आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गहू; त्याच्याकडे असे नका पाहू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गहू हा भारतीयच नव्हेे तर जगभरातील अनेकांच्या राेजच्या जेवणातील अविभाज्य घटक अाहे. पण याच गव्हाच्या संदर्भात काही समज-गैरसमज पसरलेले अाहेत. त्या समज-गैरसमजांवर हा एक अभ्सासपूर्ण लेख...
 
गैरसमज : गहू हा एक पौष्टिक पदार्थ असून, गहू किंवा गव्हाचे पदार्थ खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह असे अाजार हाेत नाहीत...  
समज : कित्येकदा आपला चिमुकला किंवा चिमुरडी ही पोळीच खात नाही म्हणून काळजी करणारी आई डॉक्टरांकडे सारखी येत असते, तर तरुण वयातील मुलांना कित्येकदा हा सारखा ते पिझ्झा, बर्गरसारखे शरीराला हानिकारक अन्न खातो, आमच्या वेळेस आम्ही फक्त भाजी-पोळी खायचो असे टोमणे ऐकायला मिळतात, तर एखादे चांगले तब्बेत असलेले वयस्कर गृहस्थ दिसले की त्यांनी त्या वेळेसचे दूध, तूप, पोळी या गोष्टी खाल्ल्या असे संबोधण्यात येते. खरंच गहू हे आपल्या आहारातील मुख्य घटकांमधील एक आहे. मग इतके हे पिढीजात चालत अालेले गहू हृदयरोग, मधुमेह असे अाजार होण्यास कसे कारणीभूत ठरू शकतात हे समजण्यासाठी गव्हाचा इतिहास जाणणे गरजेचे आहे. 

गव्हाचा इतिहास शोधला तर असे सापडते, गहू साधारण ७३०० BC पासून अस्तित्वात आहेत, गहू हे ७ व्या शतकात भारतात आले, म्हणूनच गव्हाला ‘म्लेच्छान्न’ असे सुद्धा म्हटले आहे. म्लेच्छ म्हणजे मूलतः वैदिक नसणारे, आर्यन लोकांचे नसणारे असे अन्न. ऋग्वेदात गव्हाचा उल्लेख सापडत नाही, मात्र याचा भारतीय ग्रंथातील उल्लेख हा चरकसंहितेत व नंतर इतर काही आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सापडतो. पूर्वीपासून गहू हे शरीराला किती पोषक आहेत व गव्हाच्या चांगल्या गुणांविषयी सविस्तर वर्णन आपल्याला आढळते. 

जर आपण आधुनिक शास्त्राची पाहणी केली तर आपल्याला असे आढळते की, भारत देशात अगदी सुरुवातीला म्हणजेच indus सभ्यता असताना जे गहू उगवले जायचे ते Triticum sphaerococcum या प्रकारचे होते, या गोष्टीची दाट शक्यता आहे की आपल्या 
शास्त्रांमध्ये सापडणारे उल्लेख हे गव्हाच्या या जातीचे असावेत,  गव्हाचा हा प्रकार आता जवळपास लुप्त झाला आहे.

यानंतर गव्हाच्या इतर ३ जातींचे प्रचलन भारतीय भूखंडात वाढले, यानंतर १९०५ साली गव्हाचे विवध जातींमध्ये cross breeding करून गव्हाचे चांगल्यात चांगले पीक निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले व याचे निष्पन्न म्हणून गव्हाच्या काही नव्या जाती उदयास आल्यात. 
यानंतर हरितक्रांती सुरू झाली व काही नव्या गव्हाच्या जाती “dwarf wheat cultivars” या आणल्या गेल्यात व त्यांचे स्थानिक निर्माण केलेल्या गव्हाशी hybridisation करण्यात आले व परिणाम म्हणून जास्त गहू उत्पादन करणाऱ्या गव्हाच्या आणखी नव्या जाती निर्माण करण्यात आल्यात. 

या नव्या गव्हाचे जर रासायनिक विश्लेषण पाहिलेत तर आपल्या हे लक्षात येते की यात gluten, gliadin, amylopectin A हे त्यात आढळते. म्हणून गहू हा जेवणातील अविभाज्य घटक अाहे.
 
निष्कर्ष : 
- तुम्ही घेणारा आहार, तुम्ही घेणारी औषधी व तुम्ही करणारा व्यायाम यात संबंध असतो, या सर्व गोष्टींची विचारपूर्वक सांगड घातली नाही तर तुम्हाला त्रास हाेऊ शकतो, त्यामुळे नुसतेच संपूर्ण दिनचर्येचा विचार न करता ढोबळमानाने किंवा एकांगी विचारातून दिलेली चिकित्सा ही नुसतीच निष्फळ नव्हे तर घटक ठरू शकते, comprehensive cardiac rehab मध्ये cardiac rehab तज्ज्ञ हे तुमच्या आहार, औषधी, व्यायाम व विहाराचा विचार करून तुम्हाला जीवनशैलीविषयी सल्ला देत असतात.
- पूर्वी निर्माण होणारे गहू व सध्या निर्माण होणारे गहू यांच्या species मध्ये फरक आहे म्हणूनच भारतीय ग्रंथात सांगितलेले गव्हाचे सर्व फायदे हे सध्या उपलब्ध गव्हातून मिळतीलच असे नाही.
- गहू बंद केल्यामुळे irritable bowel syndrome च्या रुग्णांच्या आजारापासून त्यांना उपशय मिळण्यास फार फायदा होतो. 
- गहू बंद केल्यामुळे मधुमेह रुग्णांमध्ये रक्त-शर्करेच्या प्रमाणावर चांगला फरक पडतो. 
- गहू बंद केल्यामुळे स्थौल्य नियंत्रित करण्यास मदत होते. 
- जर आपण धूम्रपान सोडण्यास इच्छुक असाल तर ज्या दिवशी धूम्रपान सोडलं त्या दिवशी गहू पण वर्ज्य करा व तुम्हाला पुनः धूम्रपान करण्याची इच्छा कमी होईल.
बातम्या आणखी आहेत...