आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय प्रल्हाद माऊली, करी कृपेची साऊली!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋषी-महर्षींच्या भारतभूमीतील संत अवतारांमध्ये दोन प्रकार आहेत. एक चिंतनीय संत, तर दुसरा अनुकरणीय संत. याच अनुकरणीय संतप्रकारांमध्ये साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज रामदासी हे होत.  महाराजांच्या अवतारकार्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील खेर्डा हे छोटेखानी गाव तीर्थक्षेत्रच झाले. सद््गुरू प्रल्हाद महाराजांचे काळे घराणे तप:पूत होते आणि सात्विकही. आजोळही संतवृत्तीचे होते. सद््गुरुंच्या आईला बालपणीच नरसिंह सरस्वतींनी "तुझ्या पोटी सत्पुरुष जन्माला येईल', असा आशीर्वाद दिला होता. रिसोडला सखाजी शुक्लांकडे महाराजांचे शिक्षण झाले. वयाच्या १८ व्या वर्षी गोंदावले येथील ब्रह्मचैतन्यांचे शिष्य रामानंद महाराज यांचा अनुग्रह त्यांना लाभला. तेरा कोटी रामनाम जपाचे पुरश्चरण निष्ठेने पार पाडले. वडिलांकडून मिळालेली अग्निहोत्राची दीक्षा, सद््गुरुंचा अनुग्रह व समर्थ संप्रदायाची रामदासी दीक्षा यांचा परिणाम महाराजांवर विशेष झाला. तीव्र वैराग्य प्राप्त झाले व महाराजांनी गृहदान केले. सद््गुरुंनी दिलेले राम पंचायतन नित्य जवळ ठेवत असत. पंचायतन पूजा करून तीर्थ घेतल्याखेरीज पाणीदेखील पीत नसत. शुद्ध आचरण, प्रखर गुरुनिष्ठा व अखंड नामस्मरण यांच्यायोगे परमार्थ कसा साधावा हे महाराजांनी दाखवून दिले. त्यांनी आपले आयुष्य रामनाम व परोपकार यासाठी वाहून घेतले. नामस्मरण व अन्नदान यावर महाराजांचा भर होता. त्यांची रामनाम उपासना ब्रह्मांड भेदून पार गेली होती. 
 
सद््गुरु प्रल्हाद महाराज हे संतरूपातील परमेश्वरी अवतार होते. मायबाई जीजीमाया यांच्यासोबत महाराजांचा विवाह झाला. परंतु आयुष्यभर ब्रह्मचर्य पालन करून मायबाई त्यांच्या तत्पर गुरूसेवक बनल्या. गुरुंची सेवा, रामनाम आणि अन्नदानात या दोघांनी आयुष्य व्यतीत केले. कितीही शिष्यगण आले तरी १०० लोकांचा स्वयंपाक एकट्या जीजीमाय करत असत. माघ वद्य अमावास्या सद््गुरु प्रल्हाद महाराजांचा जन्मदिवस नुकताच सर्वत्र साजरा झाला. त्यानिमित्त गरुमाऊलींचे स्मरण आणि कोटी कोटी प्रणाम. 
बातम्या आणखी आहेत...