आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रग,धग आणि अद्वितीय ताकदीचा जगज्जेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या मते १९६०च्या दशकाची सुरुवात १८ फेब्रुवारी १९६४ ला झाली होती. त्या दिवशी गायकीच्या जगात धूम करणारे बिटल्स आणि मी कॅसियस क्ले यांना भेटलो होतो. बिटल्स आपल्या पहिल्या अमेरिकी टूरवर होते. फोटो सेशनसाठी त्यांना विश्व हेविवेट बॉक्सिंग चॅम्पियन सोनी लिस्टनच्या मियामी प्रशिक्षण शिबिरात नेण्यात आले होते. लिस्टन यांनी चारही युवकांना पाहिले आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यास नकार दिला. त्यामुळे फोटोग्राफर तरुणांना क्ले येथील प्रशिक्षण शिबिरामध्ये नेण्यात आले. सर्वांना वाटले की, क्लेसारख्या चॅम्पियनविरुद्ध जिंकण्याची शक्यता नाही. सुरक्षा रक्षकांनी बिटल्सला एका रिकाम्या ड्रेसिंगरूममध्ये बसवून ठेवले. मी त्यांना सामन्याविषयी विचारले, ते म्हणाले की, लिस्टन त्या मूर्खाला उद्ध्वस्त करेल.

ड्रेसिंग रूमचा दरवाजा उघडतो. कॅसियस क्ले समोर येताे. तो फोटोमध्ये जसा दिसताे त्यापेक्षा अधिक मजबूत होता. त्याने गर्जना केली की, हॅलो बिटल्स, आम्हाला काही रोड शो करायला पाहिजे. काही वेळातच बिटल्स क्लेच्या मागे किंडरगार्डन शाळेच्या मुलांसारखे फिरत होते. सात दिवसांनंतर क्ले याने लिस्टनला हरवून विजय प्राप्त केला. वयाच्या २२ व्या वर्षी तो सर्वात तरुण हेवीवेट चॅम्पियन होता. सर्वाधिक आकर्षक आणि विवादास्पद. लिस्टनवर विजय मिळवण्यासोबत क्लेची दिशा निश्चित झाली. एक हीरो आणि एक व्हिलन. एक आदर्शवादी योद्धा आणि अंतत: एक लिजेंड ज्याला चुकीचे समजण्यात आले.

जगाच्या भावी सम्राटाच्या कारनाम्यांची सुरुवात एका साधारण घटनेने होते. त्याची सायकल चोरी झाली होती. १२ वर्षांचा क्ले लुइसविले येथे राहत होता. कोणीतरी सांगितले, जवळच कोलंबिया जिममध्ये गोरा पोलिस अधिकारी काळ्या आणि गोऱ्या मुलांना बॉक्सिंग शिकवतो. क्ले तेथे गेला. जिममध्ये त्याला विचारण्यात आले, तुला बॉक्सिंगविषयी माहिती आहे का? क्लेने बॉक्सिंगचा श्रीगणेशा तेथेच केला होता.
क्ले आपल्या भागात सर्वात कमी वयात सेलिब्रिटी बनला. त्याचे वडील कॅसियस मार्सेलस क्ले यांनी समजावले होते, त्याला गोऱ्यांच्या नियमांचे पालन तिथपर्यंत करावे लागेल जोवर तो इतका मोठा होत नाही, जेव्हा आपले नियम तो बनवू शकेल. त्याने लवकरच आपले नियम बनवायला सुरुवात केली. १५ वर्षीय क्लेचा उत्साह, आत्मविश्वास आणि स्वत:ला सादर करण्याची भावना त्याला बॉक्सिंग ट्रेनर एंजेलो डुंडी याच्या हॉटेल रूमपर्यंत घेऊन गेली. क्लेला माहीत झाले की, प्रसिद्ध ट्रेनर शहरात आहे. डुंडी सांगतात, त्यांना एक फोन आला तो असा होता, मी कॅसियस क्ले. लुइसविले येथील गोल्डन ग्लोव्ह चॅम्पियन. भावी जागतिक हेवीवेट चॅम्पियन. मी लॉबीमध्ये आहे. आणि लवकरच डुंडी क्ले याचे प्रशिक्षक बनले. रोम ऑलिम्पिकनंतर डुंडी यांनी क्ले याला व्यावसायिक स्पर्धांमध्ये उतरवले. तिकडे मियामीमध्ये सोनी लिस्टनमध्ये सामन्याच्या तिकिटांची विक्री संथ होती. प्रमोटर्सनी कमजोर विक्रीचे कारण क्ले याचा इस्लामचा प्रचार करणारे संघटन- नेशन ऑफ इस्लामशी असणाऱ्या संबंधाशी जोडला गेला. संघटनेचा प्रवक्ता मेल्कम एक्स त्याचा चांगला मित्र होता. परंतु नंतर त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. २५ फेब्रुवारी १९६४ च्या रात्री रिंगमध्ये उतरण्यापूर्वी चर्चा होती की क्ले भीतीमुळे देश सोडून पळून गेला आहे. परंतु क्ले रिंगमध्ये उतरताच सर्व अफवा दूर झाल्या. सुरुवातीपासूनच त्याने चॅम्पियनवर विद्युत गतीने मुक्के मारण्यास सुरुवात केली. तिसऱ्या राउंडमध्ये त्याने लिस्टनच्या डाव्या डोळ्याखाली वार केला. लिस्टन सातव्या राउंडमध्ये रिंगमध्येच आला नाही. चॅम्पियनने मैदान सोडले होते. क्ले रिंगच्या दोरीवर आेणवा होऊन पत्रकारांकडे पाहून आेरडला, आपले शब्द परत घ्या, मी महान आहे, महान आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी क्ले याने स्पष्ट केले की, तो नेशन ऑफ द इस्लामचा सदस्य आहे. लवकरच त्याला मोहंमद अली नाव मिळाले. प्रेसने त्याच्या नावातील बदल स्वीकारला नाही. बऱ्याच वर्षांपर्यंत त्याला चॅम्प म्हणूनच लिहिले जात होते. त्याला अशा सिस्टिमबाबत कृतघ्न म्हणण्यात आले. ज्याने त्याला प्रसिद्ध आणि श्रीमंत बनवले होते. २१ फेब्रुवारी १९६५ ला एका बाररूममध्ये अलीचा मित्र मेल्कमची हत्या करण्यात आली. तीन महिन्यांनंतर लिस्टन विरुद्ध अलीला विश्वविजेतेपद वाचवण्यासाठी झंुजायचे होते. अफवा होती की मेल्कमच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका कारमध्ये बंदूकधारी न्यूयॉर्कहून लेविस्टन, मैनेच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे पोलिस, पत्रकार आणि अलीचे प्रशंसक बेचैन झाले. सामन्याचे आयोजक मात्र खुश होते, कारण तिकिटांची विक्री वाढणार होती. त्यांनी अलीचा ६५ लाख रुपयांची जीवन विमा पॉलिसी काढण्याचे घोषित केले. कडेकोट बंदोबस्तात झालेली लढत केवळ १ मिनिट ५२ सेकंद चालली. पहिल्या राउंडमध्ये अलीने लिस्टनच्या जबड्यावर ठोसा लगावला. आणि तो खाली कोसळला. लिस्टनला पराभूत केल्यानंतर अली याने सर्व विराेधकांना धूळ चारली. पुढची लढत पूर्व चॅम्पियन फ्लायड पॅटरसन सोबत होती. पॅटरसनने लढतीला इसाइयत आणि अमेरिकेसाठी धर्मयुद्ध संबोधले. अली याने रिंगमध्ये त्याची खिल्ली उडवताना माजी विजेत्याची चांगलीच धुलाई केली. लढत १२ व्या राउंडमध्ये संपली. आता अलीचे व्यक्तिमत्त्व निखरले होते. सरकारसाठी तो एक खतरनाक व्यवस्थाविरोधी खेळाडू हीरो होता. ती व्हिएतनाम युद्धाची वेळ होती. आणि सरकारला युद्धासाठी युवकांची गरज होती. परंपरागत तरुणाने सैनिकांचा पुरवठा करणाऱ्या अनुदारवादी देशभक्त मजूर वर्ग अलीला घाबरट आणि कृतघ्न मानत होता. विद्यार्थी, उदारवादी त्याला शूर विद्रोही मानत होते.
१९६४ मध्ये अली याला सैन्य भरतीसाठी अयोग्य मानण्यात आले. तसे पाहता दोन वर्षांनंतर त्याला योग्य म्हणून निवडण्यात आले. दरम्यान, अमेरिकेत व्हिएतनाम युद्धाच्या बाजूने आणि विरोधकांत गरम चर्चा रंगली होती. एके दिवशी पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तरात अलीने सांिगतले होते की, माझ्या मनात व्हिएतनाम बंडखोरांविषयी कुठलीही िवरोधी भावना नाही. या वक्तव्यासाठी राजकीय नेते, बॉक्सिंग कमिशन आणि वयोवृद्ध पत्रकार यांनी अलीवर टीकेची झोळ उठवली होती. २८ एप्रिल १९६७ ला अलीने सैन्यात जाण्यास नकार िदला. त्याचे विजेतेपद हिसकावून घेण्यात आले. बॉक्सिंगचे लायसन्स रद्द करण्यात आले.

अलीचा प्रभाव चौफेर वाढत होता. कृष्णवर्णीय अॅथलिट स्पोर्ट््स आणि समाजातील समानतेसाठी त्याच्या संघर्षावरून प्रेरित होते. दुसरीकडे रिंगमधील बंदीमुळे अलीने महाविद्यालयांमध्ये व्याख्यान देणे सुरू केले. त्याच्या भाषणांमुळे गोऱ्या लोकांनाही अश्वेेतांची बाजू समजायला वेळ मिळाला. सन १९७० मध्ये अलीला बॉक्सिंगचे लायसन्स परत मिळाले. मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये त्याचा सामना सध्याचा चॅम्पियन जो फ्रेजियरशी होता. प्रत्येक मुष्टियोद्धाला २५ लाख डॉलरची गॅरंटी मनी देण्यात आले होते. साडेतीन वर्षे निष्क्रिय राहिल्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला होता की, अली ८ मार्च १९७१ ला फ्रेजियरसमोर टिकू शकेल का? अली म्हणाला होता, फ्रेजियर एवढा कुरूप आणि एवढा मुका आहे की चॅम्पियन होण्याच्या लायकीचा नाही. १५ राउंडपर्यंत चाललेल्या सामन्यात फ्रेजियरने ११ आणि अलीने ४ राउंड जिंकले. अलीला प्रथमच आपल्या करिअरमध्ये संघर्ष करावा लागला. त्याची हनुवटी सुजली होती. अली ३१ वर्षांचा झाला होता. लोकांचा असा विचार होता की, त्याचे सिंहासनावर पुनरागमन करण्याचे स्वप्न संपले आहे, तरीही तीन वर्षांत त्याने १४ सामने खेळले. त्याने पॅटरसन, क्वॅरी, जिमी एलिस यांना पराभूत केले. जे फ्रेजियरला १२ राउंडच्या सामन्यात नमवले. सन १९७४ मध्ये प्रमोटर डॉन किंगने जायरेमध्ये फोरमॅन-अली यांच्यामध्ये सामना आयोजित केला. जायरे सरकारने दोन्ही मुष्टियोद्धांना एक कोटी डॉलर दिले. सामन्याला रंबल इन द जंगलचे नाव देण्यात आले. आठव्या राउंडमध्ये अलीने एका जबरदस्त ठोशाने फोरमॅनला नमवले. अलीएवढा थकून गेला होता की, सामना संपल्यानंतर तो रिंगमध्येच कोसळला. काही सेकंदांनंतर तो उठला आणि प्रसारमाध्यमांकडे पाहून ओरडला, पाहा मी काय केले. लिस्टनला नमवल्यानंतर अली दहा वर्षांनी पुन्हा चॅम्पियन बनला आणि अमेरिकेने चॅम्पियन अलीला हातोहात घेऊन टाकेल. शिकागो, न्यूयॉर्कमध्ये रॅली काढण्यात आली.काही काळानंतर लाइट हेवीवेट चॅम्पियन लियोन स्पिंक्सने १५ राउंडच्या सामन्यात अलीला हरवून विजेतेपद हिरावून घेतले. त्यानंतर सात महिन्यांनी स्पिंक्सला हरवून अली तीन वेळा विश्व हेवीवेट चॅम्पियन बनणारा पहिला बॉक्सर बनला.
अलीची वादग्रस्त विधाने
बॉक्सिंगवर बंदी : हुकूमशाही शासनामध्ये अशा गोष्टी वाचतात. जेथे व्यक्तीला मनासारखे न वागल्यास कामापासून वंचित ठेवले जाते.
वर्णभेद : श्वेतवर्णीय कृष्णवर्णीय लोकांवर हल्ले करतात. मारहाण करतात. त्यामुळे आम्ही श्वेतवर्णीयांबरोबर राहू इच्छित नाही.
ब्लॅक होमलँड : आम्ही बाहेर निघून स्वत:साठी नवीन देशाची निर्मिती का करू नये आणि नोकरीसाठी भीक मागणे बंद करावे.
आय अॅम द ग्रेटेस्ट
सोनी लिस्टनशी झालेल्या सामन्यापूर्वी क्लेने पत्रकारांना सांिगतले होते की, लिस्टनच्या शरीरातून अस्वलासारखा वास येतो. त्याने भविष्यवाणी केली होती की, सोनी हे सिद्ध करण्यासाठी आठव्या राउंडला पराभूत होईल की, मी महान (आय अॅम द ग्रेट) आहे.
अलीच्या मृत्यूमध्ये बॉक्सिंगची भूमिका अस्पष्ट
एलिस पार्क
आपल्या प्रतिस्पर्धीच्या आसपास फुलपाखरासारख्या फिरणाऱ्या मोहंमद अलीला पॉर्किन्सनच्या आजाराने असाहाय्य केले होते. त्याची आपल्या स्नायूवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता नष्ट झाली होती. मात्र, ज्या गोष्टीने बॉक्सिंगने त्याला महान बनवले त्या गोष्टीचा या स्थितीला किती हातभार होता. त्यांच्या कुटुंबीयांना विश्वास होता की, पॉर्किन्सनचे कारण बॉक्सिंग नाही. हा आजार तर त्यांना ज्यांचे जीन्स आणि ट्रेनिंगच्या दरम्यान कीटकनाशकांच्या संपर्कात आल्याने झाला. त्यांचे नातेवाईक काहीअंशी योग्य ठरू शकतात. काही जीन्समुळे पॉर्किन्सन होऊ शकतो. पण हे स्पष्ट नाही ते जीन्स अली यांच्या शरीरात होते किंवा नाही.

ऑलिम्पिकमध्ये खळबळ
सन १९६० च्या रोम ऑलिम्पिकदरम्यान सोव्हिएत पत्रकाराने अमेरिकेतील वर्णभेदाविषयी प्रश्न केला होता. तेव्हा क्लेने सांिगतले की, आमच्या येथे योग्य व्यक्ती या मुद्द्यावर काम करत आहेत. माझ्यासाठी अमेरिका जगातील सर्वात चांगला देश आहे. तसे अनेक वेळा काही खाण्यासाठी सहजतेने मिळत नाही, तरीही मला मगरींशी सामना करावा लागत नाही आणि मी झोपड्यांमध्येही राहत नाही.
बातम्या आणखी आहेत...