आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज बिरज में होरी रे रसिया : व्रज, बरसाण्याची होळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाग आणि होळीचा मनोहारी संगम पाहायचा असेल तर बरसाण्याच्या (उत्तर प्रदेेश) होळीचा आनंद घ्यावा. रंगबिरंगी वस्त्रे परिधान करून श्रीकृष्ण सखा व गोपीयाँ म्हणजे गावातील लोक फागच्या मदमस्त उत्सवात एकादशीपासूनच सामील होतात. वृंदावनमधील सर्व मंदिरे आणि गावांत रंगोत्सवाला मोठ्या धूमधडाक्यात प्रारंभ होतो. रंग, अबीर, गुलाल उधळायला श्रीकृष्ण सखा गावांत आल्यावर गोपी लाठ्या-काठ्यांनी त्याचे स्वागत करतात. त्याला लाठमार होली असे म्हणतात. अशा या व्रज, बरसाण्याच्या होळीची रंगारंग माहिती...

आज बिरज में होरी रे रसिया । 
केसर रंग में बोरी रे रसिया
बाजत ताल मृदंग झांझ डफ
भर पिचकारी सन्मुख मारी

हा एक देशव्यापी उत्सव आहे. या पर्वाला नवान्नेष्टि यज्ञपर्वही म्हटले जाते. शेतातून नवीन अन्नाला हवन करून प्रसाद घेण्याचीही परंपरा आहे. यास अन्नला होला म्हटले जाते. त्यावरून या उत्सवाचे नाव होलिकोत्सव असे पडले. वसंतपंचमीपासून होळी, फागचा श्रीगणेशा होतो. व्रजमध्ये होळी काही वेगळीच असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत सारे व्रजवासी वसंतपंचमीला वसन्ती परिधान करून कपाळी केसरिया चंदन लावून आणि कानांत सरसोचे वासन्ती पुष्प लेवून या वसंताचे स्वागत करत होते. हाेळीच्या पर्वावर रसिया कृष्णचंद्राचा लाल गुलाल कपाळावर लावून सुरुवात होते. होळी आणि फाग गायन मंदिरात व संगीत समाजामध्ये सुरू होते. 

फाल्गुन शुद्ध नवमीला बरसाणा येथील रंगीन गल्लीत लठमार होळी खेळली जाते. नंदगांवचे कृष्णसखा हुरिहारे बरसाना येथे होळी खेळण्यास येतात. राधेच्या सख्या लाठ्यांनी त्यांचे स्वागत करतात. सखागण मजबूत ढालीने वार परतवून लावतात. वार लागला आणि रक्त आलेच तर व्रजरस लावला जातो. होळीचा हा आनंदोत्सव पाहण्यासाठी हजारो भक्तगण नंदगांवच्या गल्लोगल्ली गर्दी करतात.  व्रजचा प्रसिद्ध उत्सव एकादशीपासून सुरू होतो. वृंदावनच्या सर्व मंदिरांत आणि गावांत होळीला प्रारंभ होतो. गाणी, गात नाचत लोक आनंद साजरा करतात. 
मुखराई येथे राधाराणीचे माहेर मानले जाते. तिच्या जन्माची बातमी ऐकून आजीने हर्षोल्लासात चरकुला नृत्य केले होते. होळीच्या वेळी आतही हे नृत्य केले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी द्वितीयेला बठैनमध्ये राधाराणी आपले दीर बलदेवजी यांच्यासोबत होळी खेळते. होळी ही स्वार्थसाधनाचा संक्षेप करण्याचा सण आहे. विश्वकल्याणाचा विचार देणाऱ्या या उत्सवाचा आत्मा त्याग आहे. दुष्प्रवृत्तींचा नायनाट करण्याचा संदेश देणारी ही होळी. ईश्वरी श्रद्धेचे हे प्रतीक आहे. 

श्रद्धा की खेलन होली भक्ती की खेलन होली
ढूँढती व्रज की गली, श्याम की ये दीवाणी
रसिया मैं तो होरी खेलन आई....।
बातम्या आणखी आहेत...