्लिनिकने सर्जरीनंतर देखभालीसाठी अॅक्टिव्हिटी ट्रॅकरचा वापर केला. २०१३ मध्ये रुग्णालयाने ५० पेक्षा जास्त वयाच्या हृदयाची शस्त्रक्रिया करणारे १५० रुग्णांना फिटबिट अॅक्टिव्हिटी ट्रॅकर लावले.
मोठ्या ऑपरेशननंतर जास्त वयाचे रुग्ण ढिले पडतात. त्यामुळे रिकव्हरी मंदावते. संशोधकांना आढळले की, रोज अधिक चालणा-या रुग्णांना कमी सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्णालयात लवकर सुटी मिळाली. अॅक्टिव्हिटी ट्रॅकर्ससोबत काही अडचणीदेखील आहेत. आयटी सिक्युरिटी संस्था सिमेंटेक म्हणते, फिटनेस ट्रॅकर्स हॅक होण्याचा धोका राहतोच. काही ट्रॅकर मोठे आहेत. फॅशनेबल नाहीत.
चुकांच्या अडचणी आहेत. आयोवा स्टेट
युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सर्व फिटनेस ट्रॅकर्सच्या अभ्यासात स्पष्ट झाले की, ते व्यायामाने कॅलरी खर्च होण्यात आणि दैनंदिन हालचाली मोजण्यात १० ते १५ टक्के चुकले. परंतु हे डिव्हाइस हळूहळू छोटे आणि स्पष्ट होत आहे. अॅपल वॉच हृदयंच्या स्पंदनासह सर्व हालचाली नोंदवेल. व्यक्तिगत डाटा ट्रॅकिंगने आरोग्यावरील देखभाल सोपी होईल. काही बाबतीत उपचार सुरू करण्यासाठी तपासणीची वाट पाहावी लागणार नाही. साेबत अॅलेक्झांंड्रा सिफरलिन
झोपेचा सर्वात मोठा अभ्यास
जगभरात जॉबोन युजर्सनी १३ कोटी रात्रींची झोप नोंदवली आहे. कंपनीच्या डाटा व्हाइस प्रेसिडेंट मोनिका रोगाती सांगतात, तांत्रिक आधारावर हे जगातील झोपेवरील सर्वात मोठे संशोधन आहे. त्यासोबतच १६ अब्ज पावले आणि १८ कोटी खाद्यपदार्थांचेही रेकॉर्ड ठेवण्यात आले आहे. या डाटामधून आरोग्यासंबंधी रंजक पॅटर्न उभा राहील.
चांगल्या आरोग्याच्या दिशेने पावले : फिटनेस ट्रॅकर
- बाजारात शरीराच्या विविध हालचाली टिपणा-या गॅजेट्सची रेलचेल आहे.
- अॅपल वॉच–तंत्रज्ञानाच्या महारथींची पहिली स्मार्ट वॉच हालचाल, झोप आणि हृदयगतीला ट्रॅक करेल. त्याचा संबंध आयफोनशी राहील. हा रिलीज झालेला नाही.
- नाइके + फ्यूलबँड एसई – फिटनेस कंपनीचा ट्रॅकर विविध हालचाली टिपण्यासाठी नाइके फ्यूल फॉर्म्युला वापरतो. (किंमत ९९ डॉलर)
- फिटबिट चार्ज – मनगटात फिट बसणा-या फिटबिटचे नवे डिव्हाइस वेळ दाखवतो. कॉलर आयडीसारखी भूमिका करतो.
- पावलांचे ताल मोजतो. झोपेवर नजर ठेवतो. ( किंमत १२९.५५ डॉलर)
- गार्मिन व्हिवोफिट – हेल्थ ट्रॅकरची बॅटरी एक वर्ष चालते. हे वायरलेस हार्ट रेट मॉनिटरशी जोडता येते. (१२९.५५)
- सॅमसंग गेयर फिट – स्मार्ट वॉच गेयर फिट हृदयाची गती त्या वेळी सांगू शकते जेव्हा उभा असतो. ही हालचालदेखील नोंदवली जाते. (१४९.९९)
- जॉबोन अप 3 – हे बायोसेन्सरच्या माध्यमातून हृदयाची गती आणि आरोग्याशी निगडित इतर डाटा ट्रॅक करते. हे सेन्सर त्वचेद्वारे पाठवण्यात आलेले सूक्ष्म विद्युतप्रवाह मोजते. (१७९.९९)
- मायक्रोसॉफ्ट बँड – सॉफ्टवेअर कंपनीचा पहिला हेल्थ ट्रॅकर.