आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयविकार म्हणजे सीएडी, वाचा उपचारांच्या नव्या पद्धती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताला मधुमेहाची राजधानी असे म्हटले जाते; पण आपला देश वेगाने हृदयाशी संबंधित आजाराच्या विळख्यातही सापडत आहे. २० ते २४ वर्षांखालील तरुणसुद्धा हृदयविकाराच्या जाळ्यात गुंतत आहे. याची लक्षणे आणि संकेत कोणते आहेत? याची तपासणी करणे गरजेचे आहे का? केव्हा केली पाहिजे? एखाद्या वेळी छातीत दुखू लागले तर ते दुखणे किती गंभीर आहे; त्याची कारणे कोणती? यावर उपचारांच्या नव्या पद्धती कोणत्या? याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे.

हृदयविकारास वैद्यकीय परिभाषेत सीएडी (कोरोनरी आर्ट डिसीज) असे म्हटले जाते. जेव्हा अशा प्रकारचा त्रास रुग्णास झाल्यास नेमका आजार आहे कोठे? यासाठी त्याला अँजिओग्राफी करण्यास सांगितले जाते.

कारणे कोणती?
हृदय म्हणजे एक स्नायू असून ते रक्ताचे पंपिंग करत असते. हृदय व्यवस्थित चालावे म्हणून त्याचे पोषण होणे गरजेचे असते. या कोरोनरी अार्टरीपासून हृदयाला आहार मिळतो. हा हृदयाजवळच एखाद्या मुकुटासारखा असतो. सीएडी हाेण्याची मुख्य कारणे म्हणजे, कोरोनरी आर्टरीमध्ये कोलेस्टेरॉल जमा होणे. याशिवाय तणाव, मधुमेह, जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्यात बदल, तंबाखू सेवन, व्यायाम नसणे किंवा ज्यांच्याकडे हृदयविकाराचे आजार आहेत त्यांना हा त्रास जाणवतो. कोरोनरी आर्टरीमधूनच खूप रक्त हृदयाकडे जाते. यात थक्का (clot) जमा असेल तर उपचार न केल्यास सीएडीचे गंभीर परिणाम जाणवू शकतात. यात हृदयविकार (मायोकॉर्डिअल इंफार्कशन) किंवा मृत्यूही येऊ शकतो.

हा अॅटॅक आहे का?
कोरोनरी आर्टरीज (धमन्या)मध्ये काही अडथळा निर्माण झाल्यास रक्तपुरवठा सुरळीत होत नाही. यात रक्ताचे क्लाॅट जमा होऊ लागतात. यामुळे कोरोनरी आर्टरीमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता असते. याला अॅक्यूट मायोकॉर्डियल इंफार्कशन असे म्हणतात. हृदयविकाराच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करण्याकडे सर्वांचा कल असतो. बहुतांश रुग्ण आणि डॉक्टर असे गॅसमुळे होते, असे समजून तिकडे दुर्लक्ष करतात.

लक्षणे
- जेव्हा शरीरात असे संकेत जाणवू लागतात, तेव्हा तत्काळ कॉर्डिऑलॉजिस्टकडे जावे.
- आकस्मिक दाब वाढणे, छातीमध्ये दुखू लागणे, काही वेळ तरी तशीच अवस्था असणे.
- दुखणे खांदे, मान आणि डाव्या बाजूच्या दंडापर्यंत पसरते. हे दुखणे हलके किंवा जास्तही असू शकते. यात अंगात ताठरपणा किंवा जडपणा जाणवतो. हा जडपणा छाती, पोटाच्या वरील भाग, मान, जबडा आणि दंडामध्ये असू शकतो.
- बेचैनी जाणवणे, खूप घाम येणे, उलटी किंवा शौचास होणे.

कोरोनरी अँजिओग्राफी म्हणजे काय?
ही एक प्रक्रिया असून कॅथलॅबमध्ये केली जाते. कोरोनरी अँजिओग्राफीमुळे कोणत्या आणि किती धमन्यांमध्ये आणि किती प्रमाणात अडथळा किंवा क्लाट जमा झालेला आहे. या प्रक्रियेपूर्वी तुम्ही डॉक्टरांना सर्व प्रकारच्या अडचणी सांगू शकता. जेव्हा अँजिओग्राफी करायची असेल तर त्याच्या सहा तास अाधी काहीच खाल्ले-पिलेले नसावे. फक्त आैषधी घेऊ शकता. यात डॉक्टर एक छोटी सुई एका नळीद्वारे जांघ किंवा हातामार्गे तुमच्या हृदयापर्यंत टाकतात. या नळीत एक विशिष्ट प्रकारचा डाय असतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांत काेठे ब्लॉकेज सापडतात ते पाहिले जाते. या वेळी दुखण्याचा त्रास होत नाही. याच दरम्यान डिजिटल फिल्म एक्स-रे पाहून ब्लाॅकेज किती आहेत ते पाहतात.

तपासणीचा काय फायदा?
जी धमनीत अडथळा आहे किंवा आकंुचित झालेली आहे, त्याबाबतीत कळते. यात जी माहिती मिळते ती कायम राहते. यामुळे हृदयविकारासंदर्भात सगळी माहिती समजून जाते. रुग्णाला औषधी द्यायची की अँजिओप्लास्टी करायची की बायपास करायची हे ठरते. बायपास केली पाहिजे, असेही काही नाही.

सीएडीवर उपचार आहे काय?
यावर औषधीमुळे, पीटीसीए (बलून अँजिओप्लास्टी व स्टेंट) किंवा सीएबीजीएस (बायपास सर्जरी) आणि या तिन्ही मार्गांचा संयोग करून उपचार करणे. सीएडीचे बहुतांश रुग्ण औषधांच्या साह्याने हृदयविकारापासून वाचतात. त्याचबरोबर कोलेस्टेरॉलचा स्तर कमी करण्यासाठी आणि रक्त पातळ करण्यासाठी आैषधी दिली जातात. कोरोनरी ब्लाॅकेज नष्ट करण्यासाठी कोणतेही आैषध उपलब्ध नाही.

अँजिओप्लास्टी म्हणजे काय?
अँजिओप्लास्टी अँजिओग्राफीप्रमाणेच आहे. अँजिओग्राफी तपासणी आहे आणि अँजिओप्लास्टी हा उपचार आहे. यात नळीद्वारे केसाइतक्या जाडीची एक तार घातली जाते. या तारेवर एक बलूनला कोरोनरी आर्टरीपर्यंत सरकवले जाते. याला फुलवलेही जाते आणि बलूनद्वारे ब्लाॅकेज उघडले जाते. ब्लॉक पुन्हा होऊ नयेत यासाठी स्टेंट टाकले जातात. या स्टेंटमुळे धमन्या उघड्या राहण्यास मदत मिळते.

स्टेंट म्हणजे काय?
स्टेंटचा आकार बॉलपेनच्या स्प्रिंगसारखा असतो. यात खूप ताकद असते. हा दीर्घ काळापर्यंत धमन्या उघड्या ठेवतो. धमन्या बंद होऊ नयेत यासाठी तो पुलाचे काम करतो. आजकाल बहुतांश लोकांना औषधी लावलेले स्टेंट मिळतात. याचा फायदा दीर्घकाळपर्यत मिळतो. एका वर्षात गळून पडणारे स्टेंट आले असल्याने रुग्णास आराम मिळतो.

अँजिओप्लास्टी कशी करतात?
अँजिओप्लास्टी लोकल अॅनेस्थेशिया देऊनच केली जाते. यामुळे या ऑपरेशनच्या वेळी दुखण्याचा त्रास नाही. तो अर्धवट बेशुद्धावस्थेत असतो. डॉक्टरशी बोलू शकतो. त्याची इच्छा असेल तर तो मॉनिटरवर अँजिओप्लास्टी करताना पाहू शकतो. तो शुद्धीवर असणे गरजेचे आहे, कारण त्रास जाणवत असेल तर तो डॉक्टरांनाही सांगू शकतो. मात्र, खूप कमी वेळा असे होते