आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेत: गावंडेंच्या आरोपांच्या भडिमाराने खडसेंनी गमावले मंत्रिपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चेत | हेमंत गावंडे, बिल्डर

पिंपरी चिंचवडचे मूळ निवासी हेमंत यांचे वडील मूर्तिकार आहेत. हेमंत फार कमी वयापासूनच दुधाचा वरवा देत असत. आत्मनिर्भर होण्याची त्यांची वृत्ती बालपणापासून होती. वयाच्या २३ व्या वर्षापासून ते बांधकाम उद्योगात आहेत. त्यांनी भागीदारीत हा व्यवसाय सुरू केला होता. आता ते एकटेच आपली फर्म चालवतात. वर्ष २००० पासून ते चिन्मय मिशनमध्ये सक्रिय आहेत. सध्या संस्थेच्या पिंपरी विभागाचे उपाध्यक्ष आहेत.

त्यांच्या घरात टीव्ही नाही. त्यामुळे संस्कारांवर अतिक्रमण होते व संवाद राहत नाही असे त्यांचे मत आहे. २० वर्षांपासून ते बाबा आमटेंसोबत काम करत आहेत. हेमंत सांगतात पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमधील प्रा. नरेंद्र नायडू त्यांचे गुरू आहेत. त्यांनीच आयुष्याला दिशा दिली. बाबा आमटेंचा परिचयही त्यांच्यामुळे झाला. नायडू विनाशुल्क त्यांना दर रविवारी शिकवत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत यांनी वाटचाल केली. हेमंत अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. ‘रिड्यूस द पोस्ट हार्वेस्टिंग लॉस’या तत्त्वाच्या आधारे ते काम करतात. दरवर्षी शेतकऱ्यांना खत पुरवठा करतात. शेतमाल विक्रीसाठी मदत करतात.

एकनाथ खडसेंकडे कृषी मंत्रालयासह इतर ९ मंत्रालयांचा कार्यभार आहे. मात्र ते शेतकऱ्यांची मदत करत नाहीत, असे हेमंत यांना वाटले. भूमी अधिग्रहणाविषयी हेमंतचा सखोल अभ्यास आहे. खडसे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. मात्र त्यांची मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि योगायोगाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी निवडून आले. गोपीनाथ मुंडे आणि त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. वर्ष २०१४ पर्यंत ते विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी होते. वाक््चातुर्याच्या बळावर त्यांनी सत्ताधाऱ्यांची बोलती अनेकदा बंद केली.

सिंचन घोटाळाप्रकरणी त्यांची वक्तव्ये ऐकण्यासाठी सत्ताधारी सदस्यही उत्सुक असत. याच खडसेंना हेमंत गावंडेंनी शांत केले. गावंडेंनी केलेल्या आरोपांमुळे खडसेंना राजीनामा देणे भाग पडले. खडसेंचे संपूर्ण कुटुंब राजकारणात आहे. त्यांची सून रक्षा जळगावच्या भाजप खासदार आहेत. मुलगी रोहिणी खेवळकर जिल्हा को-ऑपरेटिव्हमध्ये संचालक आहे. पत्नी मंदाकिनी राज्य दूध उत्पादक सहकारी महासंघ महानंदच्या संचालक आहेत.

हेमंत गावंडे यांची पुण्यात बिल्डर फर्म आहे. त्यांनी आरोप केला की खडसेंनी पत्नी व जावई गिरीश चौधरी यांच्या नावे महाराष्ट्र आैद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चा ४० कोटींचा भूखंड अल्पदरात खरेदी केला. ही जमीन पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी गावात आहे. २८ एप्रिल २०१६ रोजी खडसेंनी ही जमीन अब्बास रसूलभाई उकानी यांच्याकडून खरेदी केल्याचा आरोप गावंडेंनी केला. ती एमआयडीसीच्या नावे आहे.आरोप सिद्ध करण्यासाठी हेमंत यांनी सरकारी दस्तएेवज, मुंबई उच्च न्यायालय व महसूल विभागाचे कथित जमीनमालक अब्बासद्वारे लिखित दाव्याची कॉपी आणि २८ एप्रिल रोजी खरेदी-विक्री दरम्यानचा मुद्रांक शुल्काची कागदपत्रे माध्यमांना सादर केली. २५ वर्षांपूर्वी ही जमीन एमआयडीसीद्वारे खरेदी केल्याचेही त्यांनी यात सांगितले. खडसेंनी भोसरी भागात जमीन खरेदी केल्याचे मान्य केले. जमीन अब्बासच्या नावे होती असेही सांगितले. जमीन खरेदीची प्रक्रिया नियमानुसार टीडीएस भरून पूर्ण केल्याचेही म्हटले आहे. एमआयडीसीकडून जमीन अधिग्रहणाचे काम अद्याप केले नसल्याचे म्हटले आहे. खडसेंनी हेमंत विरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी दबाव आणल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. दरम्यान खडसेंनी सर्व आरोप नकारले अाहेत. मात्र राजीनामा देणे त्यांना भाग पडले.
जन्म - २ फेब्रुवारी १९७७
शिक्षण - व्यवस्थापनशास्त्राची पदवी व फायनान्सचा अभ्यासक्रम पुण्यातून केला.
पालक- लक्ष्मण, सुलभा, दोन बहिणी
कुटुंब - पत्नी, एक मुलगा, एक मुलगी
चर्चेत का - त्यांच्या आरोपांमुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला.
( त्यांनी 'भास्कर'ला सांगितल्यानुसार)
पुढे वाचा...
> वृत्तपत्र वाचनासाठी एक रुपया मिळत असे
> गर्भवती असतानाही निश्चयाने यशस्वी केला आवडता प्रकल्प
बातम्या आणखी आहेत...