आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Need To See Mother In Every Women To Respect Her

जेव्हा एका स्त्रीमध्ये आईचे रूप पाहाल तेव्हाच तिला समानतेचा दर्जा द्याल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संस्कृतीने आपल्या सर्व मर्यादा आणि विरोधाभास सांभाळून काही चांगल्या बाजू दृष्टोत्पत्तीस आणल्या आहेत. आधुनिक काळातसुद्धा स्त्रियांना मित्रत्वाची किंवा तत्सम वागणूक दिली तर खऱ्या अर्थाने मातृत्वाला योग्य दर्जा किंवा एक प्रकारची ताकद मिळते. याचे पालन केले तरच समाजात समरसता येते. जर तुम्ही एखाद्या स्त्रीमध्ये एक आई पाहत असाल तर तिला श्रेष्ठ मानणे गैर वाटणार नाही. तिला मित्र किंवा सखी मानण्याने बरोबरीचा दर्जा तुम्ही मनापासून द्या.

आजच्या समाजव्यवस्थेत मानवतावादी दृष्टिकोन आहे. स्वातंत्र्य, समानता, भ्रातृभाव हाच आधुनिकतेचा मूळ पाया आहे. आधुनिक समाजात लिंग, वर्ण, जात, रंग इत्यादींच्या अाधारावर कोणाचा समान दर्जा नाकारणे शक्य नाही.

आपल्या देशात छेडछाड आणि दुष्कृत्यांच्या घटनांमुळे दाेन प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण हाेतात. एक आवाज परंपरागत पुरुषप्रधान संस्कृती व्यक्त करतो. जो स्त्री म्हणजे मातृशक्ती, देवी, पूज्य इत्यादीचा उच्च दर्जा देत स्त्रीला मुक्त स्वातंत्र्य देण्याच्या मागणीला आरोपीच्या पिंजऱ्यात आणून ठेवतो. तोच दुसरा आवाज स्त्रियांना समान दर्जा देण्याच्या अट्टहासामुळे कोणत्याही बंधनास पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असल्याचे सांगत बंधने झुगारून देतो.

एकाला अभिजनवादी आणि दुसऱ्याला डावी विचारसरणी असे सांगून वाद सुरू केले जातात. भारतीय दृष्टिकोनातून स्त्री विचारांना या दोन अतिरेकी विचारांपासून दूर राहून नवनिर्माण करण्याची गरज आहे. अापल्या संस्कृतीची घडण स्त्री-पुरुषांच्या शरीररचनेवर होत नसते, तर त्यांच्यातील भाव जाणून घ्यावे लागणार आहेत.

स्त्री आणि पुरुष या दोन शरीरांपलीकडे हे दोन भाव आहेत. स्त्री स्वभावात दया, करुणा, सेवा, समर्पण, त्याग, व्यावहारिकता, भावुकता, कोमलता, परस्परभाव, सहयोग, मूर्तता आदी व्यक्त होतो, तर पुरुषभाव कठोरता, अमूर्ततता, बौद्धिकता, अल्लडपणा, उद्यमी, आक्रमकता, अधिकार, प्रतिस्पर्धा, स्वतंत्रता, नेतृत्वशीलता अादी व्यक्त करतो. दोन भावांमुळेच योग्य संतुलन राखल्याने सुसंगत व्यक्तित्व घडते. तरीही स्त्रीभाव व्यक्ती तसेच समाजास अधिक मानवतावादी बनवतो. पुरुषभाव आक्रमक, हिंसक, बाह्योन्मुख आणि भौतिक बनवतो. पुरुषात स्त्रीभाव पूर्णत: विकसित असेल तरच पुरुषाला त्याचे श्रेष्ठत्व मिळते. अर्धनारीनटेश्वर याचेच समर्पक उदाहरण ठरावे.

आध्यात्मिकतेच्या पायावर उभी असलेली भारतीय सांस्कृतिक परंपरा मातृत्वभावाला सर्वोच्च प्राधान्य देते. ती स्त्रीला देवी समजून पवित्र मानते. मातृभावातच स्त्रीभावनेचे मर्म आहे आणि मानवी स्वभाव रुजण्याचे गर्भस्थळही आहे. संस्कृतीची रचना जेव्हा मातृत्वभावनेने भरलेली असते तेव्हा ती कुटुंबावर आधारलेली असते. मातृभावाच्या छायेत स्त्रीभावना खऱ्या अर्थाने फुलते. कुटुंबात तयार झालेली मानसिकता पुढे समाजातही तशीच राहते. कमकुवत, अर्धवट किंवा उपेक्षित मातृभावनेची पार्श्वभूमी स्त्रीभावनेला कमी करते आणि पुरुषत्वाच्या प्रेरणेने भरलेली स्त्री पुरुषाचा देह धारण करते. तो आक्रमक आणि हिंसक समाजाला जन्म देतो. म्हणूनच मातृभावनेचे श्रेष्ठत्व आणि आदर भारतीय संस्कृतीच्या परंपरेच्या दृष्टीने चांगले आणि योग्य म्हटले जाते.

परंतु दुर्दैवाने संस्कृतीचा विचार शतकानुशतके अशा समाजव्यवस्थेच्या रचनेच्या वर्चस्वाखाली होता की, ज्याचा इतिहास पुरुषप्रधान अाणि वर्चस्व गाजवणारा शोषणाचा राहिलेला आहे. त्याने मातृभावाच्या विचारप्रणालीचे मूळ तत्त्व हरपले आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन समाजव्यवस्थेमध्ये मातृभावनेचे श्रेष्ठत्व पित्याच्या छत्राखाली चालणाऱ्या अाईच्या घरकामातच असते, असे मानले. स्त्रीला मैत्रीच्या नात्याने किंवा तसेच बरोबरीने न वागवता तिला घरकामापुरतेच मर्यादित केले. तिने आपले आयुष्य पुरुषाच्या वर्चस्वाखाली आणि त्याच्या पुरुषी अहंकाराला नेहमी बळ देत खर्ची घालवावे, अशी व्यवस्था करून ठेवली. दुर्दैवाने, आजचा सुशिक्षित समाजसुद्धा याच व्यवस्थेला भारतीय संस्कृतीची परंपरा समजताे.

मात्र, आजच्या समाजव्यवस्थेत मानवतावादी दृष्टिकोन आहे. स्वातंत्र्य, समानता, भ्रातृत्व हाच आधुनिकतेची मूळ पाया आहे. आधुनिक समाजात लिंग, वर्ण, जात, रंग इत्यादीच्या अाधारावर कोणाचा समान दर्जा नाकारणे शक्य नाही. यासाठी स्त्री-पुरुषाच्या शरीररचनेच्या आधारे कोणाचा समान दर्जा नाकारणेही शक्य नाही. दोघेही समान असणे अगदी योग्य आहे; परंतु अाधुनिक व्यवस्था सांस्कृतिकदृष्ट्या मागे पडत आहे. पारंपरिक मानवतावाद सांस्कृतिक मानवतावादाला समृद्ध करण्यास अपयशी ठरल्याचे सिद्ध होत आहेत. आधुनिकतेची रचनाही स्त्रीत्वाच्या तुलनेत पुरुषत्वालाच पोषक सिद्ध होत आहे. परंतु स्वातंत्र्य, समानतेच्या व्यापक प्रसारामुळे पुरुषी स्वभावास मोठ्या प्रमाणावर हिंसक होण्याची संधी दिली. याला कारण आपली समाजव्यवस्था असून पुरुषांनाच विशेष अधिकार आहेत, त्यांचीच सत्ता चालणार, अशी समाजाची धारणा होती. परिणामी, समान अधिकार आणि स्त्री स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून अाधुनिक समाज आपल्या संस्कृतीवर नाराजी व्यक्त करतो.

दुसरीकडे आपली संस्कृती प्राचीन समाजव्यवस्थेच्या मनोवृत्तीतून अजून बाहेर पडलेली नाही. त्यामुळे अाधुनिक व्यवस्थेशी ताळमेळ बसत नाही. या द्वंद्वामुळे दोघांनाही एकमेकांसमोर उभे केले आहे. या सर्व विकारांचे मूळ मुलींनी जीन्स घालणे, रात्री-अपरात्री भटकणे, प्रेमसंबंध ठेवणे, असे एका बाजूचे म्हणणे आहे. तर त्यांना स्त्री-स्वातंत्र्य, समानता आणि अस्मिता आहे, असे दुसरा पक्ष सांगतो. दोघेही आपापल्या बाजूवर ठाम आहेत. स्त्रीविषयक भारतीय सांस्कृतिक परंपरा, मर्यादा आणि विरोधाभासानंतरही काही चांगल्या बाजू जमेस आहेत. त्यांचा अाधुनिक व्यवस्थेशी योग्य ताळमेळ एका चांगल्या संस्कृतीच्या विकासाकडे घेऊन जाईल.

मातृभावनेचे श्रेष्ठत्व आणि आदरभाव कोणत्याही दृष्टीने समानतेच्या विरोधात नाही. समानताच मातृभावनेला खऱ्या अर्थाने योग्य अधिकार आणि बळ प्रदान करते. शक्तिसंपन्न मातृभावना एकीकडे कुटुंब आणि समाजात स्त्रीत्वाला अग्रक्रम देते, तर दुसरीकडे समानता स्वच्छंदी वृत्तीला पायबंद घालते. मानवतेचे संगीत तर मातृभावनेच्या प्रतिमेमुळेच झंकारले जाते.

वस्तुस्थिती - जागतिक आरोग्य संघटनेनुसार आई होण्यासाठी सर्वात चांगला देश फिनलंड आहे. गर्भावस्थेतील जोखमीच्या अाधारे तयार झालेल्या या अहवालात अमेरिका ३१ व्या स्थानावर आहे.