आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हबल स्पेस टेलिस्काेप 27 वर्षांचा अविरत अवकाशप्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाकाशगंगेचे  टिपलेले  छायाचित्र - Divya Marathi
अाकाशगंगेचे टिपलेले छायाचित्र
पृथ्वीच्या कक्षेत गेल्या २७ वर्षांपासून भ्रमण करताना तब्बल १३ लाख छायाचित्रे पाठवून मानवाला विश्वरूप दर्शन घडविणारी ‘हबल स्पेस टेलिस्काेप’ १९९० साली अवकाशात साेडण्यात अाली. अातापर्यंत १३ लाख छायाचित्रे या दुर्बिणीने पाठविली असून शनी ग्रहाभाेवती असणारी कडी, गुरुभाेवतीचे अनेक चंद्र यांसह अनेक अनाकलनीय बाबींचे विश्वरूप दर्शन या दुर्बिणीने मानवाला घडविले अाहे. अाजही ती जगातील सर्वात माेठी अाणि बहुउद्देशीय कार्य करणारी दुर्बीण मानली जाते. तिचा अाकार अाहे, फक्त एका बसइतकाच! 
 
‘डि स्कव्हरी-एसटीएस-३१’ या प्रक्षेपकाद्वारे २४ एप्रिल १९९० राेजी फ्लाेरिडातील ‘नॅशनल एराेनाॅटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन  (नासा)’च्या केनेडी स्पेस सेंटरवरून साेडण्यात अालेल्या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे ‘हबल’ अवकाशात पाेहाेचविण्यात अाली. मानवाने तयार केलेली व अंतराळात साेडलेली ती पहिली दुर्बीण नसली, तरीही तिचे कार्य मात्र अद्वितीय असेच राहिले अाहे.  अंतराळवीर एडविन हबल यांच्या कार्यामुळे या दुर्बिणीला त्यांचेच नाव देण्यात अाले.  संशाेधन अाणि त्याची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पाेहाेचविणे, यातील महत्त्वाचा दुवा असणारी छायाचित्रे पुरविणारी ती एेतिहासिक दुर्बीण ठरते अाहे. ‘नासा’सह युनायटेड स्पेस एजन्सी, युराेपियन स्पेस एजन्सी (इसा),  द स्पेस टेलिस्काेप सायन्स इन्स्टिट्यूट (एसटीसीअाय) या अंतराळ संशाेधन संस्था एकत्रितपणे ‘हबल’ने काेणती छायाचित्रे टिपावीत अाणि माहिती कशी पाठवावी, याचे नियंत्रण करतात. ‘नासा’चे गाेडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर सर्व हालचाली नियंत्रित करते.  ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत स्थिर करण्यात अाली असली, तरीही अापल्याभाेवती असलेल्या वातावरणाच्या मात्र बाहेर अाहे. मानवी जीवनात ४०० वर्षांपासून अवकाशातील हालचाली जाणून घेण्याचे कुतूहल हाेते. १६१० मध्ये गॅलिलिअाेने पहिली दुर्बीण तयार करून ते शमविण्याचा प्रयत्न केला. परंतु सूर्यमाला, अवकाशातील ताऱ्यांचे झालेले स्फाेट, त्यातून तयार हाेणारी कृष्णविवरे (ब्लॅकहाेल्स), नव्या ताऱ्यांचे जन्म (नेब्युला) अाणि सतत विस्तारणाऱ्या अाकाशगंगा याच्या पलीकडे संशाेधन करणे पृथ्वीवर एका ठिकाणी राहून शक्य नाही, याची जाणीव शास्त्रज्ञांना झाली हाेती.  त्यातील पाऊस, ढग, वादळे, तीव्र ऊन अशा हवामानाचा अडथळा हा तर अाणखीनच एक प्रमुख मुद्दा हाेता.  त्यामुळेच अंतराळात अाॅप्टिकल लेन्स असणारी दुर्बीण पाठविण्याची संकल्पना मांडण्यात अाली. त्यातूनच सूर्यमालेव्यतिरिक्त धुमकेतू, अाकाशगंगा अाणि अंतराळातील मानवी नजरेला न दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या हालचाली टिपण्यासाठी ‘हबल’ची निर्मिती करण्यात अाली. गेल्या २७ वर्षांपासून ही दुर्बीण मानवी नजरेस अनाकलनीय असे अवकाशदर्शन शास्त्रज्ञांना अविरतपणे घडवित अाली अाहे. त्यातून संकलित माहितीतून सृष्टी अाणि अंतराळ या अविरत पाेकळीतील अनेक प्रकारची गूढ माहिती मिळविणे अाणि तिचे विश्लेषण करणे शास्त्रज्ञांना शक्य झाले अाहे. 
 
अभियांत्रिकीचा सर्वाेत्तम अाविष्कार 
‘हबल’ दुर्बीण हा अभियांत्रिकी क्षेत्राचा सर्वाेत्तम अाविष्कार अाहे. अनादी, अनंत अाणि अथांग असलेल्या अंतराळातील अनेक अाश्चर्यकारक घटनांची सचित्र माहिती तिने मानवास दिली. त्यातून संशाेधकांना अंतराळातील क्लिष्ट रचना अाणि गुंतागुंतीच्या अनेक हालचाली जाणून घेता अाल्या अाहेत. तिला पूरक अशी ‘जेम्स वेब स्पेस हबल’ सध्या ‘नासा’ तयार करीत असून अाॅक्टाेबर २०१८ मध्ये अंतराळात पाठविण्याचे नियाेजन अाहे. तरीही ‘हबल’चे याेगदान काेणीही कधीही विसरू शकणार नाही. 
 
‘हबल फॅक्ट्स..’ 
{ १९९० पासून अातापर्यंत १३ लाख छायाचित्रे पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाकडे पाठविली. 
{ अंतराळ संशाेधकांनी त्यातून मिळविलेली माहिती व त्यावरील सुमारे १४ हजार शाेधनिबंध अातापर्यंत जगभरातील विविध माध्यमांमधून प्रसिद्ध झाले. 
{ १७ हजार मैल प्रतितास या वेगाने पृथ्वीभाेवती प्रदक्षिणा पूर्ण. तारे, सूर्यमाला अाणि अाकाशगंगा यातून प्रवास न करताही त्यांची माहिती मिळविण्यासाठी वापर. 
{ ३४० मैलांची तिच्या पृथ्वीप्रदक्षिणेची कक्षा. अातापर्यंत त्या मार्गावर ३ दशलक्ष मैलांपेक्षाही जास्त अंतर कापले. 
{ संचलनासाठी या दुर्बिणीला पाॅइंटिंग अंॅगल्स, थ्रस्टर्स नाहीत. न्यूटनच्या तत्त्वानुसार उजव्या बाजूने वळण्यासाठी तिला डाव्या बाजूने ढकलले जाण्याची, तर डाव्या बाजूला वळण्यासाठी उजव्या बाजूने ढकलली जाण्याची व्यवस्था. अंतराळात ९० अंशांच्या काेनात वळविण्यासाठी किमान १५ मिनिटे लागतात. 
{ दिलेल्या लक्ष्याची छायाचित्रे टिपण्याची अचूक क्षमता. अवघ्या ०.००७ सेकंंदांचाच फरक शक्य. 
{ पृथ्वीपासून १३.४ दशलक्ष प्रकाशवर्ष दूर असलेल्या अंतराळातील घडामाेडींची अचूक छायाचित्रे टिपली. 
{ १४० टेराबाइट डाटा संकलित करण्याची क्षमता. त्यात दरवर्षी १० टेराबाइट डाटाची भर पडते. 
{ १९९० साली तिचे वजन २४००० पाैंड हाेते. दुरुस्ती व नवीन यंत्रे जाेडण्यात अाल्यानंतर ते अाता २७,००० पाैंड इतके झाले. हे वजन एका अाफ्रिकन हत्तीइतके अाहे. 
{ छायाचित्रे टिपणारा तिचा मुख्य अारसा २.४ मीटरचा (७ फूट १०.५ इंच). 
{ या दुर्बिणीची लांबी १३.३ मीटर (४३.५ फूट) म्हणजेच एका बसच्या लांबीइतकी अाहे.
 
अपूर्वा जाखडी, 
स्पेस एज्युकेटर, नासा
apurva.jakhadi@yahoo.com
(शब्दांकन : दीपक रत्नाकर)
बातम्या आणखी आहेत...