आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७०% कौशल्यावर लक्ष केंद्रित करत आहे आयटीआयचे शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामाशी जोडलेली कौशल्ये आणि उत्तम वेतनाची इच्छा आयटीआय शिक्षणाद्वारेही पूर्ण करता येते. यासाठी योग्य शिक्षण संस्था आणि योग्य ट्रेडची निवड करणे आवश्यक आहे.
आजदेखील मोठ्या संख्येने युवक वर्ग, कौशल्ययुक्त मात्र शारीरिक श्रमाची मागणी करणाऱ्या टेक्निकल जॉबच्या तुलनेत ऑफिस जॉब अधिक पसंत करत आहेत. प्रत्येक वर्षी भारतीय कार्यशक्तीमध्ये जोडले जाणाऱ्या १.२ कोटी उमेदवारंामधून फक्त ७ टक्के युवकांनाच संघटित क्षेत्रात नोकरी मिळते. एवढेच नव्हे तर प्रत्येक वर्षी पदवीधर होणाऱ्या ६० लाख विद्यार्थ्यांसाठीही रोजगार निर्मितीचे आकडे काही तुम्हाला उत्साहित करणारे नाहीत. मात्र उल्लेखनीय हे आहे की, १५-२९ वर्षे वयोगटातील पदवीधर बेरोजगारांचे प्रमाण ३३ टक्के आहे. खरे तर व्हाइट कॉलर नोकऱ्यांची इच्छा बाळगणारे भारतीय युवक कौशल्ययुक्त जॉबच्या त्या शक्तीबद्दल अनभिज्ञ आहेत, जे त्यांच्या करिअरला नवी उंची देऊ शकतात. या प्रकरणात त्यांचे मदतगार बनू शकतात औद्योगिक कार्यशक्तीचा मोठा वाटा उपलब्ध करणारे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (आयटीआय).

५ महिन्यांत ८ नवे आयटीआय प्रतिदिनी सुरू
रोजगाराची वाढती क्षमता आणि किफायती शिक्षणाकडे पाहता आयटीआय शिक्षणाविषयी आवड वाढते आहे. सरकारी आकड्यानुसार या वर्षी एप्रिल ते ऑगस्टदरम्यान १,१३३ इन्स्टिट्यूट म्हणजे दर दिवशी सरासरी आठ नवे आयटीआय देशभरात स्थापन झाले आहेत. याबरोबरच प्रवेश क्षमतेतही १,७१,३९२ ची अतिरिक्त वाढ झाली आहे. त्यातील रंजक गोष्ट ही आहे की, आयटीआयची ही वाढती मागणी देशात इंजिनिअरिंग कोर्सेसच्या क्रेझलादेखील टक्कर देत आहे वा स्पर्धा करत आहे. उल्लेखनीय हे आहे की, गेल्या तीन वर्षांत देशातील सरकारी व खासगी अभियांत्रिकी संस्थांमध्ये जिथे १३. ३ लाख जागा रिक्त आहेत, तिथे आयटीआयची विद्यार्थिसंख्या मात्र दरवर्षी वाढत आहे.

उद्योग देत आहेत प्रशिक्षण
देशामध्ये कामाच्या योग्यतेची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. यूएनएफपीएच्या अहवालानुसार ३५६ दशलक्ष भारतीय १०-२४ वर्षांच्या वयोगटातील युवकांमध्ये ही योग्यता आहे. एवढ्या लोकांना रोजगार उत्पादनाबरोबरच महत्त्वपूर्ण हे आहे की, त्यांच्या कामासाठी आवश्यक कौशल्याचा विकास होणे. कारण की, गुणवत्तेच्या टंचाईचा सामना उद्योगाला सातत्याने करावा लागत आहे. आयटीआय प्रशिक्षण या प्रकरणी मदतयोग्य सिद्ध होऊ शकते. अशातच ऑफिशियल डेटानुसार प्रत्येक तीनमधील दोन आयटीआय विद्यार्थी रोजगार मिळवण्याच्या योग्यतेचे आहेत. मात्र कंपन्यांना सध्या त्यांना स्वत:च प्रशिक्षित करण्याची गरज भासत आहे. या प्रकरणात मारुती सुझुकी ४५ सरकारी आयटीआयमध्ये ऑटोमोबाइल कौशल्य एन्हान्समेंट सेंटर्सच्या स्थापनेच्या योजनेवर काम करत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी २,१०० युवकांना कार सर्व्हिस व दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल. अशा तऱ्हेने आयटीआय सोलन येथे मोटार मेकॅनिक व इलेक्ट्रिशियन ट्रेडला महिंद्रा अँड महिंद्राने अपग्रेड केले आहे. त्यामुळे या कोर्सची मागणी फारच वाढली आहे. याशिवाय प्रमुख आयटीआयदेखील जॉब रेडी उमेदवार तयार करण्यासाठी खास कष्ट घेत आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर सप्टेंबर २०१५ पर्यंत आयटीआय तरसाली येथे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी एमएनसीच्या चांगल्या जॉब ऑफर पटकावल्या आहेत.

कुशल मनुष्यबळ तयार करण्याची तयारी
येणाऱ्या वर्षात जागतिक स्तरावरील कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची जबरदस्त मागणी असेल. येथे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संधींचा सकारात्मक ढाचा उभा राहील. आयटीआय या प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. जे उद्योगाला तांत्रिक मनुष्यबळासाठीचे प्रशिक्षण देतात. आयटीआयमध्ये सहा महिन्यांचे बेसिक प्रमाणपत्र कोर्स असतात. त्याला तीन वर्षांच्या इंडस्ट्रियल डिप्लोमा कोर्समध्ये अपग्रेड केले जाऊ शकते. ही निवडलेल्या गेलेल्या ट्रेडवर निर्भर करते आहे. याशिवाय इंजिनिअरिंगला नॉन इंजिनिअरिंग व्यावसायिक ट्रेडमध्ये रूपांतरित करणारे कोर्स विद्यापीठातही उपलब्ध आहेत. या कोर्सेसमध्ये ७० टक्के कौशल्य आणि ३० टक्के थेअरीच्या संकल्पनेवर सराव केला जातो आहे. काही कोर्स विदेशी रोजगारासाठी डिझाइन केले गेले आहेत. आयटीआय ट्रेड्स अनेक ट्रेनिंग योजनेत वर्गीकृत आहेत. वेगवेगळ्या योजनांत क्राफ्ट्समन ट्रेनिंग योजना (सीटीएस) आणि अप्रेंटिसशिप ट्रेनिंग योजना (एटीएस) सर्वात महत्त्वपूर्ण आहेत. ते नोकरीच्या आधी प्रशिक्षण देतात. सीटीएस दीर्घ कालावधीचे प्रशिक्षण देते. कारण कौशल्य मिळवण्यासाठी फक्त प्रशिक्षण पुरेसे नाही. याला वास्तविक नोकरीसाठीच्या ट्रेनिंगशी जोडणे आवश्यक आहे.

एटीएस इन्स्टिट्यूशनल व ऑन दि जाब ट्रेनिंगचे आयोजन आहे. निवडल्या गेलेल्या ट्रेडच्या आधारे आयटीआयमध्ये सीटीएस व एटीएसअंतर्गत प्रवेशासाठी शैक्षणिक योग्यता आठवी ते बारावी पास अशी आहे. सीटीएस सेमी स्किल्ड वर्कर्स तयार करते आहे आणि पासआऊट सीटीएस ट्रेनीज अप्रेंटिसशिपमध्ये प्रवेश घेऊ शकतात. एटीएसचा कालावधी सहा महिने ते चार वर्षांचा असतो. पदवीधर अप्रेंटिस स्किल्ड वर्कर्स या नावाने ओळखली जाते. सीटीएस आणि एटीएसची ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर उमेदवार ऑल इंडिया ट्रेड टेस्टसाठी योग्य होतात. या परीक्षेचे आयोजन एनसीव्हीटीद्वारे वर्षेभरात दोनदा एप्रिल, मे आणि ऑक्टोबर, नोव्हेंबरात केले जाते. यशस्वी उमेदवारांना संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (एनटीसी) व नॅशनल अप्रेटिंसशिप सर्टिफिकेट (एनएसी) प्रदान केले जाते. केंद्र -राज्यांच्या सरकारी खात्यात सेवेत तसेच खासगी व कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉबसाठी एनटीसी व एनएसी एक मान्यताप्राप्त योग्यता आहे. आयटीआय आणि आयटीसी ट्रेनिंगसाठी ट्रेड टेस्ट एकच असते.

आयटीआयमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी सरकारी स्तरावर अनेक पावले उचलली गेली आहेत. याअंतर्गत वर्तमान ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला संेटर ऑफ एक्सलन्समध्ये अपग्रेड केले गेले आहे. याशिवाय मॉड्युलर एम्प्लॉएबल स्किल्स प्रोग्रामही सुरू केले गेले आहे. जिथे कमी कालावधीचे कोर्स उपलब्ध आहेत. याअंतर्गत ६० क्षेत्रांना कव्हर करताना १४०२ मॉड्युल्स तयार केले आहेत, जे जॉबरेडी बनवण्यात सहायक सिद्ध होऊ शकतात.
डॉ. मोना सेडवाल, सहायक प्राध्यापक, न्यूपा
पुढे वाचा, ITI बाबतची काही आकडेवारी...
बातम्या आणखी आहेत...