आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Life And Management, Divya Marathi

संशयाचे मळभ दूर करण्यासाठी अधिक माहिती असणे गरजेचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही पुस्तके मजेने वाचण्यासाठी असतात, काही आतुरतेने वाचण्यासाठी असतात; पण काही पुस्तके वाचल्यानंतर मनन करण्यासारखी आणि त्यातील विचार जीवनात प्रत्यक्ष उतरवण्यासारखी असतात.

खरी मैत्री दु:खाचे ओझे हलके करते. परस्पर समज वाढवते. प्रेम आणि मदत अशा दोन्ही प्रकारे डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे भरलेली असते. स्वत:पेक्षा मित्राचे महत्त्व काही वेगळेच आहे.

जे लोक जास्त बोलतात, त्यांना नेहमी चुकीचे समजले जाते.
निसर्गाने माणसाला कल्पनाशक्ती एवढ्यासाठीच दिली की, जे नाही त्याची त्याने भरपाई करावी. जे आहे त्यात समाधानी राहण्यासाठी विनोद बुद्धी दिली.

अयशस्वी राहिल्याने एखादी गोष्ट न मिळाल्यास आणि न केल्याने ती गोष्ट न प्राप्त झाल्यास अशा दोन गोष्टीची तुलना होऊ शकत नाही.
सामान्यपणे लोक आपल्या इच्छेनुसार विचार करतात आणि बोलतात, पण काम करताना मात्र स्वत:च्या जन्मजात सवयींनुसार करतात.
वाचण्यामुळे माणूस संपूर्ण बनतो, बोलण्यामुळे कुशल बनतो आणि लिहिण्यामुळे खरा बनतो.

महत्त्वाकांक्षा ही एखाद्या कडू रसाप्रमाणे असते. हा रस जर थांबवला नाही तर ती माणसाला सक्रिय, उत्साही बनवते. पण जर ती थांबवली तर माणसाला विषारी आणि अनिष्ट बनवते.

धूर्त माणूस अभ्यासाचा तिरस्कार करतो, सामान्य माणूस त्याची तारीफ करतो, तर बुद्धिमान त्याचा उपयोग करतो.
जे लोक जास्त प्रश्न विचारतात त्यांनी अधिक शिकले पाहिजे व जे काही शिकतो ते अधिकाधिक उपयोगात आणले पाहिजे.
ज्ञानात सर्वात जास्त शक्ती असते.

अंधारात उडणार्‍या पक्ष्यांची जी दिशाहीन अवस्था असते तसे संशयात्मक विचारांचे असते. हे संपवणे गरजेचे आहे. जे लोक कमी जाणतात त्यांच्याच मनात संशय येतो. संशय दूर करण्यासाठी अधिकाधिक जाणून घेणे गरजेचे आहे. संशय हा कृत्रिम असतो आणि डोक्यात सारखा वळवळत असतो.